#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

घोषवाक्य मिनी बॅनर


माझा असाही एक उपक्रम...

*घोषवाक्य मिनी बॅनर*

🖼🖼🖼🖼🖼🖼🖼

   

       कोणत्याही प्रकारची प्रभात फेरी, रॅली अथवा दिंडी असल्यास अशा प्रकारचे घोषवाक्य असणारे मिनी बॅनर बनवायला मला आवडते. स्वः हस्ताक्षरात व थोडं कलात्मकतेने बनवून ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात देते. कार्यक्रम अनुरूप विषय ठरवून घ्यावे. बॅनर प्रत्येकाच्या हातात मिळेलच यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बनवते. हे बॅनर मी प्रजासत्ताक दिनासाठी बनविले होते. यात वेगवेगळ्या विषयांचा समावेश केला होता. जसे. देशभक्ती, शेतकरी, व्यसनमुक्ती, मुलींचे शिक्षण, पर्यावरण इ. A4 कागदावर लॅमिनेशन करून घेतले. हे आपण कायमस्वरूपी सुद्धा वापरू शकतो.


      मुलांना रंगाचं खूप आकर्षण असतं. या उपक्रमाच्या माध्यमातून मुले निरीक्षण करतात. वाचण्याचा, बोलण्याचा आणि कृती करण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांचे नकळत अध्ययन होते. कुतूहल व सृजनशीलता याचा विकास होतो. शोधक वृत्ती जागृत होते. चिकित्सक विचारांना चालना मिळते. आणि बऱ्याच गोष्टी वर्गाच्या बाहेर साध्य होतात. 

         हसत खेळत शिक्षण हेच यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे.








उपक्रम आवडल्यास आपल्या शाळेत नक्की राबवा आणि आपल्या अनमोल प्रतिक्रिया द्या...
धन्यवाद.
🙏🏻
*आशा चिने*, शाळा गुरेवाडी, सिन्नर

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect