राष्ट्रमाता जिजाऊ
१२ जानेवारी १५९८ —
मृत्यू १७ जून १६७४
आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज ह्या मराठ्यांच्या दोन छत्रपतींना घडविणार्या विश्ववंद्य आदर्श राजमाता जिजाउंना त्रिवार वंदन ! जिजाउञ्चा जन्म १२ जानेवारी १५९८ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई हिच्या पोटी झाला. म्हाळसाबाई हि निंबाळकर घराण्यातील होती.लखुजी जाधवाला दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि बहाद्दुरजी, हे चार पुत्र आणि जिजाउ हि एक कन्या अशी पाच अपत्ये होती.शिक्षण-तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलीनप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले.तिला दांडपट्टा, अश्वारोहण वैगरे युद्ध कलांचे शिक्षण देण्यात आले.राज्यकारभाराचेही प्रशिक्षण मिळू लागले.जिजाउं चा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांचेशी दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटाने संपन्न झाला. या प्रसंगी मालोजीला निजामशहा कडून पाचहजारी मनसब, शिवनेरी, व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहागीर म्हणून मिळाले. जिजाउंना एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकि चार मृत्यू पावली. संभाजी व शिवाजी हे दोन होत. शहाजीं नी जिजाऊ ना शिवनेरीवर किल्ल्यात सुरक्षित ठेवले. येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाउने शिवाजीस जन्म दिला. जिजाउचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते.त्यांनी पुण्याच्या आसपासचा अहमदनगर व विजापूरचा प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले परंतु विजापुरने ते लवकरच उध्वस्त केले . इ.स १६३९ ते १६४७ या काळात शहाजीने पुण्यात झांबरे पाटलाकडून जागा विकत घेवून ‘लाल महाल ‘ नावाचा राजवाडा बांधला . जीजावू व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता. जिजाऊच्या आज्ञात शिवाजी आपल्या सवंगड्यासोबत युद्धकला शिकवू लागला. दऱ्याखोऱ्यात फिरू लागला. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे , येसाजी कंक , बाजी जेथे वैगरे शेतकरयांची मुले शिवाजीचे जिवलग मित्र बनले. सर्वावर जीजावूंचा मायेची नजर होती . शिवाजीसह सार्वजण जिजाऊच्या आज्ञेत वागत होते.१६ मे १६४० साली जिजाऊने शिवाजीचा विवाह निंबाळकरांच्या सईबाईंशी लावून दिला. यावेळी शहाजी विजापूरतर्फे बंगलोर येथे आल्यामुळे लग्नास येवू शकले नाहीत. अशा रीतीने जिजाऊ निंबाळकरांच्या मुलींची (सईबाईची) सासू बनली , तर वणजोगी निंबाळकरांची मुलगी दीपाबाई (मालोजीची पत्नी) ही जिजाउंची सासू होती. २५ जूलॆ १६४८ साली जिंजा येथे शहजीस कपटाने कैद केले, हे काम वजीर मुस्तफाखान याने केले . १६ मे १६४९ रोजी जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीने हालचाली करून शहजींची सुटका केली. शिवाजीने १० नोव्हेंबर १६५९ साली अफझलखानाचा वध केला. आणि बाजी घोरपडेस ठार केले. मुस्तफखानाचे अगोदरच निधन झाले होते. अशा रीतीने जिजाउने पुत्र शिवाजीस आज्ञा करून पतीच्या अपमानाचा सूड घेतला. इ.स १६५५ साली जिजाऊचा जेष्ट पुत्र संभाजी विजापूरतर्फे लढतांना ठार झाला. १४ मे १६५७ रोजी शिवाजीची राणी सईबाई पुरंदर गडावर प्रसुत झाली. तिला पुत्र झाला . त्याचे नाव संभाजी ठेवले . शिवाजीचा हा पहिला पुत्र आणि जिजाऊचा फिल नातू. सभाजीची आई सईबाई हिचे ५ सप्टेबर १६५९ रोजी निधन झाले. २३ जाने.१६६४ साली तुंगभद्रेची काठी होदीगेरे येथे असतांना शहाजी शिकारीला गेले. त्यांचा घोडा भरवेगात असतांना पाय रनवेलीत अडकला आणि कोलमडला. शहजीचे प्रतापशाली प्रतापशाली जीवन संपले . जिजाऊ विधवा झाली. पण ती सती गेली नाही. शिवाजीने जीजामातेशी विचार विनिमय केला . त्या धर्यशाली मातेचे आपल्या एकुलत्या एका पुत्रास कपटी आणि खुनी औरंगजेबाच्या भेटीस आग्रा येथे जाण्यास संमती दिली . शिवरायाने जिजाऊच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे सोपविली आणि ५ मार्च १६६६ साली राजगडवरून आग्राकडे प्रयाण केले . सिंहगड स्वराज्यात नाही याबद्धल जिजाऊस फारच वाईट वाटत होत . तिने शिवाजीस सिंहगड घेण्यास आग्रह केला. तानाजीने स्वप्रानाची आहुती देत सिंहगड ४ फेब्रुवारी १६७० साली काबीज केला. शिवाजीची राणी सोयराबाई राजगडावर प्रस्तुत झाली. २४ फेब. १६७० साली राजारामाचा जन्म झाला. पहिल्या सूर्यप्रतापी पुत्राच्या राज्यभिषेकाचा सोहळा ६ जून १६७४ साली बसले. सर्व उपाय थकले. १७ जून १६७४ बुधवार रात्री जिजामातेने डोळे मिटले. महाराजणवरचे मायेचे छत्र मिटले. स्वामी स्वराज्याच्या आईविना पोरका झाला.
जिजामाता स्वराज्याची स्पुर्ती होती. महाशक्ती होती. मातृशक्ती होती. मराठ्याने दोन छत्रपती घडविणारा आदर्श राजमाता होती. शिवाजीच्या अनुपास्तीत तीच राज्यकारभार बघत होती. न्यायनिवाडे करीत होती. गरजवंताना मदतीचा हात देत होती. तो काळ विचारात घेतला तर जिजाऊ ही प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजल्याची पालककर्ती राजमाता होती. अशा या राजमातेला कोट्यावधी वेळा नतमस्तक होवून विनम्र अभिवादन !
जय जिजाऊ !!
होय मला जिजाऊ व्हायचयं
अन्यायाविरुद्ध लढायचयं ||धृ||
आऊसाहेबांच्या संस्काराने महापुरूषांना जन्म दिला |
स्वराज्य निर्मिती विचाराने सर्व समाज जागा झाला |
गुलामगिरीतून समाज मुक्त केला |
मला याच विचारांची ज्योत व्हायचयं. ||१||
मराठ्यांची अस्मिता जागी केली |
गनिमांची ह्रदय भितीने धडधडली |
परदेशी सल्तनती गडगडली |
मला स्वराज्याचा अंगार व्हायचयं ||२||
आऊसाहेब म्हणजे रयतेच्या कल्याणाचा विचार |
स्वराज्याच्या विचारांनी प्रेरणेचा संचार |
शत्रूकडॆ होऊ नका लाचार |
मला या लाचारीतून मुक्त व्हायचयं ||३|||
जगात जन्मोत्सव साजे |
डोलताशे नगारे वाजे |
आई तूच दैवत माझे |
स्वराज्याच्या विचारांना नमन करायचयं ||४||
स्वराज्य श्रद्धेचा पाईक घडू |
स्वराज्याच्या विचाराने निकराने लढू|
जनतेला गुलामगिरीतून काढू |
या विचारांचा पाईक व्हायचयं ||५||
होय मला जिजाऊ व्हायचयं 🚩🚩
*स्वराज्य संकल्पिका,राष्ट्रमाता,राजमाता,आऊसाहेब जिजाऊ माॅसाहेब यांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा*🚩🚩🚩🚩💐💐
*जय जिजाऊ | जय शिवराय |*
🚩🚩🚩🚩
__________________________
💎राजमाता जिजाऊ💎
🌷जिजाबाई शहाजी भोसले
🌷पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले
🌷जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८
सिंदखेडराजा,बुलढाणा.
🌷मृत्यू जून १७, इ.स. १६७४
पाचाड, रायगडचा पायथा
🌷वडील लखुजीराव जाधव
🌷आई म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
🌷पती शहाजीराजे भोसले
🌷सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई.
🔷जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.
🔷डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
💎भोसले व जाधवांचे वैर
🌸पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला,
🌸एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली
🌸पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ.
🌸दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले.
🌸हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.
🌸हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला
🌸या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.
🌸नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
💎जिजाबाईंची अपत्ये
🍀जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते.
🍀त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
🍀जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले.
🍀त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला.
🍀१९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
💎राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
🌼शिवाजी १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली.
🌼अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.
🌼कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले.
🌼निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती.
🌼अशा प्रतिकूल परिस्थितीत नेटाने पुणे शहराचा
पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले.
🌼शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली.
🌼जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
🌼शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली.
🌼समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले .
🌼शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले .
🌼शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले.
🌼शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.
🌼आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
💎जीवन
🌺शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली.
🌺सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
🌺राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता.
🌺या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या.
🌺एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले.
🌺या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
🌺राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात.
🌺शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
🌺शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला,
🌺आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धाप
काळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
🌺जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.
📚पुस्तके
राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-
📘जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर)
📘छत्रपती शिवाजी (ब.मो. पुरंदरे)
📘जेधे शकावली
📘शिवभारत
धन्यवाद
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!