गिरणा गौरव प्रतिष्ठान व एस.के.डी चँरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने
साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ
मा.उतम कांबळे - ज्येष्ठ
साहित्यिक
मा.यजुवेंद्र महाजन - चेअरमन
दिपस्तंभ
मा.संजय देवरे -
चेअरमन एस.के.डी
मा. अध्यक्ष गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक
यांच्या प्रमुख उपस्थितीत
मंगळवार ३० जुलै रोजी
सांयकाळी ५ वा.
ठिकाण:परशुराम सायखेडकर नाट्य मंदिर नाशिक
✍
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
गिरणा गौरव प्रतिष्ठान व एस.के.डी.चॕरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय "साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार" दिनांक 30 जुलै 2019 रोजी नाशिक येथे मा.यजुर्वेंद्र महाजन सर - दीपस्तंभ संचालक, श्री.संजय देवरे, श्री.सुरेश पवार यांच्या हस्ते स्विकारला..! पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. तसेच पुरस्कार जबाबदारीची जाणीव करुन देतात. कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता कामाचा गौरव केला म्हणून मी मनःपूर्वक आभार मानते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका गुरूला मिळालेली ही जणू गुरुदक्षिणाच ठरली.
जेष्ठ साहित्यिक, पत्रकार उत्तम कांबळे सर व दीपस्तंभचे संचालक मा.यजुर्वेंद्र महाजन सर यांचे प्रेरणादायी व्याख्यान विचारांना एका विशिष्ट उंचीवर घेऊन गेले. ह्या या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी आपापल्या क्षेत्रात केलेले कार्य आमच्यासाठी पथदर्शी आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना शिक्षण क्षेत्रासंदर्भात अतिशय तळमळीने भाष्य करणारे साहित्यिक उत्तमजी कांबळे साहेब व दिव्यांग , सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य बुद्धिमत्तेच्या तरुण पिढीला सनदी अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्या एका ध्येयवेड्या व महत्त्वकांक्षी तरुण शिक्षकाच्या हातून हा पुरस्कार स्वीकारताना एक सकारात्मक प्रेरणा आम्हा सर्वांना मिळाली.
सध्याच्या यांत्रिक युगामध्ये माणुसकी हरवत चालली आहे म्हणून गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. सुरेश पवार सर, संजय देवरे सर यांचं "माणसं जोडणं" हे कार्य म्हणजे लोखंडाला परिस स्पर्शझाल्यासारखं आहे. आपण आमच्या पंखात गरुड झेप घेण्यासाठी जी उभारी दिली आहे, ते सदैव आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ असेल.
अशा आदर्श व्यक्तीमत्वांना आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देते...!💐
आम्ही गुरुजन आपले सदैव ऋणी आहोत..!
- श्रीमती आशा चिने , जि.प.शाळा डुबेरे, सिन्नर
दिपस्तंभ फाऊंडेशन चे संस्थापक मा. यजुवेंद्र महाजन एस.के.डी.चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मा.संजय देवरे आदी ... मी माझ्या आई-वडिलांसोबत |
जिल्हा परिषद शाळा गुरेवाडी येथील कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. लोकसहभाग मिळत नसल्याने स्वखर्चाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडीचा कायापालट.
त्यात शाळेची अंतर्बाह्य रंगरंगोटी , डिजिटल फ्लेक्स, ई-लर्निंग साठी अभ्यासक्रम, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी लॅमिनेटेड साहित्य निर्मिती, खेळाचे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्व खर्च वगैरे.
स्वच्छता, उपस्थिती व गुणवत्ता या विषयावर प्रामुख्याने काम. संगीतमय परिपाठ, कृतीयुक्त अध्यापनावर भर, दररोज गृहभेटी, वैयक्तिक मार्गदर्शन, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, टाकाऊपासून साहित्य निर्मिती, वृक्षारोपण व संवर्धन, आनंददायी शिक्षण पद्धतीचा वापर, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण करण्यासाठी बक्षिसे, शारीरिक सुदृढतेसाठी खेळ, अभिव्यक्ती विकासासाठी डिजिटल ज्ञानरचनावाद तसेच गरजेनुसार विविध उपक्रम राबविले.
गिरणा गौरव प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या बे दुणे चार या पुस्तकाचे प्रकाशन करतांना जेष्ठ पत्रकार तथा ९१व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक मा.उतम कांबळे दिपस्तंभ फाऊंडेशन चे संस्थापक मा. यजुवेंद्र महाजन एस.के.डी.चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मा.संजय देवरे प्रा.वैशाली गावीत .आदी
|
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!