शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा
1)
फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "
ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏
आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,
आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:
अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड
औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी
कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड
गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड
चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा
जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला
ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह
नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला
नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड
पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग
सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी
सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनt I
24. वसंतगड
25.वारुगड
1)
शिवजयंती निमित्त शिवरायांवर एक भाषण येथे लिहित आहे.
गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायांना स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.
महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)
मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.
शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना,अधिकार्यांना पगार सुरु केले.शेतकर्यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.
शिवाजी महाराज 'रयतेचा जाणता राजा' होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात,'कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील्,कोण्ही भाकर्,कोण्ही गवत्,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी,कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट होईल.तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन वर्तणुक करणे.कोण्ही....रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही.ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...'यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती .वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे!पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक न चुकता हार घालतात !
एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते.'साहुकार हे तो राज्याचे भुषण' असे महाराज म्हणत. आजच्या,२१व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्या काळातही हे वाक्य फार महत्वाचे आहे.स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या राज्यकर्त्यांना या वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला.महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच.स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. 'हे राज्य व्हावे ही तों श्रींचीच इच्छा आहे' असेही महाराज म्हणत.पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांनी सिंधुबंदीची प्रथा मोडुन काढली.ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल
श्री छत्रपती शिवाजी महाराज
"निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी"
- समर्थ रामदास
भिडस्त भारी | साबडा घरी ||
प्रिय मधुरी | भाषण करी ||
मोठा विचारी | वर्चड करी ||
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
- महात्मा फुले!
ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतो,ज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, ज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असे, तमाम मराठी मनाचा मानबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्य, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज.
"शिवरायांचे ते आठवावे रूप .. शिवारयांचा अठावावा प्रताप ...भूमंडळी " अशा आपल्या या अखंड प्रेरणा स्तंभाला आज परत एकदा स्मरण करण्याचे आवाहन आपणा सर्वांना करत आहे.
कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदा, शिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदर, अन तुम्हीच हो कोलंबस !
खरच आज गरज आहे त्या स्फूर्तीची, तमाम मावळ मातीमध्ये रुजवलेल्या त्या दिव्य स्वप्नाची, स्वराज्याच्या स्वप्नाची. सामान्य माणसाच्या स्वप्नातील स्वराज्याची, याच साठी शिवरायांनी जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचा. आपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला . म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर, जिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे-स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड,शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजे! आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे.लोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही; त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार बदलण्याची, आपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याची. देशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाही. काळ फार कठीण आहे मित्राणो, गरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याची,डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची, भाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याची; गरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!
शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही,त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो.अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते. शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तुमच्या आमच्या हाता मधे ढाल-तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे. शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून,आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती,भाषा, प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे; त्या साठी लढायचे आहे, तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची ही वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही. जिजाऊ मा साहेबांच्या, शिवबाच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला दिसेल.
चला तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीती, जातीभेद, अज्ञान,
शासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू!
शेवटी स्वाभिमानाच्या सूर्याला, पर्वतासारख्या खंबीर राजाला,जिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा!
जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!
2)
शिवजयंती निमित्ताने छोटेसे हे भाषण . . . . .
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज व सर्व भारतीयांना माहीत असलेला छावा छ. संभाजीराजे यांच्या चरणी प्रथम दंडवत. 👏🏻 सर्व प्रथम जयंती आयोजकांचे मनापासून आभार. जयंती ही असामान्य व्यक्तींची साजरी केली जाते हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ज्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी केलेल्या कार्याचा अंत होत नाही अशाच व्यक्ती असामान्य असतात. छत्रपती शिवाजी महाराज अशा व्यक्तींच्या पंक्तीत माझ्या मते प्रथम क्रमांकावर आहेत. उगाचच त्यांच्या मृत्यूनंतर एवढी वर्षे झाली तरी लोकांना त्यांच्या स्वराज्याचे आकर्षण आहे. शिवजन्मपूर्वीचा काळ अंत्यत भयानक होता. जनता तत्कालीन अन्यायी सत्ताधिशांच्या राजवटीत भिरडली जात होती. एतद्देशीय उच्च वर्णीय अशा शासकांची चाकरी करण्यात व सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करण्यात शासकांची मदत करीत होता. सरदार वर्गही अशा अन्यायी सुलतान शासकांसाठी वेळप्रसंगी स्वबांधवांनाही ठार करण्यास मागेपुढे पाहत नसत. त्यात काही अपवाद ही होते परंतु त्यांची संख्या कमी होती. यादव काळातील हेमाद्री पंडिताने लिहिलेल्या चतुरंगचिंतामनी ग्रंथात लिहिल्याप्रमाणे जनता व्रत, वैकल्य , कर्मकांड, जात पात व धर्मभोळेपणात गुरफटलेली होती. समाज बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा या संकल्पना या गोष्टी दूरपर्यंत दिसत नव्हत्या. नंतरच्या काळात महानुभाव पंथ व वारकरी संप्रदायाने समाजातील अनिष्ट प्रथा संपविण्याचा प्रयत्न केला. त्या समाज व धर्मसुधारकांना येथील मनुवाद्यांनी खूप छळले हा इतिहास लक्षात घ्या...... अशा परिस्थितीत19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा ठरला आहे. शिवाजी राजांना त्यांचे वडील शहाजीराजे यांच्याकडून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. राष्ट्रमाता जिजाऊकंडून सर्वसामान्य रयतेच्या कल्याणासाठीचे संस्कार मिळाले व शस्त्रास्त्र चालविण्याचे शिक्षण बाजी पासलकरांकडून मिळाले. ज्यांच्याकडून जे जे चांगले शिक्षण मिळाले त्यांना शिवरायांनी गुरू मानले. त्यात संत तुकाराम महाराज, बाबा याकूतखान इत्यादींचा समावेश आहे. अशाप्रकारे परिपूर्ण बनलेले शिवरायांचे व्यक्तीमत्व सूर्याच्या प्रकाशासारखे सर्वांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत व प्रेरणादायी ठरले आहे. ......शिवरायांनी स्वराज्याची स्थापना फक्त अन्यायी शासकांविरूदध व अन्यायी लोकांविरूदध केली होती. त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी स्वराज्याची निर्मिती केली नसून रयतेच्या कल्याणासाठी केली होती. सर्वधर्मीयांचे व सर्वसामान्य रयतेच्या कल्याणासाठीचे राज्य कसे असावे याचा आदर्श शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून व तसे कार्य प्रत्यक्ष करून दाखविले. त्यांच्या कार्याला दैवाच्या कृपेची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न अंत्यत कुशलतेने मनुवाद्यांनी केला आहे. कारण असे अचाट कार्य सर्वसामान्यांनी करणे व त्यांच्यामुळे आपले महत्त्व कमी होणे हे मान्य होईनासे झाले होते. अफझलखान भेटीप्रसंगी खानच्या मनातील हेतूची जाणिव छ. शिवाजी महाराजांना होती त्याच्याशी ते त्या न्यायाने वागलेही . खनाचा त्यांनी वध केला पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बाधूंन घेतली. आसे होते त्या काळातील शत्रुत्व, का आजच्या सारखे. परंतु त्या प्रसंगादरम्यान कृष्णाजी भट्टाने शिवरायांनवर केलेला वार कधीही न विसरण्यासारखा आहे. शिवरायांना स्वजातीय व स्वधर्मीयांनीच जास्त विरोध केला हे दुर्दैव .नेमके हेच कोणी कधी सांगत नाही हे आमचे दुर्भाग्य. खोटा इतिहास आमच्या पुढे या मनुवाद्यांनी ठेवला व समाज व धर्मामध्ये तेढ आणि अलगपणा निर्माण केला , संपूर्ण समाज विभागून टाकला. सर्वसामान्यांचे स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतीचे ध्येय फक्त जनकल्याण हेच होते. औरंगजेबाच्या आग्रा भेटीदरम्यानचा प्रसंग येथे सांगावसा वाटतो. राजा रामसिंग बरोबर आग्रा दर्शन करीत असताना, ताजमहाल पाहून शंभूराजानी शिवरायांना विचारले आबासाहेब आपल्या स्वराज्यात आशा भव्य दिव्य इमारती का नाहीत? तेव्हा एका कल्याणकारी व जाणत्या पित्याने म्हटले की शंभूराजे आसल्या जनतेच्या पिळवणूकीतून बांधलेल्या थडगयापेक्षा आशी कीर्ती करून दाखवा की चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तुमचे नाव जनतेच्या र्हदयात रहावे. औरंगजेबाच्या दरबारात सर्व राजे, मनसबदार , जहागीरदार व मोठमोठे सरदार खाली माना घालून उभे राहिले होते. छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे फक्त औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून ताठ मानेने उभे होते. हा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना एक आदर्श म्हणुन ठेवला हे विसरता कामा नये...........
त्या काळातील अनेक राजकीय अडचणी दूर करण्यासाठी व सर्वसामान्य रयतेच्या ईच्छेसाठी शिवरायांनी जेव्हा राज्याभिषेक करण्याचे ठरविले तेव्हा महाराष्ट्रातील त्याकाळातील भट्टांनी राज्याभिषेकास विरोध केला. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार शुद्राला राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही. यामागील त्यांचा उद्देश स्वार्थी होता, इस्लाम राजवटीत धार्मिक अधिकार आपल्याला भोगायला मिळतात पंरतु शिवाजी महाराजांनी जर राज्याभिषेक केला तर राजकीय व धार्मिक दोन्ही अधिकांरापासून वंचित राहावे लागले. असे झाल्यास कष्ट न करता आपल्याला जीवन कसे जगता येईल आणि कष्ट केले तर आपणच पुढील काळात शुद्र ठरू शकतोत. या अडचणी दुर करण्यासाठी गागाभट्टांनी प्रचंड द्रव्य घेऊन शिवरायांची क्षत्रिय वंशावळ बनविली. आश्चर्य म्हणजे राज्याभिषेक प्रसंगी ज्या भट्टांनी विरोध केला त्यांनी तडसासारखे पोट फुटेपर्यंत मिष्टान्न खाल्ले भरपूर दक्षिणा हडपली व सर्वसामान्यांच्या शिवरायांनी सुरक्षित ठेवलेल्या तिजोरीवर तान आणला. आजही कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे हे डोळे उघडे ठेऊन पहाने आपले कर्तव्य आहे. त्या विरोधात आवाज उठविणे व कार्य करणे ही आपली जबाबदारी आहे. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली ठरेल असे मला वाटते
जय भवानी जय शिवाजी 👏🏻👏🏻👏🏻💐💐
🌷छत्रपती शिवाजी महाराज🌷
💥अधिकारकाळ -
जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०
💥राज्याभिषेक - जून ६, १६७४
💥राज्यव्याप्ती -
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावरपर्यंत
💥राजधानी - रायगड किल्ला
💥पूर्ण नाव - शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
💥जन्म -फेब्रुवारी १९, १६३०
शिवनेरी किल्ला, पुणे
💥मृत्यू - एप्रिल ३, १६८० रायगड
💥उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले
💥वडील - शहाजीराजे भोसले
💥आई - जिजाबाई
💥पत्नी -
सईबाई, सोयराबाई,पुतळाबाई, काशीबाई,सकवारबाई
💥राजघराणे - भोसले, सिसोदिया (भोसावत)
🌸छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
🌸भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून स्वराज्य स्थापन केले.
🌸रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
🌸उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
🌸महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात.
🌸शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
🌸शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.
🌸भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.
🌸आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले.
🌸किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
💥जन्म
💐पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला.
💐इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला.
💐महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली..
💐 त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते.
💥लढाऊ आयुष्य
☢शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आणि केवळ तीन-चार तास घेत असत.
☢पहिली स्वारी - तोरणगडावर विजय
इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.
☢तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.
☢या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
💥सुरतेची पहिली लूट
🏵इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत.
🏵अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट.
🏵सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.
🏵लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली.
💥पुरंदरचा तह
🕎इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले.
🕎शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला
🕎शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
💥आग्य्राहून सुटका
㊗त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला.
㊗शिवाजीराजे दिल्ली दरबारात
शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्न फोल ठरले होते.
㊗शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले.
㊗ एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले.
💥पश्चिम घाटावर नियंत्रण
🚩इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.
💥अफझलखान मृत्यू
⚛अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.
⚛प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले.
⚛त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले.
⚛अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली.
⚛सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
💥सर्वत्र विजयी घोडदौड
☸शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले.
☸त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.
💥राज्याभिषेक
👑६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला.
फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "
ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏
आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,
आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:
अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड
औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी
कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड
गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड
चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा
जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला
ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह
नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला
नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड
पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग
सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी
सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनt I
24. वसंतगड
25.वारुगड
👑त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.
★ छत्रपति श्री शिवाजीमहाराजांच्या आयुष्याचा कालपट
वर्ष (कालखंड) शिवाजीमहाराजान्च्या आयुष्यातील् प्रमुख घटना ★
१९.०२.१६३० ते ३१.१२.१६३६, शिवनेरी १९.०२.१६३० शिवाजीमहाराजान्चा जन्म व बालपण
०१.०१.१६३७ ते २८.०२.१६४१, कसबे खेड बापूजी मुद्गल नहेकर यान्च्या वाड्यात वास्तव्य
०१.०३.१६४१ ते २८.०२.१६४२, बन्गळुर
०१.०३.१६४२ ते ३१.०३.१६४७, पुणे व खेडेबारे. १६४५ शिवाजीमहाराजांनी हिन्दवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली.
०७.०३.१६४७ दादोजी कोन्डदेवान्चा मृत्यू
०१.०४.१६४७ ते ३१.०५.१६४९, खेडेबारे कोन्ढवा व पुणे. शिवाजीमहाराज तोरणा घेतात. ०९.१०.१६४८ शिवाजीमहाराज पुरन्दर घेतात.
११.०४.१६४९ शिव-समर्थ भेट
०१.०६.१६४९ ते ३१.१२.१६५४, पुणे व चाकण
०१.०१.१६५५ ते ३१.१२.१६५५, पुणे व पुरन्दर
०१.०१.१६५६ ते १५.०९.१६५६, जाव़ळी रायरी. १५.०१.१६५६ शिवाजीमहाराज जावळी घेतात. ६ एप्रिल रायगड सर. प्रतापगड बान्धला. मे १६५६ प्रबळगड घेतला.
१६.०९.१६५६ ते ०७.१०.१६५६, सुपे घेतले
०८.१०.१६५६ ते २८.०२.१६५७, पुरन्दर. सकवारबाई गायकवाडांशी याच काळात लग्न
०१.०३.१६५७ ते ३१.०३.१६५७, पुणे
०१.०४.१६५७ ते १५.०५.१६५७, पुणे पुरन्दर्
१४.०५.१६५७ सम्भाजीमहाराजांचा जन्म
१६.०५.१६५७ ते ३०.०६.१६५७, नौसीरखानाशी युद्ध व जुन्नरची लूट
०१.०७.१६५७ ते ३०.०९.१६५७, पुरन्दर
०१.१०.१६५७ ते १३.०१.१६५८, शिवाजीमहाराज कल्याण भिवंडी बाजूस गड पहाण्यास गेले
१४.०१.१६५८ ते ३०.०९.१६५८, प्रथम राजगड व नन्तर पुरन्दरवर वास्तव्य
०१.१०.१६५८ ते ३१.१२.१६५८, शिवाजीमहाराज कर्नाटकात मसलतीस गेले
०१.०१.१६५९ ते ०९.०३.१६५९, शिवाजीमहाराजान्चे राजगडावर वास्तव्य
१०.०३.१६५९ ते ०९.०७.१६५९, शिवापट्ट्ण व राजगड
१०.०७.१६५९ ते ३१.०८.१६५९, जावळीस वास्तव्य सईबाईचा यावेळी मृत्यू
०१.०९.१६५९ ते १७.०९.१६५९, शिवाजीमहाराज राजगडास असावेत
१८.०९.१६५९ ते १०.११.१६५९, प्रतापगडास वास्तव्य.
१०.११.१६५९ अफजलखानाचा वध
११.११.१६५९ ते ०१.०३.१६६०, पन्हाळा घेतला व विजापूरच्या बाजूस लूट
०२.०३.१६६०.ते १३.०७.१६६०, पन्हाळगडच्या सिद्दी जौहरच्या वेढ्यात
१४.०७.१६६० ते ३१.०७.१६६०, विशाळगडास पलायन. तेथून पुरन्दर व नन्तर राजगडास प्रयाण
०१.०८.१६६० ते १५.०१.१६६१, राजगडास वास्तव्य. शाहिस्तेखानाशी तहाची बोलणी
१६.०१.१६६१ ते ०५.०६.१६६१, शिवाजीमहाराज कोकणच्या स्वारीवर. करतलब खानाशी युद्ध. दाभोळ प्रभावळी काबीज. राजापूर शृन्गारपुर घेऊन सन्गमेश्वर चिपळूणकडे गेले, महाड कल्याण भिवंडीला गेले व राजगडास परत
०६.०६.१६६१ ते ११.१०.१६६१, राजगडावर वास्तव्य
१२.१०.१६६१ ते ११.११.१६६१, श्रीवर्धनला वास्तव्य
१२.११.१६६१ ते ३१.०१.१६६२, राजगडास वास्तव्य
०१.०२.१६६२ ते २८.०२.१६६२, नामदार खानावर स्वारी व पेणवर हल्ला
०१.०३.१६६२ ते ३१.०३.१६६३, राजगडास वास्तव्य
०१.०४.१६६३ ते १२.०४.१६६३, शाहिस्तेखानावर हल्ला व सिन्हगडावर प्रयाण
१३.०४.१६६३ ते ३०.०६.१६६३, कुडाळ वेन्गुर्ल्यावर स्वारी
०१.०७.१६६३ ते ३१.०७.१६६३, जावळी येथे मुक्काम
०१.०८.१६६३ ते ०५.१२.१६६३, राजगडास वास्तव्य
०६.१२.१६६३ ते ०४.०२.१६६४, सुरतेच्या पहिल्या स्वारीवर त्या आधी कोकणात गेले
०५.०२.१६६४ ते २९.०५.१६६४, राजगडास वास्तव्य
३०.०५.१६६४ ते ०६.०६.१६६४, सिन्हगड
०७.०६.१६६४ ते ३०.०९.१६६४, राजगडला वास्तव्य
०१.१०.१६६४ ते ०७.१२.१६६४, कुडाळला आगमन. बा़जी घोरपड्यास मारले. खवासखानाचा पराभव. खुदावन्तपूर लुटले. याच सुमारास सिन्धुदुर्ग व हर्णै किल्ले बान्धले
०८.१२.१६६४ ते २५.१२.१६६४, खानापुर व हुबळी ही शहरे लुटली
२६.१२.१६६४ ते ३१.१२.१६६४, राजगडावर वास्तव्य
०१.०१.१६६५ ते १५.०१.१६६५, महाबळेश्वरला वास्तव्य
१६.०१.१६६५ ते ३१.०१.१६६५, राजगडला वास्तव्य
०१.०२.१६६५ ते २२.०३.१६६५, कोकणात जाऊन मग बसरूरच्या स्वारीवर. ०८.०२.१६६५ बसरूरवर स्वारी
२३.०३.१६६५ ते २५.०३.१६६५, पुरन्दरला वास्तव्य
२६.०३.१६६५ ते ०८.०६.१६६५, राजगडावर वास्तव्य
०९.०६.१६६५ ते १३.०६.१६६५, जावळिइस प्रयाण. जयसिन्ह व दिलेरखानाची भेट व पुरन्दरचा तह
१४.०६.१६६५ ते ३१.०८.१६६५, राजगडावर वास्तव्य
०१.०९.१६६५ ते ३०.०९.१६६५, विजापुरला प्रयाण. फोन्डा घेण्यात अपयश
०१.१०.१६६५ ते १५.११.१६६५, राजगड. जयसिन्गाच्या मदतीस जाण्याची तयारी
१६.११.१६६५ ते १०.०१.१६६६, विजापूर घेण्यास शिवाजीची मोन्गलास मदत
११.०१.१६६६ ते १६.०१.१६६६, पन्हाळ्यावरील अयशस्वी हल्ला
१७.०१.१६६६ ते ०४.०३.१६६६, राजगडावर वास्तव्य
०५.०३.१६६६ ते ११.०९.१६६६, आग्रा प्रकरण.
०५.०३.१६६६ शिवाजीमहाराजान्चे आग्र्यास प्रयाण.
१२.०५.१६६६ शिवाजीमहाराज व औरन्गजेब भेट.
१९.०८.१६६६ शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका.
१२.०९.१६६६ ते १०.०४.१६६७, ९.०२.१६६७ पर्यन्त राजगड नन्तर सिन्धुदुर्ग्
११.०४.१६६७ ते १२.०५.१६६७, रान्गण्याचा वेढा शिवाजीमहाराजांनी उठविला
१३.०५.१६६७ ते १५.०६.१६६७, मनोहरगडास वास्तव्य
१६.०६.१६६७ ते ३१.१०.१६६७, राजगडास वास्तव्य
०१.११.१६६७ ते ३०.११.१६६७, कोकणात बारदेशची स्वारी
०१.१२.१६६७ ते १५.१०.१६६८, राजगडास वास्तव्य
१६.१०.१६६८ ते ३०.११.१६६८, शिवाजीमहाराज कोकणात. अष्टमी व राजापुरास मुक्काम. गुप्तपणे गोवे घेण्याचा अयशस्वी प्रयत्न
०१.१२.१६६८ ते २०.१०.१६६९, राजगडास वास्तव्य
२१.१०.१६६९ ते ३१.१०.१६६९, पेणच्या आसपास
०१.११.१६६९ ते ३१.०७.१६७०, राजगडास वास्तव्य.
२४.०२.१६७० राजाराम महाराजान्चा जन्म.
०४.०२.१६७० कोन्ढाणा सर केला. नन्तर रायगडात
०१.०८.१६७० ते ०५.०८.१६७०, रायगडास वास्तव्य
०६.०८.१६७० ते ०४.०९.१६७०, जुन्नरला वेढा
०५.०९.१६७० ते २०.०९.१६७०, रायगडावर वास्तव्य
२१.०९.१६७० ते ०३.११.१६७०, सुरतेची दुसरी स्वारी.
१७.१०.१६७० दिन्डोरीची लढाई
०४.११.१६७० ते २१.११.१६७०, नांगावला वास्तव्य
२२.११.१६७० ते २५.११.१६७०, रायगडावर वास्तव्य
२६.११.१६७० ते १५.०१.१६७१, खानदेश व बागलाणच्या स्वारीवर. कारन्जे लुटले. अहिवन्त रवळा जवळा किल्ले घेतले. सालेरीचा किल्ला घेतला
१६.०१.१६७१ ते ३१.१२.१६७१, रायगडास वास्तव्य.
२६.०१.१६७१ सम्भाजीमहाराजान्कडे कारभार सोपविला
०१.०१.१६७२ ते २०.०१.१६७२, महाड येथे वास्तव्य. दिलेरखानाने चाकण व पुणे घेतल्याने शिवाजीमहाराज कुडाळ वेन्गुर्ला भागातून सैन्य गोळा करीत होते
२१.०१.१६७२ ते ०८.०३.१६७३, रायगडास मुक्काम. उस्टिकने मे महिन्यात व अब्राहम् लेपेकरने जुलै महिन्यात शिवाजीमहाराजांची भेट घेतली
०९.०३.१६७३ ते १५.०४.१६७३, पन्हाळ्यास वास्तव्य. १५ एप्रिल उमराणीची लढाई
१६.०४.१६७३ ते १९.०५.१६७३, रायगडास मुक्काम्
२०.०५.१६७३ ते ०२.०६.१६७३, तीर्थस्नानासाठी गेले
०३.०६.१६७३ ते ०९.१०.१६७३, रायगडास वास्तव्य. ३ जून निकल्सची भेट
१०.१०.१६७३ ते १५.१०.१६७३, सातायास प्रयाण
१६.१०.१६७३ ते १५.१२.१६७३, कानडा प्रदेशावर् स्वारी
१६.१२.१६७३ ते १४.०४.१६७४, रायगडास् वास्तव्य. ३ एप्रिल नारायण शेणव्याची भेट
१५.०४.१६७४ ते ११.०५.१६७४, चिपळूणला प्रयाण. २२ एप्रिल कारवारला प्रयाण
१२.०५.१६७४ ते १५.०५.१६७४, रायगडास वास्तव्य
१६.०५.१६७४ ते २०.०५.१६७४, प्रतापगडावर भवानीदेवीच्या दर्शनास गेले
२१.०५.१६७४ ते ३०.०९.१६७४, रायगडावर वास्तव्य.
०६.०६.१६७४ शिवाजीमहाराजान्चा राज्याभिषेक.
१८.०६.१६७४ जिजाबाईन्चा मृत्यू
०१.१०.१६७४ ते १५.१०.१६७४, कल्याण व नन्तर पाली येथे वास्तव्य
१६.१०.१६७४ ते १५.१२.१६७४, २० व २५ आ.ऑक्टोंबरच्या दरम्यान सातारा बेळगाव बाजूस नन्तर खानदेश व बागलाणवर स्वार्या. धरणगाव लुटले
१६.१२.१६७४ ते१४.०३.१६७५, रायगडास वास्तव्य
१५.०३.१६७५ ते ११.०६.१६७५, कोकणात राजापूर कुडाळ
२२ व २३ मार्च इन्ग्रज व्यापार्यांची भेट. फोन्डा शिवेश्वर अन्कोला कारवार ही ठिकाणे घेतली
१२.०६.१६७५ ते ३०.११.१६७५, रायगडास वास्तव्य
७ व १२ सप्टेम्बर आच्स्टिनची भेट
०१.१२.१६७५ ते २५.०१.१६७६, सातायास आजारी
२६.०१.१६७६ ते ०७.०२.१६७६, कोकणात वास्तव्य
०८.०२.१६७६ ते १५.०२.१६७६, रायगडास वास्तव्य
१६.०२.१६७६ ते २०.०४.१६७६, पन्हाळ्यास वास्तव्य
२१.०४.१६७६ ते ३०.०९.१६७६, रायगडावर वास्तव्य
०१.१०.१६७६ ते ३०.११.१६७६, बेळगावच्या किल्ल्यास वेढा विजापूरकरान्च्या मुलखात लुटालुट सातारा जिल्ह्यातील खटाव ठाणे व कोट घेतला वाईजवळचा मुलुख काबीज
०१.१२.१६७६ ते ३१.१२.१६७६, रायगडास मुक्काम
०१.०१.१६७७ ते १५.०१.१६७७, रायगडाहून बेळगावास प्रयाण
१६.०१.१६७७ ते २८.०२.१६७७, भागानगरकडे
०१.०३.१६७७ ते ३१.०३.१६७७, भागानगरला मुक्काम
०१.०४.१६७७ ते ०३.०४.१६७८, कर्नाटकाची स्वारी.
१५ मे जिंजी काबीज. २३ मे वेरुळचा ___???वेषा.
२५ जून शेरखान लोदीचा पराभव.
१२ जुलै शिवाजी व्यन्कोजी भेट
०४.०४.१६७८ ते १०.०५.१६७८, विजापुरचा कब्जा घेण्यास निघाले मसौदने त्याचा ताबा घेतल्याचे समजल्याने पन्हाळ्यास परत
११.०५.१६७८ ते ०५.०६.१६७८, रायगडाला वास्तव्य
०६.०६.१६७८ ते १०.०६.१६७८, राजापुरास भेट
११.०६.१६७८ ते २८.०२.१६७९, पन्हाळ्यास
०१.०३.१६७९ ते २२.०३.१६७९, विजापूरचा शाहपूरा लुटला
२३.०३.१६७९ ते ३१.०५.१६७९, पन्हाळ्यास वास्तव्य
०१.०६.१६७९ ते २३.१०.१६७९, रायगडावर वास्तव्य
२४.१०.१६७९ ते ३०.११.१६७९, विजापुरकरास मदत करण्यासाठी पन्हाळ्यास आले तेथून विजापूरकडे सेलगूरपर्यन्त गेले नन्तर मोगली मुलखातील जालना व इतर गावे लुटीत पट्टागडास आले
०१.१२.१६७९ ते १५.०२.१६८०, पन्हाळ्यास मुक्काम सम्भाजीची भेट वाकेनवीस टिपणा प्रमाणे ३१ डिसेम्बर ते ४ फेब्रुवारीपर्यन्त शिवाजीमहाराज सज्जनगडास होते
१६.०२.१६८० ते ०२.०४.१६८०, रायगडास वास्तव्य. १४ मार्च राजाराममहाराजान्चे लग्न. शिवाजीमहाराजान्चा मृत्यू
छत्रपति श्री शिवाजीमहाराजांच्या आयुष्याचा कालपट
श्री त्रंबक शंकर शेजवलकर यांचा श्री शिवछत्रपति हा ग्रंथ व मल्हार रामराव चिटणिस विरचित व श्री रघुनाथ विनायक हेरवाडकर संपादित शककर्ते श्रीशिवछत्रपतिमहाराज हे पुस्तक यांच्या आधारे तयार केलेला हा कालपट महाराष्ट्र राज्य शासनाने सन १९७४ मध्ये शिवराज्याभिषेकास ३०० वर्षे पुर्ण केल्या निमित्ताने काढलेल्या स्मरणीकेत/अंकात समाविष्ट आहे.
=======================
धर्माच्या ठेकेदारांनी बघा,
केली कशी धूळधान....
हिंदू मुस्लिम द्वेष पेरून,
पेटवले सारे रान.....
नव्हता माझा राजा धर्मांध,
त्याला होती रयतेची जाण,
होते त्यांच्याही सैन्यात हजारो,
शूर,वीर मुसलमान...
तोफखाण्याचा प्रमुख त्याचे नाव,
इब्राहिम खान..
राजाची थोरवी सांगु किती,
देई मस्जिदींसाठी दान,
धर्मांध आजचे घेताना दिसतात,
मंदिरासाठी जनतेचे प्राण..
धर्माच्या नावानं लोण पसरवनार्यांची,
राजापुढं लायकीच काय,
म्हणून गर्वानं म्हणतोय.....
जय जिजाऊ,जय शिवराय..
अजुनही स्रियांवर नेहमीच,
होतात अन्याय,अत्याचार,
स्त्रीला दुय्यम स्थान देणारे,
आहेत काही मनुवादी लाचार,
माझ्या राजाने गायली होती,
स्त्रीची थोरवी अन,अधिकार,
राजाच्या काळातही एकाने केला,
गरिबाच्या मुलीवर बलात्कार,
पण राजाने हातपाय तोडले,
तो होता रांझ्याचा पाटिल वतनदार..
पैशानं माजलेल्यांनी महाराजांचं,
नाव सुद्धा घ्यायचे नाय....
म्हणून गर्वानं म्हणतोय.....
जय जिजाऊ,जय शिवराय..
देशात नांदतात आजही,
जातियवाद करणारे गद्दार,
श्रेष्टत्वाच्या लढाईत पाडतात,
मात्र मानवतेला खंडार..
जतिवादाचे लावून तंटे,
स्वार्थी जमवतात मतदार,
राजाने स्वराज्यहितच पाहिले,
जतिपातीला दिला नाही आधार,
म्हणूनच किल्याचे रक्षण करण्या,
होता एक महार किल्लेदार,
जातीयवाद्यांकडून एकताच शब्द "जय'
तरी राग मस्तकात जाय..,
म्हणून गर्वानं म्हणतोय.....
जय जिजाऊ,जय शिवराय..
स्वराज्याची हाक - जय शिवराय
बेगुमान इतिहासाच्या मग्रूर छाताडावर आपले अमिट अस्तित्व कोरून जाणारा राजा .....स्वाभिमानी .....अभिमानी राजा .....सह्याद्रीच्या काळ्या पत्थराना जिवंत करणारा राजा ......मां साहेब जिजाऊं चा लाडका राजा ....तुकोबांचा शिष्य राजा .....जोतीरावांचा गुरु राजा ......मातीतल्या माणसाचं स्वप्न राजा .....रक़्तात उसळणार्या दरिया च "स्वराज्य" स्वप्न राजा .......शाक़्त मूलनिवासी परंपरेचा महानायक राजा ....."ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो " म्हणत धर्मांधतेला टाचे खाली चिरडणारा राजा ....समतेचा राजा ........माझा राजा ......महाराज छत्रपती शिवाजी ....जन्म दिनाच्या(जयंती) मनस्वी सदिच्छा ..............!!
छत्रपती शिवाजी महाराजांवर माहिती देण्याचा हा अल्प प्रयत्न.
#पोस्ट_शेअर_होणे_गरजेचे_आहे
आवर्जून वाचा व शेअर करा हि विनंती _/'\_
सर्व भारतीयांना शिवरायांच्या जयंतीच्या हार्दिक सदिच्छा...
☀🔥🚩॥ ॥🚩
🚩॥ जय शिवाजी.॥🚩🔥☀
@ संकलन @
आशा चिने
शाळा तळेवस्ती गंगाधरी ,ता. नांदगाव
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!