#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर




जन्मतारीख:एप्रिल १४इ.स. १८९१
महापरिनिर्वाण:डिसेंबर ६इ.स. १९५६                    
भारतीय घटनेचे शिल्पकार [१]
जन्मस्थान:महूमध्य प्रदेश
राष्ट्रीयत्व:भारतीय
धर्म:बौद्ध
पत्‍नीरमाई भीमराव आंबेडकर आणि डॉ.सविता आंबेडकर ऊर्फ माई (माहेरच्या शारदा कबीर)
अपत्ये:यशवंत भीमराव आंबेडकर
आई:भिमाई रामजी आंबेडकर
वडील:रामजी मालोजी आंबेडकर

जीवनेतिहास

अ.क्र.दिनांक / महिनाइ.स.घटना
१.१४ एप्रिलइ.स.१८९१महू गावी जन्म.
२.इ.स.१८९६आई, भिमाईचे निधन
३.नोव्हेंबरइ.स.१९००सातार्‍याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
४.इ.स.१९०४एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
५.इ.स. १९०६रमाई यांचेशी विवाह
६.इ.स.१९०७मॅट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
७.इ.स.१९०८जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
८.इ.स.१९१२मुलगा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्म झाला.
९.इ.स. १९१३बी.ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
१०.जूनइ.स.१९१५एम.ए.ची परीक्षा पास झाले.
११.जूनइ.स.१९१६कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
१२.इ.स.१९१७कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली.
१३.जूनइ.स.१९१७लंडनहून एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
१४.इ.स.१९१८साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
१५.नोव्हेंबरइ.स.१९१८सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
१६.जून ३१इ.स.१९२०साप्ताहिक मूकनायक सुरू केले
१७.मार्च २१इ.स.१९२०कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
१८.जूनइ.स.१९२१लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.
१९.मार्चइ.स.१९२३रुपयाची समस्या हा प्रबंध व डी.एस्‌‍सी.(अर्थशास्त्र) ही पदवी
२०.२० जुलैइ.स.१९२४बहिष्कृत हितकारिणी सभास्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
२१.२० मार्चइ.स.१९२७चवदार तळे सत्यागृह
२२.एप्रिल ३इ.स.१९२७बहिष्कृत भारत नावाचे वृतपत्र सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली
२३.सप्टेबरइ.स.१९२७समाज समता संघ स्थापन केला.
२४.इ.स.१९३४परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
२५.मे २६इ.स.१९३५रमाई भीमराव आंबेडकरयांचे निधन
२६.ऑक्टोबर १३इ.स.१९३५येवला, येथे धर्मांतराची घोषणा
२७.ऑगस्टइ.स.१९३६स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना
२८.डिसेंबरइ.स.१९४०थॉट्स ओन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
२९.जुलैइ.स.१९५१भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
३०.मेइ.स.१९५३मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना
३१डिसेंबर २५इ.स.१९५५देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना

सुरुवातीचे जीवन


तरुणपणचे बाबासाहेब[५]
मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे पुत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.
डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्‍नागिरीजिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे मोठे काम आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत.
रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुंबमुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.[६] इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. याआधी इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरले. यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडयांनी २५ रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला.

२ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला.

कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे.

शिक्षण

  • पदवी- एम.., पीएच. डी,. डी.एस्‌सी, एल्‌एल.डी., बॅरिस्टर ॲट लॉ.

प्राथमिक शिक्षण

भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला.

उच्च शिक्षण

  • बी.ए.
डॉ. बाबासाहेब तथा बी.आर.आंबेडकर यांनी मुंबई येथीलएलफिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३मध्ये ते बी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाडयांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला.

महाराज बडोदा संस्थानच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. महाराज भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर अत्यंत प्रसन्न होते. महाराजांनी, भीमरावांना होकार दिल्यामुळे दि. ४ एप्रिल १९१३रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकार्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी फक्त चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करार पत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८/४/१९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत दि. १५/६/१९१३ ते १४/६/१९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर बोटीने प्रवास करून डॉ. आंबेडकर दिनांक २० जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता न्यूयॉर्क येथे पोहचले.

बडोदा संस्थानचे स्कॉलर म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतील न्यूयॉर्कशहरातील जगप्रसिद्ध कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले.राज्यशास्त्र शाखेमध्ये त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय म्हणून समाजशास्त्रइतिहास, राज्यशास्त्र,मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे निवडले. अमेरिकेतील वास्तव्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एम.ए. आणि पीएच्.डी. या पदव्या संपादन करायच्या होत्या. न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या हाईले हॉलमध्ये राहिले आणि नंतर रस्ता नं. ११४वरील कॉस्मोपॉलिटन क्लब, न्यूयॉर्क पश्चिम ५६४ इथे राहिले. कारण इथे काही भारतीय विद्यार्थी रहात होते. तसेच सातारा हायस्कूलमधील एक वर्गमित्रसुद्धा तिथेच होता.

  • एम.ए.
एम.ए.या पदवीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेले होते. ते केवळ पदव्या मिळवण्यासाठीच नाही तर अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळवायचे होते.या विषयांचा सखोल अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठला दि. १५ मे १९१५ रोजी ॲडमिनिस्ट्रेशन ॲन्ड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २/६/१९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, असा विद्यार्थी कोण याची उत्सुकता लाला लजपतराय यांना होती. त्या अनुषंगानेही ओळख झाली होती. लाला लजपतराय हे लंडनहून न्यूयॉर्कला आलेले होते. असेच एकदा या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संवाद सुरू असताना प्राध्यापक सेलिग्मन तिथे आले. प्रा. सेलिग्मन यांचे संपूर्ण नाव एडविन रॉबर्ट अँडरसन सेलिग्मन होय. त्यांनीसुद्धा या दोघांच्या संवादात भाग घेतला. प्राध्यापक एडविन सेलिग्मन हे .बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचं सखोल ज्ञान ऐकून होते. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गौरवपर उद्गार काढले, ते म्हणाले,

‘भीमराव आंबेडकर हिंदी विद्यार्थ्यांमध्येच केवळ श्रेष्ठ आहेत असं नाही, तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येसुद्धा ते श्रेष्ठ आहेत.’

प्रा. सेलिग्मन ज्यूधर्मीय होते. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पी.एच्.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबाबत म्हणतात, ‘अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्तावस्थेमध्ये होते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा विकास करण्याचे काम प्रा.सेलिग्मन आणि इतर विद्वानांकडून झाले. अमेरिकेतील १९१३ ते १९१६च्या वास्तव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात काही चांगले मित्र आणि विद्यापीठातील प्राध्यापक, मार्गदर्शक आले. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं प्रा. सेलिग्मन यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. सिडनेहॅम कॉलेजमध्ये शिकवत असताना अनेक विद्यार्थ्यांना आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात प्रा. एडविन सेलिग्मन यांच्याकडे पाठवले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पीएच.डी.साठीचा विषय ‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन’ The National Divident of India  : A Historical And Analytical Study. १९१३ ते १९१७ या कालावधित विद्याभ्यासाच्या परिश्रमाने लिहिलेला हा प्रबंध होता. अवघ्या २५ वर्षांच्या भीमराव आंबेडकरांनी एवढ्या गहन विषयावर प्रबंध लिहून ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकून, अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचं अभ्यासपूर्ण विवेचन करून जगातील सर्व देशांचे लक्ष या प्रबंधाकडे वेधून घेतले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. जगभरातील देशांना उपयोगी ठरणारा हा प्रबंध लिहिला. प्रा. सेलिग्मनसारख्या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने या प्रबंधाचा गौरव केला. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे १९२५मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. आला. ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ (Evolution of Provincial Finance in British India). हा ग्रंथ त्यांनी उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना आदरपूर्वक अर्पण केला. हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. या ग्रंथात ब्रिटिशांवर प्रखर टीका करून आपण खरे राष्ट्रभक्त असल्याचे २६ व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले.

दिनांक ९ मे १९१६रोजी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्र प्राध्यापक डॉ. ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसार भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी Caste in India. Their Mechanism, Genesis And Development हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या साऱ्याच विद्वानांचे लक्ष वेधले होते. The American Journal of Sociology या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग ‘या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङ्मय’ World’s Best Literature Of The Month या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. या सन्मानार्थ कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांनी आणि विद्यार्थ्यांनी एक मेजवानीही डॉ. आंबेडकरांना दिली. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सनातनी समाजरचना विरुद्ध आधुनिक समाजरचना या विषयावर मोठा खल होत असे. या परिसंवादांमध्ये डॉ. आंबेडकर भाग घेत असत. मानववंशशास्त्रांच्या (Anthropolopy) शाखांमार्फत चालणाऱ्या या चर्चांमध्ये विद्वत्ताप्रचुर संशोधनात्मक प्रबंध वाचले जात होते. त्यामुळे या विषयावर खोलवर अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांतील सूक्ष्म ज्ञानामुळे त्यांनी जातीवरील प्रबंध लिहिताना सर्वस्वी नवीन असा सिद्धान्त उभा केला.

अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातले चित्र आणि अमेरिकेतील चित्र वेगवेगळे दिसून आले. इथे शिवाशिवीचा/ अस्पृश्यतेचा प्रश्नच नाही, कोणत्याही प्रकारची मानहानी नाही. अमुक विषय घ्यायचा तमुक विषय घ्यायचा नाही असे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कारण अमुकच जातीत जन्म घेतला आहे. अमुक जातीतील जन्मामुळे केस कापणे, कपडे लाँड्रीला देणे, वाहनात बसू न देणे, पिण्याचे पाणी न देणे, शाळांमध्ये शिक्षक दुरून छड्या मारतात असे चित्र अमेरिकेत पहायला मिळत नव्हते. प्रोफेसर कितीतरी आत्मीयतेने शिकवत होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील विद्वान प्रोफेसर सेलिग्मन आणि प्रो. सिगर हे विद्यार्थी भीमरावांशी समतेच्या भूमिकेवर चर्चा करत असत आणि शिकवत असत. या घटनांतूनच डॉ. आंबेडकरांना नवचैतन्य प्राप्त झाले. समतेची मिळालेली अमेरिकेतील वागणूक डॉ. आंबेडकरांच्या मनावर खोलवर बिंबली होती. त्यामुळेच पुढे भारतात आल्यावर समतेवर आधारित समाजरचना घडवण्यासाठी सारे सामाजिक लढे झालेले दिसून येतात.[७]

अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष

बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्यानेगव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातीलमागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळेछत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.

चवदार तळे सत्याग्रह

इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.

काळाराम मंदिर सत्याग्रह

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामीकाळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले. २ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते, तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे सभासद म्हणून समाविष्ट झाले होते. या कमिटीतर्फे महाराष्ट्रभर सत्याग्रहाबद्दल जनजागृती करण्यात आली. शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर मूळचे निफाड तालुक्यातील, पण नाशिकला मोठा राजवाडा परिसरात स्थायिक झाले होते.

रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. गोदावरीच्या तीरावर जनता सत्याग्रहासाठी सज्ज होती. ब्रिटिश पोलिसही रामकुंडावर पहारा देत होते. शहरात तणावपूर्ण शांतता होती.

अंगरखा, धोतर, पुणेरी जोडा, पंचा, कपाळावर गंधाचे तीन आडवे पट्टे व मधोमध लाल रंगाचा गोल कुंकवासारखा टिळा अशा वेशात शंकरराव २ मार्चला रामकुंडावर आले व अंगातील वेश उतरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. आंबेडकरी चळवळीतील तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.

सत्याग्रह यशस्वी करणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मोठया राजवाड्यातील जाहीर सभेत या धाडसाबद्दल त्यांना बेलमास्तर ही पदवी बहाल करण्यात आली.

सत्याग्रहाबद्दल गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्यांना तुमचा जामीनदार कुठे आहे’, अशी विचारणा करताच त्यांनी डॉ. आंबेडकर माझे जामीनदार असून ते इंग्लंडमध्ये आहेत, असे सांगितल्याने न्यायालयाने त्यांना सात दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.

डॉ. आंबेडकर यांनी भारतात परतल्यावर दादासाहेब गायकवाड, सावळीराम दाणी, सखाराम वस्ताद काळे, तुळशीराम काळे, अमृतराव रणखांबे, रंगनाथ भालेराव व भादुजी निकाळे यांच्या उपस्थितीत बेलमास्तरांचा सत्कार केला.
वीर शंकरराव गायकवाड यांचे १६ ऑक्टोबर १९५६ ला निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नाशिक-पुणे रोडवर वडाळा नाक्यावरील चौकाचे भूतपूर्व नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या हस्ते शंकरराव श्रावण गायकवाड ऊर्फ बेलमास्तर चौक असे नामकरण करण्यात आले. [८]

इ.स. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनाबरोबरकाम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले.

पुणे करार

इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणऱ्या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेसयांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचासमाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी हिंदू संतापले.
  • पुणे करार (संक्षिप्त मसुदा)
  •      
  • १) प्रांतीय विधानसभांमध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी ज्या राखीव जागा ठेवण्यात येतील त्या येणेप्रमाणे : मद्रास-३०, मुंबई व सिंधमिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मध्यप्रांत-२० अशा प्रकारे एकूण १४८ जागा अस्पृश्यांसाठी देण्यात येतील.
  •    
  • २)या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी दलितवर्गातील ४ उमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवारांतून ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.
  •    
  • ३)केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील कलम दोननुसार होईल.
  •    
  • ४)केंद्रीय कारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल
  •    
  • ५)उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था ज्यांचा वर उल्लेख केला आहे अशा केंद्रीय तसेच प्रांतिक कार्यकारिणींसाठी पहिल्या १० वर्षांनंतर समाप्त होईल.
  •    
  • ६)जोपर्यंत दोन्ही संबंधित पक्षांद्वारा आपसांत समझौता होऊन दलितांच्या प्रतिनिधीस हटविण्याचा सर्वसंमत निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व कलम १ व ४ मध्ये दिले आहे त्याप्रमाणे अंमलात असेल.
  •    
  • ७)केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणुकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समितीच्या अहवालानुसार असेल.
  •    
  • ८)दलिताना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीसाठी जातीय कारणामुळे डावलल्या जाऊ नयेत. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.
  •    
  • ९)सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.
असा होता पुणे करार :-
मसुदा तयार झाला, आता सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यानी एम.सी. राजा यानी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबांना सही करू देणार नाही अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण या एम.सी. राजांनी मुंजेसोबत जो करार केला होता तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे अशा अस्पृश्यद्रोहींनी या करारावर सही करू नये अशी मद्रासच्या दलितांची मागणी होती. शेवटी यातही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली.

इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या. अन तिकडे तुरुंगांतही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यांनी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.अस्पृश्यतानिवारणा बाबत गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर कॉग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे 'करारा' वर सही केली. नथुराम गोडसे सारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे अत्रे यांना दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही. आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकांत पराभव केला[९]



२५ सप्टे १९३२ रोजी सर्व पुढारी करार मंजूर करण्यासाठी मुंबईत आले. ब्रिटिश महाराज्यपालाना या कराराची माहिती तारेने कळविण्यात आली. मुंबई राज्यपालांच्या कार्यवाहांना दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी प्रत्यक्ष माहिती दिली. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्रिमंडळाने पुणे करार मंजूर करून घेतला. त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. तिकडे दिल्लीत हिंदु महासभेनेही आपली मंजुरी दिली. अशा प्रकारे पुणे करार घडवून गांधीनी दलितांचे अत्यंत महत्त्वाचे असे दोन अधिकार काढून घेतले. मात्र हेच अधिकार शीखमुस्लिम व ख्रिश्चनांना खुशाल बहाल केले.[१०]



इ.स. १९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी. एस. मुंजे[११][१२] व जाधव यांबरोबर एक करार केला. या करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागाअनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविले. या घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली. आंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधार वाढला आणि त्यांना इ.स. १९३१ साली लंडन येथील दुसर्‍या गोलमेज परिषदेचे निमंत्रण आले. या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते, त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती.

जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठका घेतल्या. गांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिली. यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले, तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सखोल जाणून घेण्यासाठी येथे  click करा.
Source wikipedia.....

बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • १६.माझी आत्मकथा - अनुवाद : राजेंद्र विठ्ठल रघुवंशी, रघुवंशी प्रकाशन, पुणे, १९९३.
  •    
  • १७.हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान - अनुवाद : गौतम शिंदे, मनोविकास प्रकाशन, मुंबई १९९८.
  •    
  • १८.दलितांचे शिक्षण - अनुवाद : देवीदास घोडेस्वार, संपादक: प्रदीप गायकवाड, क्षितिज पब्लिकेशन, नागपूर, २००४.
  •   

बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिली गेलेली पुस्तके

ललित

  • ४.आंबेडकर - नलिनी पंडित, ग्रंथाली प्रकाशन.
  •      
  • ९.भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - म.श्री. दीक्षित, स्नेहवर्धन प्रकाशन.
  •    
  • ११.महाकवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - वामन निंबाळकर, प्रबोधन प्रकाशन.
  •    
  • १५.डॉ. बाबासाहेब आणि आम्ही - आहेर अविनाश, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६.
  •    
  • २८.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा - इंद्रायणी साहित्य, पुणे.
  •    
  • २९.प्रबुद्ध - खेर भा. द., मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८९.
  •    
  • ३८.डॉ. आंबेडकर आणि विनोद : एक शोध - दामोदर मोरे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९९४.
  •    
  • ५२.गोष्टी बाबांच्या, बोल बाबांचे - कुलकर्णी रंगनाथ, १९९१.
  •    
  • ५७.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र - संपादक : धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८१.
  •   

ललितेतर

  • १.आंबेडकर यांचे राजकीय विचार - भ. द. देशपांडे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
  •    
  • २.आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी - कृष्णा मेणसे, लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन.
  •    
  • ३.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात - शंकरराव खरात, इंद्रायणी साहित्य.
  •    
  • ५.आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना - डॉ. रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
  •    
  • ६.आंबेडकर आणि मार्क्स - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
  •    
  • ७.डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन
  •    
  • ८.बाबासाहेब आंबेडकरांवरील संक्षिप्त संदर्भ सूची - धनंजय कीर.
  •    
  • १०डॉ. आंबेडकरांचे अंतरंग- द. न. गोखले, मौज प्रकाशन.
  •    
  • १२.आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार - रावसाहेब कसबे, सुगावा प्रकाशन.
  •    
  • १३.डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य(अध्यक्षीय व इतर भाषणे) - संपादक : अडसूळ भाऊसाहेब, महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, मुंबई, १९७७.
  •    
  • १४.भीमकालदर्शन (दिनदर्शिका-संपादक सुहास सोनवणे
  •      
  • १९.आंबेडकर आणि मार्क्स - सुगावा प्रकाशन, पुणे, १९८५.
  •    
  • २०.ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - काळे वि. र. , वसंत बुक स्टॉल, मुंबई, २००४.
  •    
  • २१.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटनेची मीमांसा - अमृतमहोत्सव प्रकाशन, मुंबई, १९६६.
  •    
  • २२.संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बी.सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७२.
  •    
  • २३.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार - बी. सी. कांबळे प्रकाशन, मुंबई, १९७३.
  •    
  • २४.मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉ. आंबेडकर - कांबळे सरोज, सावित्रीबाई ङ्गुले प्रकाशन, १९९९.
  •    
  • २५.डॉ. आंबेडकर विचारमंथन, - कुबेर वा. ना., लोकवाङ्‌मयगृह प्रकाशन, मुंबई.
  •    
  • २६.पत्रांच्या अंतरंगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर - खरात माधवी, श्री समर्थ प्रकाशन, पुणे, २००१.
  •    
  • २७.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे - खरात, शंकरराव, श्री लेखन वाचन भांडार, पुणे, १९६१.
  •    
  • ३०.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे - क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००२.
  •    
  • ३१.डॉ. आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान - जाधव नरेंद्र, सुगावा प्रकाशन, पुणे, १९९२.
  •    
  • ३२.डॉ. बाबासाहेब आणि स्वातंत्र्य चळवळ - जाधव राजा आणि शहा जयंतीभाई, राजलक्ष्मी प्रकाशन, १९९४.
  •    
  • ३३.भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, विचार, कार्य आणि परिणाम - यदुनाथ थत्ते, कौस्तुभ प्रकाशन, नागपूर, १९९४.
  •    
  • ३४.डॉ. बाबासाहेब आंबेडकर-नियोजन, जल व विद्युत विकास: भूमिका व योगदान - थोरात सुखदेव, अनुवाद : दांडगे, काकडे, भानुपते, सुगावा प्रकाशन, पुणे, २००५.
  •    
  • ३५.डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचे कैवारी, - देशपांडे रा.ह., अनुवाद : गोखले श्री. पु., नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई.
  •    
  • ३६.डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ - संपादक : दया पवार , महराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९९३.
  •    
  • ३७.भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - संजय पाटील, निर्मल प्रकाशन, नांदेड, २००४.
  •    
  • ३९.डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास - शेषराव मोरे, राजहंस प्रकाशन, पुणे, १९९८.
  •    
  • ४०.डॉ. आंबेडकर : एक चिंतन - मधु लिमये, अनुवाद : अमरेंद्र, नंदू धनेश्वर, रचना प्रकाशन, मुंबई.
  •    
  • ४१.प्रज्ञासूर्य - संपादक : शरणकुमार लिंबाळे, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९१.
  •    
  • ४२.डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म - प्रभाकर वैद्य, शलाका प्रकाशन, १९८१.
  •    
  • ४३.भीमप्रेरणा : भारतरत्‍न बाबासाहेब आंबेडकर यांचे १०० मौलिक विचार - संपादक : अ.म. सहस्रबुद्धे, राजा प्रकाशन, मुंबई, १९९०.
  •    
  • ४४.संविधान सभेत डॉ. आंबेडकर - जयदेव गायकवाड, पद्मगंधा प्रकाशन.
  •    
  • ४५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - डॉ. सौ. अनुराधा गद्रे, मनोरमा प्रकाशन.
  •    
  • ४६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र - विजय जाधव, मनोरमा प्रकाशन.
  •    
  • ४७. बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. सुभाष गवई, ऋचा प्रकाशन.
  •    
  • ४८. ज्योतिराव, भीमराव - म. न. लोही, ऋचा प्रकाशन.
  •      
  • ४९.चंदनाला पुसा - डॉ. दा. स. गजघाटे, ऋचा प्रकाशन.
  •      
  • ५०. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सचिन खोब्रागडे, ऋचा प्रकाशन.
  •    
  • ५१.डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नाना ढाकुलकर, ऋचा प्रकाशन.
  •    
  • ५३.विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास - कोसारे एच. एल., ज्ञानदीप प्रकाशन, नागपूर.
  •    
  • ५४.डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (समग्र चरित्र) - एकूण खंड १५, खैरमोडे चांगदेव भवानराव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. ( १ ते ९ खंड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित आणि खंड १० वा सुगावा प्रकाशनातर्फे प्रकाशित).
  •    
  • ५५. आंबेडकर भारत - भाग १ - बाबुराव बागुल, राजहंस प्रकाशन, पुणे.
  •    
  • ५६. आंबेडकर भारत - भाग २ - बाबुराव बागुल, सुगावा प्रकाशन, पुणे.
  •    
  • ५८. आठवणीतले बाबासाहेब, योगीराज बागुल.
  •      
  • ५९. डॉ. आंबेडकरांचे मारेकरी-अरुण शौरी - लेखक डॉ. य दि फडके
  •    
  • ६०. ग्रंथकार भीमराव (संपादक सुहास सोनवणे)
  •      
  • ६१. सत्याग्रही आंबेडकर (संपादक सुहास सोनवणे)
  •      
  • ६२. बहुआयामी (संपादक सुहास सोनवणे)
  •      
  • ६३. शब्दफुलांची संजीवनी (संपादक सुहास सोनवणे)
  •      
  • ६४. डॉ. आंबेडकर आणि समकालीन (संपादक सुहास सोनवणे)
  •    
  • ६५. ग्रंथकार भीमराव (संपादक सुहास सोनवणे)
  • ६६. आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटिश सरकार'- प्रा. डॉ. सी. एच. निकुंभे
  •    
  • ६७. गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  •    
  • ६८. The Social Context of an Ideology - Ambedkar's Political and Social Thoughts (Sage publication-1993) (लेखक : डॉ. मा.स. गोरे)
  •    
  • ६९. Human rights & Indian Constitution : Dr. B.R. Ambedkar : Enduring leagacies (लेखक - डॉ. एस.एस. धाकतोडे)
  •    
  • ७०. डॉ. आंबेडकर दर्शन (लेखसंग्रह, संपादक मनीष कांबळे)
  •    
  • ७१. माणूस त्याचा समाज व बदल -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धान्तन (लेखक : सुधाकर गायकवाड)
  •    
  • ७२. उगवतीचा क्रांतिसूर्य (डॉ. श्रीपाल सबनीस)
  •      
  • ७३. अनाथांचा नाथ डॉ. आंबेडकर (प्रा. अजित पाटेल)
  •    

    •    

      •   
    •   

संकलन
श्रीमती आशा चिने

शाळा तळेवस्ती

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect