#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Sunday 9 December 2018

गोवर, रूबेला मुक्तीसाठी


     गोवर आणि रुबेला लसीकरणासंदर्भात सध्या सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने २०१२ मध्ये सर्वच जग या दोन आजारांपासून २०२० पर्यंत मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानेही या मोहिमेत भाग घेतला आहे. आतापर्यंत देशातील २१ राज्यांत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवला गेला असून, दहा कोटी मुलांना एमआर (गोवर-रुबेला) लस टोचली गेली आहे, ती सुद्धा कुठलाही गंभीर वा जिवावरच्या दुष्परिणामांशिवाय! बारीकसारीक दुष्परिणाम थोड्याफार प्रमाणात दिसणारच, पण वेळीच काळजी घेतली तर त्यावरही मात करता येईल.
      - डॉ. सुनील गोडबोले, बालरोगतज्ज्ञ, पुणे

   
      एम आर लसीकरण मोहीम महाराष्ट्रात सध्या गाजते आहे। घराघरांत, शाळेत, ऑफिसमध्ये, व्हॉट्सअॅपवर, वर्तमानपत्रातून, केबल चॅनल्सवर त्याबद्दलची तऱ्हेतऱ्हेची माहिती दिली जाते आहे, पण त्यातून पालकांच्या मनात गोंधळच उडाला आहे! अनेक प्रश्न विचारून पालक मंडळी डॉक्टरांना, विशेषतः बालरोगतज्ज्ञांना भंडावून सोडत आहेत. प्रस्तुत लेख हा अशाच काही प्रश्नांना उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न. (एवढे  करूनही प्रश्न राहतीलच! कारण। प्रत्येक आई वडिलांना आपले बाळ अनमोल असते!!)



    सुरवातीला गोवर (Measter) आणि रुबेला (Rubella) या दोन आजारांचा विस्मयकारक इतिहास समजून घेऊयात.

     नवव्या शतकात ऱ्हाझेस या पर्शियन डॉक्टरने सर्वप्रथम गोवरच्या लक्षणांचे वर्णन केले आहे. गंमत म्हणजे, त्याचे वर्णन इतके अचूक आहे, की आजही त्याच लक्षणांमधून गोवरचे निदान होते. दुर्दैवाने, नंतरच्या काळात या गोवरने जगभर मृत्यूचे थैमान घातले! इ.स. १५२९ मध्ये  क्यूबामधील दोन तृतीयांश लोकसंख्या गोवरमुळे मृत्युमुखी पडली. नंतर मध्य अमेरिका व पाठोपाठ दक्षिण अमेरिकेतही गोवरने अक्षरशः धुमाकूळ घातला. साधारणतः १७५७ मध्ये फ्रान्सीस होम या डॉक्टरने गोवर हा संसर्गजन्य आजार असून, त्याचे जंतू पेशंटच्या रक्तात शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला, पण त्यानंतरही प्रत्यक्ष गोवरची लस तयार व्हायला १९६२ हे वर्ष उजाडले. तोपर्यंत जगभर हजारो रुग्ण, त्यातली मुले, गोवरने दर वर्षी दगावत होते.

      आपला भारत या गोवरमुळे होणा-या बालमृत्यूत ‘अग्रेसर' होता! एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार अंदाजे ४९,२०० मुले गोवरमुळे लसीकरणाने २००० मध्ये गोवरची साथ 'हद्दपार झाली. उत्तर व मध्य व दक्षिण अमेरिका, तसेच युरोपमधूनही २००२ सालापर्यंत गोवरची साथ पसरणे संपूर्ण थांबली. जे काही पेशंट दिसायचे ते पर्यटक असायचे! या अनुभवातूनचे जागतिक आरोग्य संघटनेने २०२० पर्यंत जागतिक संपूर्ण गोवर निर्मूलनाचे उद्दिष्ट ठरवले. सध्याची लसीकरण मोहीम ही त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

     उदय रुबेलाचा..

   रुबेला किंवा जर्मन मिझत्सचा इतिहासही फार काही वेगळाना ही. गंमत म्हणजे इ.स. १७४०मध्ये सर्वप्रथम रुबेलाची लक्षणे सांगणारा फ्रेडरिच हॉपमन, त्यानंतर आजाराचे वेगळेपण सिद्ध करणारे डी बर्जेन, आलें जॉर्ज डी मॅटोन, हे सगळे जर्मन संशोधक, त्यांनी या आजाराचे 'रॉथेन' असे नामकरण केले. त्यातूनच या संसर्गजन्य आजाराला जर्मन मिझत्स आणि गोवर म्हटले जाऊ लागले, पण त्याचे ‘रुबेला' हे नामकरण सन १८६६मध्ये हेन्री व्हीलेने भारतातल्या साथीमध्ये केले. पुढे जाऊन नॉर्मन ग्रेगने गरोदरपणात मातेला झालेल्या रुबेलाच्या जंतूसंसर्गामुळे बाळाला मोतीबिंदू होऊ शकतो, हे सिद्ध केले.

      जगभरात हाही आजार धुमाकूळ घालत होता. त्यातली १९६२ ते १९६५मधील युरोप व अमेरिकेतील साथ भयानक ठरली. त्या काळात सव्वा कोटी रुबेलाचे रुग्ण एकट्या अमेरिकेत आढळले, पण त्यानंतर १९७० साली रुबेला-गोवर आणि गालफुगीची। एकत्रित लस विकसित झाली. त्यानंतरचे अमेरिकेतले सार्वत्रिक लसीकरण ही लसीकरणाच्या इतिहासातील यशोगाथा म्हटली जाते. २९ एप्रिल २०१५ रोजी संपूर्ण उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिका रुबेला मुक्त झाले.

आजार आणि भारत

     या आश्वासक वाटचालीतूनच जागतिक आरोग्य संघटनेने २०१२मध्ये निर्णय घेतला तो सारे  जग गोवर-रुबेलामुक्त करण्याचा, तेही २०२०पर्यंत! या आधीचे दोन टप्पे तितकेच महत्त्वाचे आहेत. २६ ऑक्टोबर १९७९ रोजी अशाच । लसीकरणामुळे जग 'देवी' (स्मॉल पॉक्स) या आजारातून मुक्त. झाले, तर २७ मार्च २०१४ या दिवशी दक्षिणपूर्व आशिया विभाग पोलिओमुक्त झाला! याच पाश्र्वभूमीवर भारतानेही
२०२० या वर्षीपर्यंत गोवर निर्मूलन व रुबेला नियंत्रण मोहिमेत भाग घेतलेला आहे. आतापर्यंत भारतातल्या २१ राज्यांत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवला गेला आहे. अंदाजे दहा कोटी मुलांना एमआर (गोवर-रुबेला) लस टोचली गेली आहे, तीसुद्धा कुठलाही गंभीर वा जीवावरच्या दुष्परिणामांशिवाय! बारीक-सारीक
दुष्परिणाम थोड्याफार प्रमाणात दिसणारच, पण वेळीच काळजी घेतली, तर त्यावरही मात करता येतील.

काय आहेत हे आजार?

   लसीचे दुष्परिणाम समजण्याच्या आधी थोडक्यात दोन्ही आजार समजून घेऊयात. गोवर हा विषाणूजन्य। आजार श्वासामार्फत हवेतून पसरतो. संपूर्ण अंगावर बारीक पुरळ, ताप, सर्दी, खोकला व काही वेळा डोळ्यांचा संसर्ग ही नेहमीची लक्षणे, तर या आजारामुळे ०.१ टक्के मुलांना मेंदूचा संसर्ग असतो, ज्यातून एकतर जिवावर बेतू शकते अथवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यातील ५ ते १० टक्के मुलांमध्ये गंभीर स्वरूपाचा न्यूमोनिया होऊ शकतो. ब-याच मुलांमध्ये गोवर होऊन गेल्यानंतर प्रतिकारशक्ती कमी होण्यामुळे उलट्या, जुलाब, कुपोषण आदी समस्या उद्भवतात. रुबेला हासुद्धा विषाणूजन्य आजार! हा ब-याचदा सौम्य स्वरूपात पुरळ, मानेच्या गाठी, स्त्रियांमध्ये सांधेदुखी, अशा सर्वसाधारण लक्षणांमुळे लक्षातही येत नाही. पण, दुर्दैवाने गरोदर मातेला पहिल्या तीन महिन्यांत हा आजार झाल्यास बाळाला अशी भयंकर समस्या भेडसावू शकतात. दुर्दैवाने गोल मोतीबिंद, बहिरेपणा, हृदयविकृती, अतिमंदत्व, गतिमंदत्व हाच खरा उपाय! रुबेलावर रामबाण औषध नाही. म्हणूनच लसीकरणाने प्रतिबंध हाच खरा उपाय.

हे नक्की करा...



  •   ९ महिने ते १५ वर्षांपर्यंत प्रत्येक मुलाला लस दिलीच पाहिजे.
  • ही लस नेहमीच्या लसीकरणा व्यतिरिक्त, एक्स्ट्रा आहे.
  • मुले हे रूबेला चे कॅरियर म्हणजे संक्रमण करु शकतात म्हणून मुलींबरोबर मुलांना ही लस जरूर द्यावी.
  • ही लस खांद्यावर, त्वचेच्या खाली दिली जाते.
  • ही लस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे बनवली जाते. ही प्रत्येक पुणेकरांसाठी महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
  • या लसीचे सहसा गंभीर दुष्परिणाम दिसत नाहीत. प्रामुख्याने मळमळ, पोटदुखी ताप आदी लक्षणे जाणवू लागतात यावर वेळीच उपचार करता येतात.
  • ज्या मुलांना पूर्वीच्या कुठल्याही लसीला गंभीर रियाक्शन आली असेल, झटके येत असतील , मेंदूचा गंभीर आजार असेल, ऍलर्जीचा त्रास असेल, लसीकरणाच्या काळात आजारपण असेल, तर लस देण्यापूर्वी आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
  • भारतीय बालरोगतज्ञ संघटना या मोहिमेला सक्रिय पाठिंबा देत आहेत.
  • सध्या तरी ही लसीकरण मोहीम संपूर्णता सरकारी यंत्रणेतून राबवली जात आहे. प्रायव्हेट डॉक्टरांकडे "एम एम आर" उपलब्ध आहे. 'एम आर' नाही.
  • सरकारी यंत्रणेने जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती लस एकदा वापरून फेकण्याच्या सिरीज, सुया, पूर्व प्रशिक्षित नर्सेस व इमर्जन्सी सेवेसाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत.
  • आपण सरकारी यंत्रणेला नाकारण्याऐवजी ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे की नाही याकडे लक्ष देऊ शकू आपल्यापरीने मदत करूया.

   असे प्रयत्न केल्यास 2020 मध्ये भारत व पर्यायाने जगही गोवर मुक्त आणि रूबेला वर नियंत्रण मिळवू शकेल ! आपण "पोलिओमुक्त " अशाच प्रयत्नांनी झालो आहे मग हेही शक्य आहे.

लसीकरण आवश्यकच..!

     सध्या सर्वत्र गोवर रुबेला लस (एम आर) मोहीम सुरू आहे मुलांना संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण आवश्यकच आहे .
 - डॉ. अमित शहा

लक्षणे:



  1. खूप ताप, लालसर पुरळ, खोकला, नाकातून वाहणारे पाणी आणि डोळे लाल होणे आदी लक्षणे दिसतात कोकण याद्वारे आणि शिंकणे द्वारे त्याचा प्रसार होतो. गोवर झालेल्या व्यक्ती पासून इतरांना होणारा संसर्ग रुग्णाच्या अंगावर पुरळ दिसून येणे आधीचे ४ दिवस ते पुरळ कमी झाल्यानंतरचे ४ दिवस या कालावधीत होतो गोवर मुळे बालकाला न्यूमोनिया, अतिसार आणि मेंदूला झालेला संसर्ग आधीची बाधा होण्याची शक्यता असते.
  2. रूबेला चाही शिंकण्यातून व खोकण्यातून प्रसार होतो. बालकांमध्ये हा आजार सौम्य स्वरूपात असतो पुरळ, सौम्य ताप, मळमळणे आणि सौम्य स्वरूपातील डोळे येणे ही रोगाची लक्षणे आहेत. कानाच्या मागे आणि माने मध्ये सुजलेल्या लसिका ग्रंथी हेरो बेलाचे प्रमुख लक्षण आहे. संसर्ग झालेल्या प्रौढांमध्ये विशेषता महिलांमध्ये संधिवात आणि सांधेदुखीचा त्रास वाढीला लागू शकतो.
  3. रूबेला मुळे गर्भपात होणे, अकाली प्रसूती होणे आणि मृत बालक जन्माला येणे हे देखील होऊ शकते.
  4. रूबेला झालेल्या व्यक्ती पासून इतरांना होणारा संसर्ग रुग्णाच्या अंगावर पुरळ दिसून येणे आधीचे ७ दिवस ते पुरळ दिसू लागल्यानंतर चे ७ दिवस या कालावधीत होतो. 
लसीकरणाची गरज:-


  • एक लस २ आजारांवर मात करणार आहे.
  • एम आर, एम एम आर ची लस यापूर्वीच करण्यात आली असली तरी एम आर ची लस जरूर टोचून घ्या.
  • एम आर लस अतिशय सुरक्षित आहे आणि तिचे कोणतेही गंभीर परिणाम नाहीत.
  • कुपोषित बालकांना जरूर घ्यावे.
लसीकरण कोणी करू नये:-


  • खूप तापलेली अथवा गंभीर आजार स्थिती झालेली बालके ( उदा. बेशुद्ध पडणे, आकडी येणे  इ.)
  • रुग्णालयात दाखल झालेले बालके
  • यापूर्वी गोवर एम आर एम एम आर लसीची तीव्र ॲलर्जी झालेली बालके.

 मोहिमेचा उद्देश:-



  1. लहान मुलांना गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होऊ नये.
  2. बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, गोवर मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण आणि "सीआरएस" चे संभाव्य रुग्ण कमी करणे आणि जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करणे.
  3. लसीकरण हे सिद्ध झालेले साधन आहे ते संसर्गजन्य रोगाचे नियंत्रण करते.
  4. गोवर आणि रूबेला लसीकरण 85% आजारांपासून संरक्षण होते. दुसऱ्यांदा घेतल्यास 95 टक्के संरक्षण होते मात्र या मोहिमेदरम्यान 100% संरक्षण होते.
  5. एम एम आर लसीमध्ये रुबेलाची लस आहे . आतापर्यंत सरकार द्वारे दिल्या जाणाऱ्या गोवरच्या लसी बरोबर रुबेलाची लस दिली जात नव्हती.
 @ संकलन @
श्रीम. आशा ज्ञानदेव चिने 
शाळा गुरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक
  1. Asha-ashachine.blogspot.in
  2. प्रगतीच्या प्रकाशवाटा -  gurewadi.blogspot.in
  3. ज्ञानामृतtalevasti.blogspot.in

  • follow me on Facebook:-
https://goo.gl/MPbk2v

  • Follow me on Twitter :- 
Asha Chine @aashachine
https://twitter.com/aashachine

  • "Asha Chine" you-tube channel :-
Like, share, subscribe and press Bell icon...
https://m.youtube.com/channel/UCWsG4iqcMj-DZRllopWUClw

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect