#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Showing posts with label साहित्य. Show all posts
Showing posts with label साहित्य. Show all posts

Friday, 14 February 2020

अश्रू


निर्भया, कोपर्डी, हिंगणवाडीच्या घटनेने संवेदनशील मने मृत पावल्यासारखी झालीत. आपण सुरक्षित नाहीच !  या विचाराने आजची महिला गलितत्राण पावल्यासारखी दिसतेय. 
का आपण माणूस म्हणून जगू शकत नाही? 
का आपल्यातील हव्यासाच्या भावना इतक्या खालच्या स्तरावर गेल्यात? 
दुसर्‍याची आई, बहीण, मुलगी तर जाऊ द्या ! पण, तुम्हाला तुमच्यातील माणूस सुद्धा दिसत नाही? 
दहा तोंडाच्या रावणाला आपण नाव ठेवतो, पण एक तोंडाचा माणूस एवढा क्रूर कसा झाला? 
काही  दिवसांपासून जीव घुसमटल्यासारखा झालाय. खूप व्यक्त व्हावंसं वाटतं, पण निःशब्द झालेय... माझ्या भावना या पंक्ती रूपाने आपल्यासमोर मांडत आहे...!😔

अश्रू..!

पंखांत माझ्या बळ देऊन, 
 पंख कोणी छाटले ?
नभात त्या दाणे पेरून, 
स्वप्न माझे हिरावले !😔


पाठीराखा होतास तू ! 
अन् पाठीत खंजर खुपसले ?
सबला होतेस मी तरी, 
बल तू दाखविले!


पारतंत्र्याचे दिवस गेले,
 स्वातंत्र्य कुठं मिळाले ?
तेव्हाही मीच ? आणि
आजही मलाच सती दिले !


तू वंशाचा दिवा होतास,  
मी पण पणती जाहले !
आयुष्य हरले मी ! अन् 
जीवन माझे तू हिसकावले !


लेक तुझी ! बहीण तुझी ! 
मी पण सर्वस्व जाहले ?
नैतिकता मेली तुझी ! 
अन् चटके आईनेही सोसले !


रात्रीच्या त्या एकांतात, 
कली किती अवतरले ?
देह माझा छिन्न करून, 
मनही विच्छिन्न केले !


हास्याच्या खोट्या पडद्याआड, 
कसले प्रेम दाखवले ?
शांत मला करून तू ,
सगळे चव्हाट्यावर मांडले !😔


आईबापाच्या डोळ्यांतील, 
आभाळ कसे फाटले ?
श्वास होतेस मी त्यांचा, 
अन् त्यालाच तू तोडले !


जगायचं होतं खूप मला ! 
आयुष्य हे कसे संपले ?
वासनांध तू ? अन् 
मला का जाळीले ?


कोणता तो गुन्हा? अन् 
पाप काय मी केले ?
फासावरती तू हवास ,
अन् जगातून मी गेले !


अबोल कळी तू पुन्हा खुडशील, 
व्याकुळ किती मी जाहले ?
वेदना जाण तू माझ्या, 
आता अश्रूही माझे गोठले !


....- आशा चिने 
बारा/दोन/वीस


Friday, 27 January 2017

सहज सोपे इंग्रजी शब्द

वर्गातील मुलांना सहज पाठ होतील असे काही इंग्रजी शब्द.......              

                     .      
Air          म्हणजे           हवा
Pan        म्हणजे           तवा
New       म्हणजे           नवा
Bison     म्हणजे           गवा
a
Bowl        म्हणजे         वाटी
slate         म्हणजे        पाटी
stick         म्हणजे       काठी
Ruler         म्हणजे        पट्टी

Cat             म्हणजे     मांजर
Carrot         म्हणजे   गाजर
Sea              म्हणजे   सागर
crocodile     म्हणजे  मगर

Dog           म्हणजे      कु त्र
Friend        म्हणजे.    मित्र
Son             म्हणजे     पुत्र
Fromula      म्हणजे     सुत्र

Elephant     म्हणजे    हत्ती
husband      म्हणजे   पती
soil                म्हणजे   माती
speed           म्हणजे   गती

Fish             म्हणजे    मासा
Rabbit        म्हणजे     ससा
laugh          म्हणजे    हसा
How            म्हणजे    कसा

Goat         म्हणजे    शेळी
Bud         म्हणजे       कळी
Banana   म्हणजे      केळी
Dish         म्हणजे      थाळी

Head      म्हणजे       डोक
Box          म्हणजे      खोक
people    म्हणजे       लोक
Throw    म्हणजे        झोक

Ink           म्हणजे      शाई
mother    म्हणजे     आई
sister        म्हणजे     ताई
Jasmine   म्हणजे     जाई

Jug         म्हणजे       मगा
frock       म्हणजे       झगा
ballon      म्हणजे      फुगा
Brinjal      म्हणजे     वांगा

kite      म्हणजे          घार 
Door    म्हणजे          दार
Cold      म्हणजे         गार     
day        म्हणजे         वार

List        म्हणजे          यादी
Women   म्हणजे       मादी
Bed         म्हणजे         गादी
River       म्हणजे          नदी

mango     म्हणजे      आंबा
pole          म्हणजे       खंबा
Tall            म्हणजे       लंबा
stop         म्हणजे        थांबा

Nose     म्हणजे       नाक
wheel    म्हणजे       चाक
Bench .   म्हणजे      बाक
Post        म्हणजे       डाक

Orange      म्हणजे     संत्री
Minister    म्हणजे      मंत्री
toilet .         म्हणजे     मुत्री
Scissors     म्हणजे     कात्री

peacock    म्हणजे     मोर
Thief           म्हणजे    चोर
force           म्हणजे    जोर
Rope          म्हणजे      दोर

Queen   म्हणजे            राणी
water      म्हणजे           पाणी
Loss        म्हणजे           हानी
sparrow  म्हणजे           चिमणी

Radish    म्हणजे            मुळा
school    म्हणजे            शाळा
Eye          म्हणजे             डोळा
Black       म्हणजे             काळा

Sheep    म्हणजे         मेंढी
sheaf         म्हणजे      पेंढी 
lady finger  म्हणजे    भेंडी
Bank        म्हणजे         पतपेढी

Tight    म्हणजे           ताठ
Back    म्हणजे            पाठ
Edge      म्हणजे          काठ
Road        म्हणजे         वाट

umbrella   म्हणजे       छत्री
Iron           म्हणजे        इस्त्री
Beach       म्हणजे       कुत्री
mason      म्हणजे        मिस्त्री

Van        म्हणजे       गाडी
mare     म्हणजे        घोडी
Beard    म्हणजे        दाढी
Hen      म्हणजे         कोंबडी

washerman   म्हणजे    धोबी
key              म्हणजे         चाबी
cabbage    म्हणजे          कोबी
Navel          म्हणजे          बेंबी

Xerox        म्हणजे      नक्कल
Bow            म्हणजे    बक्कल
Common sense     अक्कल
Devisal      म्हणजे      शक्कल

Young     म्हणजे         तरुण
Pimple      म्हणजे       मुरुम
Garlic       म्हणजे         लसूण
Probe        म्हणजे        कसूण

zip        म्हणजे     चेन
Dung    म्हणजे     शेण,


Thursday, 25 February 2016

श्रावण आला

श्रावण आला
🙏 माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. 🙏

हासरा नाचरा, जरासा लाजरा,


सुंदर साजिरा श्रावण आला

तांबुस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला

मेघांत लावीत सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला

लपत, छपत, हिरव्या रानात,
केशर शिंपीत श्रावण आला

इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला

लपे ढगामागे, धावे माळावर,
असा खेळकर श्रावण आला

सृष्टीत सुखाची करीत पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला.

सागर

                                   सागर 🙏 माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. 🙏

सागर

आवडतो मज अफाट सागर
अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर
सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफेत शिंपित
वाटे वरती सडे
हजार लाटा नाचत येती
गात किनाऱ्या कडे

मउ मउ रेतीत कधी मी
खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या
वाऱ्याच्या संगती

संथ सावळी दिसती जेंव्हा
क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला
जावेसे वाटते

खडकावरूनी कधी पाहतो
मावळणारा रवी
ढगा ढगाला फुटते जेंव्हा
सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेंव्हा
जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी
येती छातीवरी

दर्यावरची रंगित मखमल
उचलुन घेते कुणी
कृष्णसावल्या भुरभुर पडती
गगनाच्या अंगणी

दूर टेकडी वरी पेटती
निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता
घरी जायला हवे
कुसुमाग्रज

सुख

सुख 🙏 माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. 🙏

🔴झकास कविता🔴

सुखांमागे धावता धावता
विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची मग
भागत नाही तहान 

स्वप्न सत्यात आणता आणता
दमछाक होते खूप
वाटी-वाटीने ओतलं
तरी कमीच पडत तूप

बायको आणि पोरांसाठी
चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो
पण मागू नका वेळ

करिअर होतं जीवन मात्र
जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती
पैसा छापणारं यंत्र

चुकून सुट्टी घेतलीच तरी
पाहुणा ‘स्वतःच्या घरी’
दोन दिवस कौतुक होतं
नंतर डोकेदुखी सारी

मुलच मग विचारू लागतात
बाबा अजून का हो घरी?
त्यांचाही दोष नसतो
त्यांना याची सवयच नसते मुळी

सोनेरी वेली वाढत जातात
घरा भोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती
कधीही न सारवलेल्या

आयुष्याच्या संध्याकाळी मग
एकदम जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच मुळी घेतला नाही

सगळं काही पाहता पाहता
आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता
समाधान दूर वाहून गेल 😥

Wednesday, 24 February 2016

मंगेश पाडगांवकर

                           मंगेश पाडगांवकर

: – मंगेश पाडगांवकर – :
मी कुठे म्हणालो “परी” मिळावी..
एवढंच की जरा “बरी” मिळावी..
प्रयत्न मनापासून आहेत मग..
किमान एक “तरी” मिळावी..!
स्वप्नात तशा खूप भेटतात..
कधीतरी “खरी” मिळावी..
हवीहवीशी एक जखम..
एकदातरी “उरी” मिळावी..!!
गालावर खळी नको तिच्या..
फक्त जरा “हासरी” मिळावी..!
चंद्राइतकी सुंदर नकोच..
फक्त जरा “लाजरी” मिळावी..!!
मी कुठे म्हणालो “परी” मिळावी..
एवढच की जरा “बरी” मिळावी..!!
आयुष्य हे
विधात्याच्या वहीतीलं पान असतं….!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं…!
शेवटचं पान
मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं…!
मधली पानं
आपणच भरायची,
कारण
ते आपलंच कर्म असतं…!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायचं नसतं….!
चूक झाली तरी
फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं…..!
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब
आपल्याच हाती असतं
येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी
कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं
आहात तुम्ही ‘सावरायला’
म्हणुन
‘पडायला’ आवडतं,
आहात तुम्ही ‘हसवायला’
म्हणुन
‘रडायला’ आवडतं,
आहात तुम्ही ‘समजवायला’
म्हणुन
‘चुकायला’ आवडतं,
माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे ‘सगळे’
म्हणुन मला ‘जगायला’ आवडतं…
म्हणून मला ‘जगायला’ आवडतं…
म्हणून मला ‘जगायला’ आवडतं…..

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect