#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Sunday, 19 January 2025

बाल आनंद मेळावा

 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

             🌹🍫 बाल आनंद मेळावा🍫🌹

                               वृत्तांत

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

    आज शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी *दप्तर मुक्त शनिवार* अंतर्गत जिल्हा परिषद डुबेरे शाळेत बाल आनंद मेळावा 🥰 संपन्न झाला. 👏🏻


      विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, कटलरी, शालोपयोगी वस्तू, फळे तसेच भाजीपाल्याचे स्टॉल लावले होते. सर्व काही फक्त घरगुती !


     😋 इडली, डोसा, मेदुवडे, ढोकळा, पालक पुरी, आप्पे, भजे, बाकरवडी, गुलाबजाम, फुटाणे, ओली भेळ, पाणीपुरी, पावभाजी, छोले भटूरे, वडापाव, साखरेचा चहा, गुळाचा चहा, केसर दूध, पापड चाट, पॉपकॉर्न, रवा लाडू, चिप्स, पाणी बॉटल, साबुदाणा वडा, शेंगदाणा चिक्की, चना मसाला, चटपटीत गव्हाच्या पिठाच्या पापड्या, तांदळाचे वेगवेगळे पापड, पोंगे, राजगिरा लाडू, मक्याचा भुट्टा, काकडी, कांदा, टोमॅटो, पेरू, कवठ,.. बापरे...किती हे स्टॉल..! किमान 40 पेक्षा जास्त स्टॉल मुलांनी लावले होते.

       आज खऱ्या अर्थाने पुस्तकातील गणिते व्यवहारात उतरत होती. गिऱ्हाईकाशी संवाद करताना भाषण संभाषण होत होते. आपल्या मालाचा कमी वेळेत जास्त खप व्हावा, यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून ही मुलं कला शिकत होती. सामाजिक बांधिलकी जपत होती. सहकार्य करत होती. कष्टाचे महत्त्व जाणून घेत होती. स्टॉलची आखीव-रेखीव-देखीव मांडणी करून, कार्यानुभव शिकत होती. प्रत्येकाच्या स्टॉलच्या बाजूला स्वच्छतेसाठी कचराकुंडी ठेवून स्वच्छतेचा संदेश देत होती. अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवत होती. प्रत्यक्ष अन्नपदार्थाला हात न लावता hand gloves वापरून hygiene maintain करत होती. खिलाडू वृत्तीने वागून शारीरिक शिक्षण शिकत होती. किती आले, किती गेले याचा हिशोब आपल्या जवळ असणाऱ्या डायरीत मांडून घेत होती. आज शिक्षण खऱ्या अर्थाने व्यवहारात आले.

      एक रुपया कमावताना किती कष्ट सोसावे लागतात, या भावना आज मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. भविष्यकाळासाठी मिळालेली ही शिदोरी नक्कीच त्यांना आयुष्यभर पुरेल.

        आनंददायी पद्धतीने केलेली ही खरी कमाई विद्यार्थ्यांना कष्टासोबत पैशाचे महत्त्व अधोरेखित करणारी होती.

    विद्यार्थ्यांनी घरगुती अन्नपदार्थांचे सुंदर असे स्टॉल मांडले. स्टॉलची नीटनेटकी मांडणी, स्वच्छता, स्टॉलला लावलेले बॅनर, विद्यार्थ्यांचे बॅजेस, स्टॉल आकर्षक करण्यासाठी केलेली मांडणी, स्वच्छतेसाठी बाजूलाच ठेवलेला बॉक्स, डिश.. चमचे..याचे व्यवस्थापन सगळेच कसे डोळ्यात भरत होते. आणि आज आम्हा शिक्षकांची खरी कमाई झाली, या भावनेने आम्ही भरून पावत होतो.

     आज या बालकांच्या मनाला फुटलेली पालवी आपल्या नानाविध विचारांनी आकाशाला गवसणी घालत होती. क्षितिजा पलीकडची स्वप्न रंगवत होती. या बालकांच्या चेहऱ्यावरून ओसंडणाऱ्या आनंदासाठी आम्ही शिक्षक झटत असतो. तो आनंद लुटण्याचं सौभाग्य आज मिळालं. या बालकांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. शब्द आणि लेखणी अपुरी पडते. नयनरम्य असा हा देखावा आज डुबेरे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पार पडला.

   प्रसंगी कार्यक्रमास डुबेरे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. विजय निरगुडे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप कुरणे, उपाध्यक्ष सोमनाथ वारुंगसे, सर्व सदस्य, श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे संस्थापक तथा चेअरमन मा. नारायण शेठजी वाजे, पोलीस पाटील रामदास वारुंगसे, सरपंच, गावातील समस्त प्रतिष्ठित मंडळी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमलेला पालक वर्ग आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्णच अशा आमच्या माता भगिनी उपस्थित होत्या.

    केंद्रप्रमुख निरगुडे सर तसेच नारायण शेठजी वाजे यांनी प्रत्येकी पाचशे रुपये विद्यार्थ्यांसाठी दिलेत. तसेच या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व मान्यवरांनी तसेच पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम जरी आज होता तरी, याची दोन-चार दिवसापासून चालू असलेली पूर्वतयारी आणि माता भगिनींनी केलेला रात्रीचा दिवस खऱ्या अर्थाने सत्कारणी गेला. या कार्यक्रमाचा पाया पालक वर्गच ! उपस्थित पाहुणे, ग्रामस्थ, पालकवर्ग, माता भगिनी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. त्यासाठी शाळेतर्फे आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार...! अशीच साथ, सोबत सदैव असू द्या..!

     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मा. रवींद्र सोनवणे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच ज्योती माळी, सारिका सरोदे, स्मिता वैष्णव, कविता आरोटे, रंजना बारमाटे, आशा चिने, स्वाती खैरनार आदी शिक्षकांनी तसेच युवा प्रशिक्षणार्थी किरण वाजे, संगणक शिक्षिका रोहिणी वाजे या सर्वांच्या नियोजनातून कार्यक्रम संपन्न झाला.

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊





शब्दांकन व व्हिडिओ निर्मिती..✍🏻

© आशा चिने

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect