#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Wednesday 22 December 2021

Google Training

 गुगल कडून दोन दिवसाचे प्रशिक्षण ....

“Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom”

विषय :- दिनांक २३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षणाबाबत..


संदर्भ:

१. शासन पत्र संकीर्ण -२०२० /प्र.क्र.८७ / एसडी-६ दिनांक ०८ जून २०२०.


२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रप / गुगल क्लासरूम /२०२०-२०२१ दिनांक ११जुलै २०२०.


३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/आय.टी./गुगल क्लासरूम नोंदणी/२०२१/३१४० दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१.


     कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला गेला. यानुसार संदर्भ क्रमांक.२ अन्वये प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण ४०,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा प्रभावी व यशस्वी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे “Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom” या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २३ व २४ डिसेंबर,२०२१ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.


     सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या युट्युब लिंक्स व QR कोड खालीलप्रमाणे,यानुसार दोन दिवसीय गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी संदर्भ क्रमांक ३ अन्वये राज्यातील एकूण ८०,०६९ शिक्षकांनी आपली नावनोंदणी केलेली आहे. सदरच्या नोंदणी केलेल्या शिक्षकांना G suit आय.डी.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत SMS द्वारे तसेच जिल्ह्यास PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी प्रशिक्षणादरम्यान व नंतर च्या कालावधीमध्ये आवश्यक प्रात्यक्षिक कामकाज प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या G suit आय.डी. चा वापर करून करावे. सदरचा Gsuit आय.डी. व पासवर्ड संबंधित प्रशिक्षणार्थी याने जतन करून ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच प्रशिक्षण सत्रांच्या व उत्तर चाचणी पूर्ततेनंतर आपणास प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त होईल याचीनोंद घ्यावी.


    तरी यानुसारच्या आवश्यक सूचना आपल्या स्तरावरून आपल्या जिल्ह्यामध्ये निर्गमित करण्यात याव्यात जेणेकरून सर्व नोंदणी केलेले शिक्षक सदरच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील


1) २०२१-२२ साठी नावनोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांचे G-suite  आयडी तयार झालेले असून दिनांक २४ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांना आपल्या मोबाईल वर टेक्स्ट मेसेज द्वारे प्राप्त होतील. तसेच परिषदेच्या संकेतस्थळावरून  http://mahaeschool.ac.in/  या लिंक वर ही प्राप्त (download) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. 


नसल्यास....

2 ) प्रशिक्षण नोंदणी साठी खालील लिंक वर क्लिक करा. ज्या शिक्षकांना G suit आय. डी. मिळाला नाही. त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून G suit आय. डी. प्राप्त करावा.

https://google.addingdimensions.in/


3) प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वापरा...

Day 1

https://youtu.be/qzCACIYQDvQ

Day 2

https://youtu.be/BfkYHZ4A1iI

प्रशिक्षणानंतर आपली उपस्थिती खालील लिंक वर नोंदवा...

Day 1

https://docs.gooaapligle.com/forms/d/e/1FAIpQLSemWp_g22BVphXiic8G4s2KJ0Qw03uTmF_Nwq76fgfmoiV40w/viewform

Day 2

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdMwP3XkFmtXoUOsYYqVH0QXbZ_HamrQw3p7LRmsvKIQsOssQ/viewform?pli=1

     

Google classroom प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या दोन्ही लिंक भराव्या लागतील

1. Feedback link

2. Assessment link

   

     त्यानंतर mahaeschool च्या mail ला certificate मिळेल.👍🏻म्हणजे तुम्हाला मिळालेल्या नवीन मेल आयडीला....

     तो मेल आयडी आपल्या मोबाईल मध्ये सेव करा. त्याचा दिलेला पासवर्ड वापरून .... पासवर्ड  नंतर बदलून टाका...

     अजूनही ज्यांचे प्रशिक्षण बाकी असेल त्यांनी पुढील वेळेस आधी registration करावे... हे फक्त 23 व 24 तारखेच्या प्रशिक्षणासंदर्भात आहे. याची नोंद घ्यावी.


      ऑनलाईन गुगल क्लासरुम प्रशिक्षण २०२१-२२ साठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे G-suit आयडी...

    आपल्या G suite आयडी चा पासवर्ड खालीलप्रमाणे असेल आपला पासवर्ड ८ अक्षर/अंकाचा असेल. आपल्या प्रथम नावाचे इंग्रजीतील पहिली ४ अक्षरे पैकी पहिले अक्षर कॅपिटल घ्यावे व आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे ४ अंक असे असणार आहे.

उदा. आपले नाव निलेश असून मोबाईल नंबर 1234567891 असल्यास आपला पासवर्ड Nile7891 असा असेल.

.... संकलन फक्त...धन्यवाद.

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect