#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Showing posts with label 2018. Show all posts
Showing posts with label 2018. Show all posts

Friday, 28 December 2018

मोकळीका - Walk and Stop

मोकळीका - Walk and Stop
उपक्रम व संकल्पना :- आशा चिने

  1. हा खेळ नेमका कसा खेळायचा ? यासाठी कोणतेही नियम किंवा बंधन नाहीत. शब्दाप्रमाणे फक्त चालणे आणि थांबणे या क्रिया करायच्या आहेत.
  2. Walk म्हटल्यानंतर कुठेही चालायचे आहे व stop म्हटल्यानंतर थांबायचे आहे. दोन-चार वेळा कृती करून झाली की या कृतीत बदल करावा. या कृतीचे एकदम उलटे म्हणजे walk म्हटल्यानंतर stop करावे व stop म्हटल्यानंतर walk करावे.
  3. आणखी दोन कृती त्यात ऍड कराव्यात. जसे jump and dance. ह्या ही कृती अगोदर सरळ कराव्यात नंतर उलट.
  4. उलट सुलट क्रिया करण्यासाठी लक्ष द्यावे लागते आणि त्यामुळे होणारी गंमत यामुळे हा खेळ खुप आनंददायी वाटतो.
अशाच आणखी आनंददायी उपक्रमांसाठी भेट द्या...
Visit my blogs...

follow me on Facebook:-
https://goo.gl/MPbk2v

Follow me on Twitter :- 
Asha Chine @aashachine
https://twitter.com/aashachine

"Asha Chine" you-tube channel :-
Like, share, subscribe and press Bell icon...
https://m.youtube.com/channel/UCWsG4i...
उपक्रम व संकल्पना :- आशा चिने




Wednesday, 5 December 2018

ताण तणावाचे व्यवस्थापन- उपक्रम/ खेळ/ मोकळीका


    विशिष्ट कृतीनंतर येणारा कंटाळा/ताण आपण या उपक्रमातून घालवू शकतो आणि अध्यापनात रंजकता आणू शकतो.

      हा उपक्रम कसा राबवायचा?
    उपस्थित संख्येच्या अनुसार आपण खुर्च्यांचा गोल तयार करून घ्यायचा आहे. त्या भोवती सर्व विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी फिरायचे आहे. हे करत असताना सोबतच संगीत वाजेल संगीत, संगीत जेव्हा थांबेल, त्यावेळेस प्रेरक विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना काही सूचना देईल त्या सूचनांचे पालन विद्यार्थ्यांनी करायचं आहे. किंवा प्रश्न दिला जाईल, तो प्रश्न सोडवायचा, मगच खुर्चीवर बसायचं. जेवढ्या खुर्च्या असतील तेवढे विद्यार्थी बसतील बाकी बाकीचे विद्यार्थी आउट होतील. या पद्धतीने खेळ पुढे चालू ठेवायचा आहे. एक एक खुर्ची कमी करत जावी.
   यामध्ये आपण विद्यार्थ्याचा वयोगट, काठिण्यपातळी तसेच घ्यावयाचे घटक या बाबींचा मुख्यता विचार करावा. खूपच मनोरंजक असा उपक्रम आहे त्यामुळे उपक्रमांमध्ये यश नक्कीच मिळते.
      उपक्रम कसा वाटला मला जरूर कळवा. आपण हा उपक्रम खेळ किंवा मोकळीके च्या स्वरुपात सुद्धा घेऊ शकतो. तसेच यामध्ये आपण घटक बदलवून रंजकता आणू शकतो.

     हा उपक्रम कसा घेतला? यासंदर्भातील एक व्हिडिओ आपल्याला युट्युब वर उपलब्ध आहे.


    अशाच आणखी व्हिडिओ साठी चॅनल सबस्क्राईब करा. व बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओच्या अपडेट्स आपल्याला मिळत राहतील.


     (या चॅनेल मध्ये आपल्यासाठी ई-लर्निंग, कविता, नाटक, स्नेहसंमेलन, उपक्रम, ज्ञानरचनावाद, तंत्रज्ञान , इत्यादी विषयावरील स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ आहेत.)

Visit my blogs...
प्रगतीच्या प्रकाशवाटा - gurewadi.blogspot.in
ज्ञानामृत - talevasti.blogspot.in

follow me on Facebook:-

Follow me on Twitter :- 
Asha Chine @aashachine

"Asha Chine" you-tube channel :-
Like, share, subscribe and press Bell icon...


उपक्रम संकल्पना-
श्रीमती आशा ज्ञानदेव चिने
जिल्हा परिषद शाळा गुरेवाडी 
तालुका -सिन्नर नाशिक


Thursday, 16 August 2018

१५ ऑगस्ट २०१८ शाळा गुरेवाडी

१५ ऑगस्ट २०१८ शाळा गुरेवाडी
 72व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी, केंद्र-मुसळगाव, तालुका-सिन्नर येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जय हिंद

























VIEW PDF

WATCH VIDEO


THANK YOU
FOR MORE VIDEOS PLEASE SUBSCRIBE MY CHANNEL
ASHA CHINE
also visit
ashachine.blogspot.in
&
talevasti.blogspot.in

Monday, 2 July 2018

माझी बदली अन् निरोप

   
  


#बदली निमित्ताने मनातील थोडी धगधग.
        2009 मध्ये नांदगाव मध्ये पाऊल ठेवले, शाळा तळेवस्ती येथे प्रथमच रुजू होण्यासाठी. ऑर्डर वरील शाळेचे नावही वाचताना होणारी अडचण, अन् शाळा पाहूनच आलेली निराशा भयानकच होती. कारण शाळा मेंढपाळ लोकांच्या घरात भरत होती- जिथे रात्री मेंढ्या बसायच्या अन् दिवसा आम्ही. वडील भावाप्रमाणे गोरख जाधव सरांनी सांभाळून घेत माझा शाळा प्रवास सुरु झाला. सुरुवातीचे काही वर्षे प्रशासन, परिस्थिती समजून घेताच कसे निघून गेले कळलेच नाही.
            दरम्यान 'माझी समृद्ध शाळा' उपक्रम राबवत असताना आलेल्या तुमच्या शाळेची ब्लॉग-वेबसाईट आहे का?  ह्या एका प्रश्नाच्या उत्तराखातर मिळालेली संजीवनी अविस्मरणीयच ठरली. शून्य अनुभवातून सुरू केले स्वतःचेच स्वतःशी क्लास. गुगललाच गुरू बनवलं. अन् तालुक्यातला "ज्ञानामृत"(talevasti.blogspot.in) हा प्रथम शाळेचा ब्लॉग अवतरला. या एका क्षणाने माझी ओळखच बदलली. आनंद गगनात मावेना. मग मी शाळेतील उपक्रम ब्लॉग व युट्युबद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवू लागले. 
         बाल आनंद मेळावा, स्नेहसंमेलन, महिला मेळावा, पालक भेट, वृक्षारोपण, संगीतमय परिपाठ, ज्ञानरचनावाद, व्हिडीओ निर्मिती,आनंददायी अध्ययन-अध्यापन सारखे विविध उपक्रम राबविता-राबविता शाळा उपक्रमशील झाली. शाळेला संगणक, टीव्ही, टॅब मिळाला अन् शाळा डिजिटल झाली.
         मी शाळेतील प्रथम महिला शिक्षिका आणि प्रत्येक शाळेत महिला शिक्षिका हवीच. मुले माझ्याभोवती रेंगाळू लागले जसं आई अन् लेकरू. शाळा ही माझं कुटुंबच बनली. माता भगिनीं(मैत्रिणी)मुळे उपक्रम फुलून जायचे. पालकांना आम्हां शिक्षकांचं खूप कौतुक असायचं. अजूनही आहे. पण बदलीच्या वाऱ्याने पालकांचं मन दुखावलं गेलं.
         कार्यालयाची सोपस्कर आटोपून तळेवस्ती शाळेत बदलीनंतर आज प्रथम पाऊल ठेवलं. सर्वजण माझी वाटच पाहत होते. मी येताच सर्वांनी हातातील कामे सोडून धावत पळतच शाळेकडे धाव घेतली. काही विद्यार्थी अगोदरच व्हरांड्यात येऊन बसलेले होते. पालकही वार्ता कळताच हजर. सर्वजण फक्त डोळ्यांतूनच बोलत होते. पालकांनी माझ्या निरोपाचा कार्यक्रम ठेवला. एका अनामिक दुःखाचा आवंढा गिळत निरोपाची रेलचेल शाळेत सुरू झाली. सर्व महिलांनी शाळेत जेवणाची तयारी केली पण प्रथमच मला सोडून.आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकानेच माझ्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. हे सर्व बघून मन सतत भरून यायचं. कसं सावरायचं स्वतःला अन् या सर्वांना. तुम्ही जाऊ नका ना! हे वाक्य ऐकताना आभाळ फटल्यागत व्हायचं. सर्वांच्याच नयनी आसवांचे पूर. भरलेले डोळे खूप काही बोलत होते. अन् माझी अवस्था? मी काय सोडून आले? याची तिळमात्र कल्पनाही कोणी करू शकत नाही. मी माझं सर्वस्वच तळेवस्तीला सोडून आले.
          खरंच ! किती हे प्रेम! आपल्या लोकांपेक्षा जास्तच माया यांनी लावली, जणू सर्वस्वच झाले. सर्वांनी माझा जो सन्मान केला माझ्यासाठी तो सर्वोच्च पुरस्कारच म्हणेन. त्यांच्या या रुणाची उतराई होणं कठीणच. मी पालकांच्या परीक्षेत खरी उतरल्याचं समाधान मला मिळालं. मी भाग्यवान आहे की मी शिक्षक आहे. आणि माझा अट्टाहास हाच होता की जे मला नाही मिळालं ते सर्व या बालकांना मिळावं आणि त्यांनी सुसंस्कृत व्हावं. सर्वच उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण अन् निकोप असावं.आणि हो, तशीच संस्कारक्षम पिढी ह्या शाळेत शिक्षण घेत आहे. तळेवस्तीचा शाळा हा प्रवास नेहमीच अविस्मरणीय राहील, कारण आमचे ऋणानुबंध तेवढे घट्ट होते.
        बदली माझ्या गावाकडं झाली पण कुठे आहे तो आनंद? नांदगाव तालुक्याने मला खूप काही दिले- शिकण्याची संधी अन् संधीचे सोने करण्यासाठी सुंदरशी परिस्थिती. माझ्या पोखरी केंद्रात मला खूप प्रेमळ माणसं मिळाली. गोरख जाधव सरांनी शाळा प्रवासात माझी खूप चांगली सोबत केली. कदाचित तशी सोबत पुन्हा होणे नाही.विस्तार अधिकारी ठोके मॅडम यांचे मी विशेष धन्यवाद मानेन, कारण त्यांनी मला सदैव शाबासकी देऊन खूप मोठं बनवलं. सर्वांचेच विशेष आभार. अशीच साथ सदैव असू द्या.












photo credit- shri Gorakh Jadhav sir

आशा चिने
शाळा गुरेवाडी,ता. सिन्नर (नवीन शाळा)
जि प प्राथ. शाळा तळेवस्ती गंगाधरी, ता नांदगांव (नाशिक)- प्रथम शाळा

Monday, 18 June 2018

शाळा प्रवेशोत्सव , शाळा गुरेवाडी, 2018


शाळा प्रवेशोत्सव , शाळा  गुरेवाडी, 2018 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी, ता. सिन्नर शाळेत प्रवेशोत्सव जल्लोशात साजरा

दि. 15 जून 2018 रोजी जि प प्रा शाळा गुरेवाडी, ता. सिन्नर येथे शेक्षणिक वर्ष 2018-19 ची सुरवात प्रवेशोत्सवाने करण्यात आली.
आदल्या दिवशी संध्याकाळी संपुर्ण गावातुन मशालफेरी चे आयोजन करण्यात आले. मशाल फेरी मधे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी झाले.
15 जून रोजी सकाळी 8 वाजता नविन प्रवेशित विद्यार्थ्यांना सजवलेल्या रथातुन वाजतगाजत शाळेमधे आणण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच नविन दाखल विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे हस्ते गुलाबपुष्प देउन स्वागत करण्यात आले. शालेय जीवनात प्रवेशाची आठवण म्हणुन पहिलीत दाखल प्रत्येक विद्यार्थ्यांचा पावलाचे ठसे घेउन जतन करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. दुपारच्या पोषण आहार सोबत गोड रवा देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय परिसर तोरण तसेच पताका बांधून सडा रांगोळी काढून सजवण्यात आला होता.
या संपूर्ण कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती पद्मा एनगंदुल मॅडम व श्रीमती आशा चिने यांनी केले. उपस्थितांचे आभार मानण्यात आले..सर्व कार्यक्रम आपण खाली पाहू शकता...
शब्दांकन
श्रीमती आशा चिने,
शाळा गुरेवाडी, केंद्र- मुसळगाव, सिन्नर



Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect