दि.८ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे येथे,
मनुष्य बळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट, मुंबई या संस्थेचा राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद व पुरस्कार वितरण महासोहळा-२०१८, संपन्न झाला. मला सांगताना आनंद होत आहे की पुरस्काराची मानकरी होण्याचा सन्मान मला मिळाला. नामवंत पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र पातळीवरील विविध क्षेत्रांतील १११ मानकऱ्यांना गुणिजन गौरव पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. सुप्रसिद्ध किर्तनकारआणि ज्येष्ठ विचारवंत श्री. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी अतिशय प्रभावी बीजभाषण केले. समारंभाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब रसाळ यांची विशेष पाहुणे म्हणून सपत्नीक उपस्थिती होती. उपस्थित मानकरी आणि त्यांच्या सहसोबती प्रतिनिधींनी अतिशय सुंदर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष adv. कृष्णाजी जगदाळे यांनी सूत्र संचालन केले.
मागील वर्षीच मला पुरस्काराचे नामांकन झाले होते. आपण सर्वांनीच शाबासकी देऊन मला मोठं केले. पुरस्काराचे श्रेय आपणा सर्वांना जाते. माझ्या आई वडिलांच्या संस्काराची ही शिदोरी आहे. माझे गुरू, माझ्या मार्गदर्शक शिक्षण विस्तार अधिकारी ठोके मॅडम, माझे सहकारी शिक्षकवृंद गोरख जाधव सर, माझ्या पोखरी केंद्रातील माझे शिक्षक बांधव, माझ्या मैत्रिणी, माझे तळेवस्तीचे विद्यार्थी व पालक वर्ग या सर्वांचा विश्वास आहे हा. त्यामुळे पुरस्काराचे श्रेयही या सर्वांना जाते.
आयोजकांचे मनस्वी आभार...
पुरस्कार प्रेरणा देतात. प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!