#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

ब्लॉग म्हणजे काय ?

ब्लॉग म्हणजे काय ?
 ब्लॉग म्हणजे स्वत:ची थोडी वेगळी वौशिष्ट असलेली एक प्रकारची वेबसाईट म्हणता येईल.
एखादी वेबसाईट बनवायची असल्यास २-३ सॉफ्ट्वेअर्सचा वापर करावा लागतो वेबसाईटचे डिझाईन , लेआऊट , आराखडा, लिंक्सची रचना ईत्यादी बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. तशा या सर्व गोष्टी तितक्या किचकट नसल्यातरी बऱ्याच गोष्टी एकत्र आणल्यानंतर वेबसाईट बनते. परंतू ब्लॉगचे तसे नाही . ब्लॉग बणविणे खरच फार सोपे असते. ब्लॉगमधिल सर्वच गोष्टी साध्या ( निदान दिसायला ) असल्याने ब्लॉग बनविणे फार सोपे असते.
ब्लॉग म्हणजे एखाद्या वेबसाईट प्रमाणे आपल्याला हवी असलेली माहीती इंटरनेटवर ठेवणे.
आपल्या ब्लॉगवर कायलिहावे आणि कधी लिहावे याला बंधने नाहीत . कुणीही कधीही आपला ब्लॉग उघडून त्यावर कितीहीवेळा लिहू शकतो एखादी घटना , गोष्ट, कविता, विनोद , सल्ला, माहीती, कूती , संदेश इत्यादी इतकच की आपला अनुभव , समस्या , अडचणी आणि त्यावर तोडगे अगदी काहीही आपण आपल्या ब्लॉगवर लिहू शकतो.
ब्लॉगवर फक्त त्या ब्लॉगच्या मालकाला माहिती लिहिण्याचीच नाही तर ती माहीती वाचणाऱ्यांना त्यावर आपले अभिप्राय लिहिण्याची देखिल सोय असते त्यामुळे ब्लॉगव्दारे माहितीची देवाण घेवाणीचे काम चांगल्या प्रकारे होतो.
सध्या काही वेबसाईट मोफत ब्लॉग सेवा देतात. या वेबसाईटवर ब्लॉदबनविण्यासाठी एक अगदी सोपा प्रोग्राम बनविलेला असतो एखाद ई-मेल सुरु करताना जितकी माहीती विचारली जाते त्याही पेक्षा कमी माहिती विचारुन काही क्षणामध्ये एखादा ब्लॉग सुरु करता येतो.

 मराठीमध्ये ब्लॉग कसा लिहावा ?
 ब्लॉग फक्त इंग्रजीमध्ये नाही तर मराठीत देखिल (आणि इतर भाषांमध्ये देखिल)  व्यवस्थित सुरु करता येतो. म्हणजेच आपल्या ब्लॉगवर मराठीमध्ये कोणतीही माहिती लिहिणे आता तितकेसे कठीण नाही. याचे उदाहरण म्हणजे सध्या मराठीमध्ये शेकडो ब्लॉग आहेत.
ब्लॉगवर मराठीमध्ये लिहिण्यासाठी ते मराठी युनिकोड प्रकारातील असणे आवश्यक आहे कॉम्प्युटरमध्ये मराठी लिहिण्याच्या प्रणालीतील युनिकोड हा एक नविन आणि अघयावत प्रकार आहे. सध्यातरी युनिकोड मध्ये लिहिणे सहज सोपे नसले तरी तितकेच कठिणही नाही.
जगभरातील जवळजवळ सर्वच भाषांचा आता ब्लॉगमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामूळे सुरवातीलाच लॉगिन करता आपण आपली भाषा निवडल्यास ब्लॉगवर मराठीमध्ये लिहिण्याची सोय आपोआप दिसू लागते.

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect