गुगल फॉर्म तयार करणे
सध्याच्या युगात एखाद्या माहितीचे संकलन करण्यासाठी गुगल फाॅर्मचा फार उपयोग होतो. यामुळे माहिती जलदरित्या जमा होवून त्याचे संकलनही सहजरित्या होईल.
यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या माहीतीसाठीचा गुगल फॉर्म तयार करता आला पाहिजे. आज आपण याठिकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे तयार करायचा हे शिकणार आहोत.
1. गुगलफॉर्म तयार करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले *G-mail* ला खाते असले पाहिजे.
2. युजर आय डी व पासवर्डच्या मदतीने G- mail खाते *Login*करावे.
G- mail अकाउंट उघडल्यानंतर *लाल बाणाने दाखविल्या प्रमाणे *Google Drive*वर क्लिक करावे.
3. Google Drive ओपन झाल्यानंतर *New*वर क्लिक करावे . त्यानंतर *More* मधील Google Form वर क्लिक करावे.
4. *Form Tittle* मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा.जसे ..पाठयपुस्तकांची मागणी.
5. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे फॉर्ममध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुदद्या प्रमाणे माहिती *Edit*करावी. इमेज मध्ये बाणाने दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी *Done*वर क्लिक करावे.
6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते 4 थी पर्यंतच्या वर्गांची माहिती त्यात भरावी. व शेवटी *Send form* वर क्लिक करावे.
7. Send Form वर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल.* Link to Share*या खाली आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती* Copy*करुन ठेवावी. त्यानंतर Done वर क्लिक करावे.
8. त्यानंतर आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, व्हॉटस अप, फेसबुक, ईमेल ने इतरांकडे पाठवू शकतो.इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा झालेली माहिती आपणास संंकलन होवून Excel फॉरमॅट मध्ये मिळते.
9. खाली दाखविलेल्या Insert Tab चा वापर करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक डिझाइन करु शकतो.
जरूर कळवा।
धन्यवाद।।
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!