#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Wednesday, 27 June 2018

खड्यांच्या कलाकृती

अभ्यासपूरक उपक्रम -१
खड्यांच्या कलाकृती
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी, ता. सिन्नर
उपयोगिता - 

१ ) याद्वारे आपण अंक लिहिणे- मोजणे, अक्षरे, शब्द, spelling लिहिणे , डिझाइन तयार करू शकतो.
२ ) कृतीयुक्त असल्याने अध्ययनात रस निर्माण होतो.
३ ) खर्च शून्य.
४ ) विद्यार्थी कृतीत रममाण झाल्याने वर्गात गोंधळ होत नाही. (शिक्षकाने सुलभकाचे काम करायचे आहे.)
५ ) वर्गात अथवा वर्गाबाहेरही (वर्गपूर्वतयारीसाठी) उपयुक्त.
६ ) विद्यार्थ्यांच्या खेळ या स्वभावगुणाला साजेसा उपक्रम.
७ ) गटांत आवश्यकतेनुसार कृती द्याव्यात. नियोजन करावे.
८ ) सफेद, काळे, रंगीत अशा खड्यांचा वापर केल्यास कृती रंजक होतात.
उपक्रमांत विविधता असू शकते.
थोडक्यात उपक्रम कसा राबविला ते फोटो, व्हिडिओ तसेच pdf मध्ये पाहू शकता...











श्रीमती आशा चिने,
शाळा गुरेवाडी, केंद्र- मुसळगाव, सिन्नर
उपक्रम आवडल्यास आपल्या अनमोल प्रतिक्रिया जरूर कळवा...

Monday, 18 June 2018

शाळा प्रवेशोत्सव , शाळा गुरेवाडी, 2018


शाळा प्रवेशोत्सव , शाळा  गुरेवाडी, 2018 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी, ता. सिन्नर शाळेत प्रवेशोत्सव जल्लोशात साजरा

दि. 15 जून 2018 रोजी जि प प्रा शाळा गुरेवाडी, ता. सिन्नर येथे शेक्षणिक वर्ष 2018-19 ची सुरवात प्रवेशोत्सवाने करण्यात आली.
आदल्या दिवशी संध्याकाळी संपुर्ण गावातुन मशालफेरी चे आयोजन करण्यात आले. मशाल फेरी मधे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी झाले.
15 जून रोजी सकाळी 8 वाजता नविन प्रवेशित विद्यार्थ्यांना सजवलेल्या रथातुन वाजतगाजत शाळेमधे आणण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच नविन दाखल विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे हस्ते गुलाबपुष्प देउन स्वागत करण्यात आले. शालेय जीवनात प्रवेशाची आठवण म्हणुन पहिलीत दाखल प्रत्येक विद्यार्थ्यांचा पावलाचे ठसे घेउन जतन करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. दुपारच्या पोषण आहार सोबत गोड रवा देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय परिसर तोरण तसेच पताका बांधून सडा रांगोळी काढून सजवण्यात आला होता.
या संपूर्ण कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती पद्मा एनगंदुल मॅडम व श्रीमती आशा चिने यांनी केले. उपस्थितांचे आभार मानण्यात आले..सर्व कार्यक्रम आपण खाली पाहू शकता...
शब्दांकन
श्रीमती आशा चिने,
शाळा गुरेवाडी, केंद्र- मुसळगाव, सिन्नर



Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect