आज दि 2 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी ठीक 10:00 वा. आमच्या गंगाधरी ता.नांदगाव येथे ग्रामसभेला मा.श्री.राजीव म्हसकर साहेब ( प्राथ. शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक), मा. श्री.प्रमोद चिंचोले साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक),मा. श्री.भाऊसाहेब चव्हाण साहेब (गटशिक्षण अधिकारी तालुका नांदगाव) यांनी भेट दिली. याप्रसंगी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी ता.नांदगाव जि.नाशिक शाळेतील उपक्रम तसेच शाळेचा ब्लॉग , शैक्षणिक व्हिडिओ दाखवितांना मी आशा चिने व माझे सहकारी श्री गोरख जाधव सर
प्रसंगी महसुली गावातील पाचही शाळांतील शिक्षक हजर होते.
1- गंगाधरी मोठी- श्री अहिरे सर व बिसंदरे मॅडम
2- खैरनारवस्ती - श्री कदम सर
3-गंगाधरी लहान - श्रीमती - गोसावी मॅडम
4-दत्तवाडी- श्री बागुल सर
5-तळेवस्ती - श्रीमती आशा चिने व श्री गोरख जाधव सर
तसेच गंगाधरी ग्रामपंचायत सदस्य मा. सौ. केदाबाई इघे, श्री भगीरथ जेजुरकर, व इतर सदस्यही हजर होते.
साहेबांनी सभेतील सर्व मुद्यांवर प्रकाश टाकला..
शाळेसाठी विद्युतीकरण, डिजिटल शाळा, ज्ञानरचनावाद, स्वतःचा अभ्यासक्रम या महत्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा करून त्यादिशेने पाऊल उचलण्यास सांगितले.
स्वच्छतेविषयी कौतुक करत चांगल्या कामासाठी सर्वांना शाबासकी वजा प्रोत्साहन दिले. त्यामुळे नवीन ऊर्जा मिळाली.
अधिकाऱ्यांची अशी प्रेरणा भेट व्हायलाच हवी...
अविस्मरणीय क्षण..
💐💐✍✍✍
माझी शाळा तळेवस्तीचा ज्ञानामृत ब्लॉग बघताना मा श्री म्हसकर साहेब व चिंचोले साहेब |
माझे सहकारी श्री गोरख जाधव सर गंगाधरी गावाचा ब्लॉग दाखवताना |
मान्यवरांचा स्वागत सत्कार
आज मला जी संधी मिळाली, त्याचे श्रेय माझे अधिकारी वर्ग व माझे सहकारी बंधू यांना जाते...
माझ्या प्रवासात माझे मार्गदर्शक व प्रेरणास्थान बनले नांदगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा श्री चव्हाण साहेब, बाणगाव बिटाच्या विस्तार अधिकारी श्रीम. ठोके मॅडम, पोखरी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री टिळेकर सर , माझे सहकारी श्री गोरख जाधव सर व पोखरी केंद्रातील शिक्षक बंधू- भगिनी...
अशी कौतुकाची थाप प्रत्येक शिक्षकाला मिळाली तर काम करण्यासाठी दुप्पट ऊर्जा मिळते.
म्हणून या निमित्ताने मी या सर्वांचे धन्यवाद व आभार मानते..
धन्यवाद.....😊☺
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!