#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Unicode Font




♦Unicode Font ♦


*Font - व्याख्या आणि व्याप्ती*


👉🏻वस्तुत: सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समूहास  font असे म्हणता येईल.


*मंगलचा इतिहास*


मायक्रॉसॉफ्टनेही मंगल हा फाँट स्वीकारला असून त्याचे निर्माते प्रा. र. कृ. जोशी हे आहेत ही बाब अनेकांना माहीत नसेल.

युनिकोडवर आधारित हा ' मंगल ' फाँट वापरून आज शेकडो मराठी पाने कॉम्प्युटरवर रोज तयार होतात. हा ' मंगल फाँट ' प्रा . र. कृ . जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या सी डॅक (सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ अडवान्स कॉम्प्युटिंग) या संस्थेत तयार झाला आणि मायक्रोसॉफ्टने तो विंडोज २००० साठी स्वीकारला. 'मंगला' हे रकृंच्या पत्नीचे नाव. यावरून या फाँटला मंगल असे नाव देण्यात आले. मायक्रॉसॉफ्टने हा फाँट स्वीकारतानाही हेच नाव कायम ठेवले. 

चला तर आज आपण गुगल मराठी युनिकोड font कसा इंस्टाल करायचा ते पाहू.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

👉🏻सर्वप्रथम www.google.com हे सर्च इंजिन ओपन करू.

👉🏻त्यात google Marathi input असे सर्च करायचे आहे.
👉🏻Google Search button click केले असता आपल्याला search result मिळेल. 
त्यातील https://www.google.com/inputtools/windows/
ही लिंक आपण क्लिक करून ओपन करू.
👉🏻या लिंक वर क्लिक केले की आपल्याला Google Input Tools on Windows असे वेब पेज ओपन झालेले दिसेल.
👉🏻यात अनेक भाषा आलेल्या दिसतील त्यातील मराठी भाषेसमोरील चौकोनात क्लिक करावी. 
👉🏻त्यानंतर I agree to the Google Terms of Service and Privacy Policy. च्या समोरील check box मध्ये क्लिक करावी.
👉🏻शेवटी download बटन क्लिक करावे.

👉🏻त्यानंतर आपल्याला एक file save करण्यासाठी विचारणारी विंडो येईल. 

त्यात save बटन क्लिक करावे.
👉🏻save क्लिक केले की ती file download होण्यास सुरुवात होईल.

👉🏻आपण Mozilla Firefox browser वापरत असाल तर 

ही file कोठे downlod झाली हे पाहण्या करिता browser च्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला असलेल्या down arrow वर क्लिक करावी.
यानंतर एक लिस्ट येईल त्यात InputToolsSetup या नावाने एक फाईल आलेली दिसेल त्यावर क्लिक केले असता Installation सुरु होईल.
👉🏻त्यानंतर हा setup आपल्याला Do you want to run this file?
असा मेसेज देईल या विंडो मधील Run बटन क्लिक करायचे आहे.
RUN वर क्लिक केले असता installing सुरु होईल.

👉🏻Installing पूर्ण झाले की Installation Complete असा मेसेज पहावयास मिळेल.
👉🏻Installation झाल्यावर स्क्रीन च्या उजव्या कोपऱ्यात task bar (desktop च्या सर्वात खालच्या पट्टीवर) वर EN दिसेल यालाच आपण Language Bar असे देखील म्हणतो. 
👉🏻यावर क्लिक केली असता. आपण English आणि मराठी भाषा बदलू शकतो. 

👉🏻यासाठी Shift + Alt key वापरता येते. Shift बटन दाबून ठेवावे व दुसऱ्या बोटाने Alt बटन क्लिक करावे. म्हणजे भाषा बदलेल व परत असेच केले असता पूर्वीची भाषा येईल.

👉🏻अशा प्रकारे आपण दोन्ही भाषेत typing करू शकतो.

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect