#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

उपक्रम संख्याज्ञान -अब्जपर्यंतच्या संख्यांचे सहज वाचन व लेखन

उपक्रम संख्याज्ञान -अब्जपर्यंतच्या संख्यांचे सहज वाचन व लेखन 

विद्यार्थ्यांना किमान दोन अंकी संख्यांचे अंकी व अक्षरी वाचन ,लेखन आले पाहिजे.
अगोदर फळ्यावर संख्यांचे स्थान ओळख करून द्यावी.
संख्या कार्डच्या मदतीने एक-एक अंक वाढवत जाऊन , संख्यांचे विशिष्ट गट करून एकदा वाचन करून दाखवावे.
कार्ड हाताळायला ,खेळत शिकायला विद्यार्थ्यांना खूप आवडते, म्हणूनच कृती चटकन लक्षात येते व चिरकाळ लक्षातही राहते.
शैक्षणिक वातावरण निर्मिती होते .
आपल्या अनुपस्थितीमध्ये सुध्दा हा खेळ चालतो.

@शून्याचा वापर@

संख्या कार्ड बदल करून
संख्येतील शून्यासाठी वेगळा सराव घ्यावा
..

प्रत्यक्ष उपक्रम कसा राबविला पहा व्हिडिओ...
व्हिडिओ पहिल्यासच आपल्याला उपक्रम किती उपयोगी आहे ते कळेल.



उपक्रम कसा वाटला.आवडल्यास आपल्या शाळेत राबवून बघा.

2 comments:

  1. खुपच छान विद्यार्थी बोलकेझाले

    ReplyDelete
  2. हो, त्यांना शिक्षकांची भीती वाटत नाही म्हणून बोलके झाले.
    विद्यार्थ्यांसोबत मित्रत्वाने वागल्यास सहज शक्य होते. त्यांच्यासोबत गप्पा, मजा, केल्यास ,त्यांच्यात मिसळल्यास लवकर result मिळतो. आणि आनंदाने राहायला कोणाला नकोय? मी त्यांच्यात खेळते सुद्धा! मला आवडते. आमच्या शाळेतील मी पहिली स्त्री शिक्षिका म्हणून आईच्या नात्याने विद्यार्थी लवकर जवळीक साधतात... आपण मायेने घेतलं म्हणजे झालं...

    ReplyDelete

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect