#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Wednesday, 15 June 2016

बाप


  ♿  🅰💲🈂🅰 🛃


 ‘दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई..
नीज दाटली डोळ्यांत.. तरी घरी कुणी नाही.. ’

हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या- ‘आजचे आई-बाबा स्वत:मध्येच
इतके व्यस्त असतात की, मुलांसाठी वेळ आहे कोणाला? आजची मुलं फार एकटी झाली आहेत. त्यांची  व्यथा.. वगैरे वगैरे.. त्या कौतुक करत होत्या. पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की
, वाटलं, आम्ही नाही हो इतके वाईट, नाही हो इतके स्वार्थी.. हतबल आहोत आम्ही!
.. डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘बाबा’ सरकत होते..

खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं, म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ
न शकलेला ‘बाबा.. ’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या
वाजविणारा ‘बाबा’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या  दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले, म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर
मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘
बाबा.. ’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा
महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘हॅलो हॅलो. मी बाऽबा’ म्हणत आपला
सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ ‘बाबा’, घरापासून दूर सहा-सहा महिने बोटीवर, युद्धभूमीवर
राहणारा आणि पत्रातून, फोनमधून ‘माझी आठवण काढतात ना मुलं? मी आठवतो ना त्यांना? अशा
प्रश्नांना बायकोच्या ‘हो.. ’ या उत्तरासाठी आसुसलेला ‘बाबा’.. इथपासून ते मुलीचं लग्न
ठरल्यापासून रोज ‘बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं, बाकी काही
नाही.. ’ असं म्हणणारा ‘बाबा’!

बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा ‘बाबा’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला, पण घरी
शाळा-शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा ‘बाबा’, रात्री उशिरा घरी
आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘बाबा’, मुलांबरोबर फटाके उडवताना  पुन्हा एकदा लहान होणारा ‘बाबा’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही
तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा, शिकायला परदेशात गेलेल्या
मुलीशी वेब-कॅमवर गप्पा मारताना ‘तू बारीक का वाटतेस गं? तिकडे खूप त्रास होतोय का? ’
म्हणत ‘नाही तर सरळ परत ये भारतात’ असं सुचवणारा बाबा..

या सगळ्या बाबांची ‘हाक’, त्यांची धडपड, करिअर, पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ
घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा- हे सगळं सांगावसं वाटलं!

अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते. जेव्हा मित्र एकत्र जमतात, तेव्हा एकमेकांना खूप मनापासून
सांगतात की, ‘थोडा आराम कर, मुलांबरोबर मजा कर’ कळतं, पण साधायचं कधी? कसं? ते कळत
नाही. या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय?
माझा मुलगा मला जसं म्हणाला की, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब. ’
.. कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात, पण आपल्यालाच समजत नाही. धावत राहतो आपण. आणि मनात
ही भीतीही बाळगतो की, उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली?
अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो. त्याचं आणि माझं नातं म्हणजे -

न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बंध
कळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद.

असं आहे. त्यालाही हे सारे असंच, इतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून  कविता लिहिली. माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती. दु:खापेक्षाही उद्विग्नता,
फ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं.

प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से, वेगळ्या प्रतिक्रिया.. कार्यक्रमात छोटी-छोटी मुलं-मुली आपल्या
बाबांना रडताना पाहून सुन्न झाली. कोणी ‘माझ्या बाबाला का रडवलंस’ म्हणून आमच्यावर
चिडली. सासरी गेलेल्या मुलींनी ‘बाबा गाणं ऐकलंत? ' म्हणत फोन केले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया
तुटक्या, हळव्या आणि दुखऱ्या..

हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी, आणि बाबांच्या बाबांसाठीही. हे गाणं
जितकं बाबाचं, तितकंच ते आजच्या नोकरी-व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा..

प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से, वेगळी प्रतिक्रिया.. सगळ्या तितक्याच हळव्या,
दुखऱ्या.. (इथे वाढू शकतं!! )
आम्हीही घरापासून दूर-दूर पून: पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते. रोज ठरवितो की,
या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं. मुलांबरोबर करायच्या अनेक गोष्टी घोळतात, पण
बघता बघता हा महिना सरकतो.. मग स्वत:लाच पुढच्या महिन्याचं वचन.. हे चुकतंय, ते समजतं,   पटतं. जे ठरवतो, ते हातून घडत नाही, यासारखी दुसरी बोच नाही. थोडं थांबायला हवंय. वेग
कमी करायला हवाय..
पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत:ला टोचून टोचून रोज गायलाच हवं..


‘असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो?
लवकर जातो आणि उशिरानं येतो..
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला.. ’
आणि इतक्या मेहनतीने बनवलीये म्हणून
..     

                          🅰💲🈂🅰


   बायको "गोड बातमी" सांगते ते
   ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते 
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

   नर्सने ओंजळीत ठेवलेला काही 
   पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड 
   ओझ्याची जाणीव करून देतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   बायकोबरोबर जागवायच्या रात्री 
   डायपर बदलणे आणि पिल्लाला 
   कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात 
   व्यतीत होउ लागतात,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके 
   नीरस वाटून संध्याकाळी पावलांना 
   घराची ओढ लागते,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   "लाईन कोण लावणार" म्हणत 
   सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने 
   खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या 
   फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून 
   तासंतास इमानदारीत उभा रहतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   ज्याला उठवताना गजर हात टेकतात 
   तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा 
   पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ 
   नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   खऱ्या आयुष्यात एका झापडित 
   कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरो-
   बरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या 
   नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

   स्वतः कमीजास्त शिकला असला तरी 
   पोराला "नीट अभ्यास कर रे" असे 
   पोट तिडकिने सांगू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

   आपल्याच कालच्या मेहनतीच्या 
   जोरावर आपला आज मजेत जगणारा 
   अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच 
   आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••

   ऑफिसात अनेकांचा बॉस बनून 
   हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये 
   वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून, 
   कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स 
   आज्ञाधारकपणे ऐकत असतो.
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

   आपल्या अप्रेझल आणि प्रमोशन-
   पेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या 
   यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल 
   जास्त काळजी करू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा 
   पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत 
   तो गुंगुन जातो,
  तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   गाडीतून सतत फिरणारा तो 
   पोराच्या सायकलची सीट पकडून 
   सायकलच्या मागे धावू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

   आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या 
   चूका पोराने करू नयेत म्हणून 
   प्रिचिंग सुरु करतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी 
   पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता 
   "कॉन्टेक्ट्स" समोर हात जोडतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   "तुमचा काळ वेगळा होता, आता 
   जमाना बदलला, तुम्हाला काय कळ-
   णार नाही. This is generation gap!" 
   असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद 
   आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या 
   बापाच्या आठवणीने हळवा होऊन मना-
   तल्या मनात त्याची माफी मागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   पोरगा शिकून परदेशी जाणार, 
   मुलगी लग्न करून परक्या घरी 
   जाणार हे दिसत असून त्याकरिता 
   स्वतःच प्रयत्न करतो 
   तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••

   पोर मोठी करताना आपण कधी 
   म्हातारे झालो हे लक्षात येत नाही 
   आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

   कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून, 
   कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धा-
   श्रमाची पानगळ बनून अगदीच नशीब-
   वान असला तर नातवंडांसमवेत चार 
   दिवस रमून•••••••कसेही असले तरी 
   भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत 
   कधीतरी सरणावर चढतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••!!

    •••••••तमाम वडिलांना समर्पित. ..!!!

    🅰💲🈂🅰

बाप

वडील

आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,
आयुष्यातील श्रद्धास्थान .
आईवर खूप लिखाण आहे.मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.
या कम्युनिटीत आपण वडीलांची थोरवी ,जशी आपल्याला जाणवली ती शब्दात मांडण्याचा प्रयत्न करू या.

वडील

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच

सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात

ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात

दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही

          आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात पण घराच्या या अस्तित्वाला खरच आम्ही कधी समजून घेतले आहे का? वडीलांना महत्व असुनही त्यांच्या विषयी जास्त लिहिले जात नाही, बोलले जात नाही, कोणताही व्याख्याता आईविषयी बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचे महत्व अधिक सांगितले आहे. देवदेविकांनी आइचेच गोडवे गायले आहेत. लेखाकांनी कविनी आईचे तोंडभरून कौतुक केले आहे. चांगल्या गोष्टिना आईची उपमा दिली जाते पण वडिलांविषयी कुठेच फारस बोलले जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणाराच, समजा एक दोन टक्के असे बाप असतील पण चांगल्या वडिलांबद्दल काय?आईंकडे अश्रुंचे पाट असतात पण वडिलांकड़े संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वाडीलांनाच करावे लगते आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त तान पडतो कारण ज्योतिपेक्षा समयीच जास्त तापते ना? रोजच्या जेवानाची सोय करणारी आई आमच्या लक्षात रहते पण आयुष्याच्या शिदोरिची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई मोकळेपनाने रडू शकते, पण रात्रि उषित तोंड खुपसून मुस्मुसतात ते वडील असतात. आई रड्ते, वाडिलांना रडताही येत नाही, स्वतःचे वडील वारले तरी रडता येत नाही, कारण त्यांना छोट्या भावंडांना जपयाचे असते. आई गेली तरीही रडता येत नही कारण बहिनिचा आधार व्हयाच असत. पत्नी अर्ध्यावर साथ सोडून गेली तरी पोरांसाठी आधार बनवा लागतो.जिजाबाई नि शिवाजी घडवला अस आवश्यक म्ह्नव पण त्याच वेळी शहाजी राजाची ओढातान सुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीच, यशोधाच कौतुक अवश्य करावं पण पुरातून पोराला डोक्यावर घेउन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम हा कौसलेचा पुत्र अवश्य असल पण पुत्र वियोगाने तड्फ़ड्न मरण पावला तो पिता दशरथ होता.


         वडीलांच्या टाचा झीजलेल्या चापलाकडे पाहिले की त्यांचे प्रेम कळते. त्यांचे फांटके बनियान बघितले की कळते "आमच्या नशिबाची भोके त्यांच्या बनियानला पडलित". त्यांचा दाढ़ी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊँन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पाँन्टच वापरातिल. मुलगा सलून मधे २०-२५ रुपये खर्च करतो. मुलगी पार्लर मधे खर्च करते पण घरातला दाढीचा साबन संपला म्हनून आंघोळीच्या साबनाने करतात. अनेकदा ते नुसत पानी लावून दाढ़ी करतात. वडील आजारी पडले तरी डॉक्टर कड़े जात नाहीत, ते आजराला घाबरत नाहीत पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याना भिती वाटते. कारण पोरिचे लग्न, पोराचे शिक्षण बाकी असते, घरात उत्पन्नाचे दूसरे साधन नसते, ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकल ला एन्जिनिअरिंग ला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढातान करून मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात, पण सर्वच नसली तरीही कही मुले अशी असतात की जे पैसे आले की मित्रांना पार्ट्या देतात आणि ज्या वडिलांनी पैसे पाठवले त्यांची टिंगल करतात. एकमेकांच्या बापच्या नावाने एकमेकाना हाका मारतात.आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात. ज्या घरत वडील आहेत त्या घराकडे वाइट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण त्या घरचा कर्ता जिवंत असतो. कोणत्याही परिक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवताळते, कौतुक करते, पण गुपचूप जाउन पेढयांचा पुढा घेउन येणारा बाप कोणाच्या लक्षात रहत नाही. चटका लागला, ठेच लागली की "आई ग" हा शब्द बाहेर पडतो पण रास्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येउन ब्रेक लागतो तेव्हा "बापरे" हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटकाळी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटते न????


     कोणत्याही मंगल प्रसंगी सर्वजन जातात पण मयाताच्या प्रसंगी बापाला जावे लगते. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी सारखा जात नसतो पण गरीब लेकिच्या घरी तिच्या काळजी पोटी सारखा फेरया मारेल. मुलाच्या नोकरीसाठी लाचार होनारा बाप, मुलीच्या लग्नासठी उम्बरठे झिजवणारा बाप, घरच्यासाठि स्वतःच्या व्यथा दड़्पनारा बाप..........खरच किती ग्रेट असतात न????वडिलांचे महत्व कोणाला कळत? लहानपनीच वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खुप लवकर पेलाव्या लागतात, एकेका वस्तुसाठी तरसावे लागते त्याना. वाडिलाना खऱ्या अर्थाने समजून घेते ती मुलगी. सासरी गेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापशी फोनवर बोलताना बदलेला आवाज एक क्षणात  कळतो., ती अनेक प्रश्न विचारते. कोनतिही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेउन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढ़ते. मुलगी बापाला जानते, जपते..... इतारांची श्रद्धा, असाच आपल्याला जानावा हीच प्रत्येक बापाची किमान अपेक्षा असते.



आई, ताई, दादा यांच्या पुढेही एक अतूट नातं असतं

त्या नात्याचं नाव 'बाबा' असतं.

हाताचे बोट धरून चालायला शिकवणारे,

कामावरून येताना दररोज खाऊ घेऊन येणारे

पाठ दुखत असली तरी आपल्या मुलाला घोडा बनून खेळवणारे,


आजारी पडल्यावर काळजीपोटी उशाशी बसणारे,

आपल्याला हसवणारे आणि खेळवणारे,

आईने कधी मारले तर तिच्यावरच रागावणारे

आपली मुले खूप मोठी व्हावीत म्हणून झटणारे,। 
आपल्या लेकरांसाठी उंच उंच अपेक्षा बाळगणारे,

वाईट वागल्यावर खूप ओरडणारे,

छोटी चूक झाल्यास ती पोटात घालून प्रोत्साहन देणारे,

चांगले काम केल्यावर तोंड भरून कौतुक करणारे,

परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर तेवढेच रागावणारे

सर्वांवर प्रेम करणारे व सर्वांना समजून घेणारे,

कधी वेळ आलीच तर पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे,

बालपणापासून खाल्ल्या त्यांनी परिस्थितीमुळे खस्ता,

कितीही संकटे आली तरी गाठला उज्ज्वल यशाचा रस्ता.

आजपर्यंत आपल्या प्रेमळ वागण्याने किती मोठे कर्ज दिले आम्हास मायेचे

कसे ऋण फेडू या जन्मदात्याचे!




Sunday, 10 April 2016

महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले - 


[Jyotirao Phule, Mahatma Jyotirao Govindrao Phule] 
जोतीराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा जोतिबा फुले , 
जन्म : ११ एप्रिल १८२७ 
मृत्यू : २८ नोव्हेंबर१८९०

     महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

      इ.स. १८७३ मध्ये त्यांनीसत्यशोधक समाजची स्थापना केली. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

    महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

             अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करू या!
           ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे. ज्योतीबांचे पूर्वज सातार्यापासून जवळ असलेल्या कटगुण गावात राहात होते. त्यावेळी त्यांचे आडनाव गोऱ्हे असे लावले जाई. पुढे गोऱ्हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तेथे ज्योतीबांचे वडील गोविंदपंत फुलांचा व्यवसाय करून उपजीविका करीत होते. त्यांनी फ़ुलांच्या व्यवसायात कौशल्य, कीर्ती, आणि फार यश मिळविले त्यामुळे गोऱ्हे हे आडनाव जावून त्यांना  ‘फुले’ हे नाव कायम स्वरूपीच मिळाले. पुढे गोविंदराव भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागले. त्यात त्यांचा चांगला जम बसला. नंतर गोविंदरावांनी धनकवडीच्या झगडे  घराण्यातील चिमणाबाई सोबत विवाह केला. त्यांना दोन मुले झाली. थोरला राजाराम व धाकटा ज्योतिबा, महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक व द्लीतोद्धारक जोतिबा फुले यांचा जन्म २० फेब्रुवारी १८२७ रोजी पुण्यास झाला.
           वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिबा शाळेत जावू लागले. पण  ‘शूद्राने शाळेत शिक्षण घेणे हे महापाप आहे’ असे कुणा एका र्कमठाने गोविन्रावांचे कान फुंकल्यामुळे त्यांनी मुलाला शाळेतून काढून मळ्यातील कामाला जुंपले. पण तिथेही फावल्या वेळेत तो पुस्तके वाचण्यात रमल्याचे पाहून एका मुसलमान व एका इंग्रज गृह्स्थाने गोविन्द्रावान्ना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे त्यांनी पुन्हा ज्योतीबाला मिशनर्यांच्या इंग्रजी शाळेत टाकले.  इंग्रजी शाळेत जावून ती भाषा चांगली समजू लागल्यावर त्यांनी  ‘ राईट ऑफ मान ‘ ( मानवाचे हक्क ) हे toms pen या इंग्रज लेखकाचे पुस्तक वाचले. आणि त्यांना हिंदू समाजातील व धर्मातील विषमता ईश्वर निर्मित नसून हे मानव निर्मित आहे हे कळून आले त्यातून त्यांच्या परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नात वराती मागून जाताना त्यांना एका ‘ शुद्र ‘ म्हणून तिथून निघून जायला सांगितले. या अपमानाने त्यांच्या अंगात अंगार फुलला मग त्यांनी विषमते विरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. हिंदू समाजातील मतलबी रुढीचा त्यांना तिरस्कार वाटू लागला. ज्योतीबांनी शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण करतानाच लहूजी वस्तादांकडून शारीरिक व्यायामाचे प्रकार आणि काही शास्त्रांचे ज्ञान संपादन केले होते. त्यातही त्यांनी कीर्ती संपादन केली.
           १८४७ पर्यंत जोतिबा बुद्धीने चांगले प्रौढ झाले होते. त्यांनी समाजाचे बार्काईने निरीक्षण केले.त्यातून त्यांच्या असे लक्षात आले कि आपला हिंदू समाज जाती भेदाने आणि विशिष्ट वर्गाच्या गुलामगिरीत राहून प्रतिगामी बनला आहे. स्त्रिया आणि शुद्र यांची कुचंबना होत आहे.हे सर्व स्त्रिया आणि बहुजन समाज शिक्षणा पासून दूर राहिल्यामुळे घडत आहे. हे सर्व त्यांच्या निदर्शनाला आल. त्यावरून त्यांनी भावी जीवनातील कार्याची दिशा ठरविली. ते सरकारी नौकरीच्या मागे न लागता समाज कार्य करायचे ठेवून कामाला लागले. सामाजिक गुलामगिरी दूर करणे आणि सर्वांनला शिक्षणाची दारे खुली करणे यासाठी प्रयत्नशील राहणे हे त्यांच्या जीवनाचे धैर्य ठरले.
         जोतिबा फुले यांनी पुण्यात भिडेवाडयात ‘ मुलींची शाळा ‘ काढुन एकच खळबळ निर्माण केली. त्यांचे हे कार्य तत्कालीन रूढीप्रिय समाजाला रुचले नाही.मुलींची शाळा काढण्यासाठी पूर्व तयारी म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला प्रथम शिक्षण दिले. सावित्रीबाईनींहि आपल्या पतीच्या जीवन कार्याला मनापासून सहाय्य केले. १८४८ मध्ये पहिली १८५१ मध्ये दुसरी आणि १८५२ मध्ये तिसरी मुलींची शाळा काढली. या शाळा व्यवस्थित चालू लागल्या. मेजर कॉन्डी यांनी सरकार तर्फे ७५ रु अनुदान मंजूर केले. फुले यांच्या या महान सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर जोतिबांनी सामाजिक सुधारनांकडे विशेष लक्ष द्यायचे ठरविले.व्यक्ती स्वातंत्र्य, समता, आणि बुद्धीप्रामान्य या साठी ते झगडू लागले. सतीची प्रथा, विधवा पुनर्विवाह, भ्रुणहत्या ,या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला, केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी पुढाकार घेउन ‘ बालहत्या प्रतिबंधगृह ‘ हि संस्था सुरु केली. समाजात स्पृश्य -अस्पृश्य असा भेदाभेद पाळनारांचा रोश पत्करून त्यांनी आपल्या घराजवळचा पाण्याचा हौद सर्वांना म्हणजे अस्पृश्यांनाहि खुला केला.
      शेतकऱ्यांचा मोठा वर्ग वर्षानुवर्ष अज्ञान, गुलागिरी याने त्रस्त झालेल्या होता . हा वर्ग असंघटीत होता म्हणून त्यांचे हाल होतात हे ओळखून ज्योतिबायांनी कार्य केले . त्यातूनच ‘सत्यशोधक समाज’ स्थापन झाला . अज्ञान हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे अशी त्याची समजूत असल्याने त्यांनी शिक्षणाचे मह्त्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सामजिक प्रश्नांवर जे चिंतन केले होते . त्यावर लेखनही केले.  ‘शेतकऱ्याचा आसूड’ ‘ब्राम्हणाचे कसब’, ‘ गुलामगिरी’ ‘तृतीय रत्न(नाटक)’, ‘शिवाजीचा पोवाडा’, तसेच सार्वजनिक सत्यधर्म’, असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी  ‘अखंड ‘ नाव देऊन काही अभंगांचेही लेखन  केले. मूलगामी आणि तर्कशुद्ध अशा त्यांच्या चिंतनातून पुढील ओळी निर्माण झाल्या. ‘गुलामगिरी’ मधील त्या ओळी अशा आहेत  –  ‘विधेविना मती गेली । मतीविना नीती गेली । नितीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविनाशुद्र खचले । इतका अनर्थ एका विधेविना केला ।।। शिक्षण हेच समाज – मानस परिवर्तनाचे प्रभावी मध्यम आहे, हे लक्षात येताच अस्पृश्यासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा काढल्या , अनाथाश्रम काढले  ,वृत्तपत्रे काढलीत ,धर्म जन्माने न मिळता माणसाने स्व:त च्या बुद्धीने स्वीकारला पाहिजे. शेतकर्यानच्या व्यथा इंग्रज प्रश्यासनाच्या कानी पोहचविल्या,शेतकरी हा समाजाचा कणा आहे. पोशिंदा, अन्नदाता आहे, असे मत त्यांनी मांडले.आणि जनजागृती केली. त्यांच्या साठाव्या वर्षी जनतेने मुंबईस त्यांचा सत्कार करून त्याना ‘ महात्मा ‘ हि पदवी बहाल केली.  ६३ वर्षे ते चंदना सारखे झिजले. प्रवास केला, व्याख्याने दिली, लेख लिहिले,स्वातंत्र्य , समता, लोकशाही, विज्ञान, इह्वाद, या आधुनिक मुल्यांवर भर देवून सामाजिक क्रांतीची पेरणी केली. डॉ. आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले. सहज सोप्या भाषेत नेमकी स्पष्टता आनने त्यांना जमत असे. विच्यारांना कृतीशिलतेची जोड दिली. ‘ जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे’ मग महंत लीला स्वभावे, अंगी बाणे’. या समर्थ वचनांची सार्थकता सिद्ध करणारा हा माहात्मा सर्व सुखांचे आगर, नीती तत्वांचे माहेर, असा हा महात्मा अविरत कष्टाने २८ नोहेंबर १८९० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना आपले सर्वांचे कोटी कोटी प्रणाम !
            धन्यवाद।।
        संकलन, आशा चिने

Tuesday, 1 March 2016

साद आईची

वाचतानाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता... छान लिहिलीय...


         🌺"साद आईची"🌺



महिनेमागून महिने, 

शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते


              भिजून जातो पदर ,

              अन मन रिते राहाते
              कधी मधी मात्र ,
              तुझी मनीऑर्डर येते


पैसे नकोत यावेळी ,

तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा


            तुझा बा होता तोवर ,

            काळ बरा गेला
            तुझी आठवण काढत ,
            उघड्या डोळ्यांनी गेला


शेवटपर्यंत सांगत होता,

लेक माझा भला
तू मोठा साहेब, 
त्याचं मोठं कौतुक त्याला


         माझ्याही ह्रदयात फोटो,

         तुझा तू पाहून जा
         बाळा मला तुझ्या ,
         घरी घेऊन जा.


दुष्काळाच्या साली ,

जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला


        वर्षाकाठी एक कपडा,

        पुरवून-पुरवून घातला
        सालं घातली बापाने, 
        पण तुला शाळेमधी घातला


हवं तर तू हे ,

सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.


         धुणी-भांडी करीन मी, 

         केरकचरा भरीन मी
         पुरणपोळ्या, अळुवड्या ,
         तुझ्यासाठी रांधीन मी


नातवंडांचं दुखलं-खुपलं ,

सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार  मी


          तुझ्या घरची कामवाली ,

          म्हणून घेऊन जा
          पण बाळा मला 
          तुझ्या घरी घेऊन जा.


थकले रे डोळे बाळा, 

प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे 
आता मुश्किल झाले


            विसरु कशी तुला मी, 

            तुझ्यामुळे आई झाले
            बाळ माझं 'कुलभूषण' 
            पोरकी मी का झाले?


आता माझ्या थडग्यापाशी 

'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर 
हा वृध्दाश्रम पाडून जा.


(राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Thursday, 25 February 2016

श्रावण आला

श्रावण आला
🙏 माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. 🙏

हासरा नाचरा, जरासा लाजरा,


सुंदर साजिरा श्रावण आला

तांबुस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला

मेघांत लावीत सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला

लपत, छपत, हिरव्या रानात,
केशर शिंपीत श्रावण आला

इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला

लपे ढगामागे, धावे माळावर,
असा खेळकर श्रावण आला

सृष्टीत सुखाची करीत पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला.

सागर

                                   सागर 🙏 माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. 🙏

सागर

आवडतो मज अफाट सागर
अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर
सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफेत शिंपित
वाटे वरती सडे
हजार लाटा नाचत येती
गात किनाऱ्या कडे

मउ मउ रेतीत कधी मी
खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या
वाऱ्याच्या संगती

संथ सावळी दिसती जेंव्हा
क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला
जावेसे वाटते

खडकावरूनी कधी पाहतो
मावळणारा रवी
ढगा ढगाला फुटते जेंव्हा
सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेंव्हा
जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी
येती छातीवरी

दर्यावरची रंगित मखमल
उचलुन घेते कुणी
कृष्णसावल्या भुरभुर पडती
गगनाच्या अंगणी

दूर टेकडी वरी पेटती
निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता
घरी जायला हवे
कुसुमाग्रज

सुख

सुख 🙏 माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. 🙏

🔴झकास कविता🔴

सुखांमागे धावता धावता
विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची मग
भागत नाही तहान 

स्वप्न सत्यात आणता आणता
दमछाक होते खूप
वाटी-वाटीने ओतलं
तरी कमीच पडत तूप

बायको आणि पोरांसाठी
चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो
पण मागू नका वेळ

करिअर होतं जीवन मात्र
जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती
पैसा छापणारं यंत्र

चुकून सुट्टी घेतलीच तरी
पाहुणा ‘स्वतःच्या घरी’
दोन दिवस कौतुक होतं
नंतर डोकेदुखी सारी

मुलच मग विचारू लागतात
बाबा अजून का हो घरी?
त्यांचाही दोष नसतो
त्यांना याची सवयच नसते मुळी

सोनेरी वेली वाढत जातात
घरा भोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती
कधीही न सारवलेल्या

आयुष्याच्या संध्याकाळी मग
एकदम जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच मुळी घेतला नाही

सगळं काही पाहता पाहता
आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता
समाधान दूर वाहून गेल 😥

हृदयविकार आणि त्यासंबंधी घ्यावयाचे उपाय

हृदयविकार आणि त्यासंबंधी घ्यावयाचे उपाय
माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

बंगळुरू येथील प्रसिद्ध नारायणा हृदयालय रुग्णालयाचे प्रमुख डॉ. देवी शेट्टी यांच्याशी विप्रो येथील कर्मचार्‍यांनी हृदयविकार आणि त्यासंबंधी घ्यावयाच्या उपायांसंदर्भात केलेले मार्गदर्शन.

P2160539-Human_heart,_anatomical_artwork-SPL
Human heart, anatomical artwork. The heart is a hollow muscular organ that pumps blood around the body. This view is of the front of the heart. The thin blood vessels on the surface of the heart are the coronary blood vessels, supplying the heart muscle with oxygen. The major blood vessels that carry blood to and from the heart are white. At upper left and lower left are the branches of the vena cava vein, bringing deoxygenated blood to the heart. This blood is pumped to the lungs through the pulmonary artery (upper centre), and returns to the heart through the pulmonary vein (upper right, not clearly seen). The oxygenated blood from the lungs is pumped around the body through the aortic arch (between the upper vena cava and the pulmonary artery).

प्र. – हृदयाची काळजी कशी घ्यावी?
उ. – १) योग्य खान-पान, कमी कार्बोहाड्रेटस, जास्त प्रोटीन आणि कमी तेल.
२) आठवड्यातून किमान अर्धा तास चालणे, लिफ्टचा वापर न करणे, एका ठिकाणी जास्त वेळ बसू नये.
३) स्मोकिंग बंद करावी.
४) वजन नियंत्रणात ठेवणे.
५) बी. पी. (ब्लडप्रेशर) आणि शुगर नियंत्रणात ठेवणे.

प्र. – नॉनव्हेजमध्ये मासे हृदयासाठी चांगले असतात का?
उ. – नाही

प्र. – एखाद्या तंदरुस्त व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका का येतो?
उ. याला सायलेंट अटॅक म्हणतात. त्यामुळे वय वर्षे ३० नंतर नियमित चेकअप करावे.

प्र. – हृदयविकार हा अनुवंशिक आजार आहे का?
उ. -नाही..!

प्र. – हृदयावरील तणाव कमी करण्यासाठी काय केले पाहिजे.
उ. – आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे असा अट्टाहास करू नये.

प्र. –  चालणे चांगले की जॉगिंग? जिममध्ये व्यायाम केल्यास हृदयासाठी चांगले असते का?
उ. – चालणे कधीही चांगलेच. जॉगिंंगमुळे शरीराच्या जॉईंट्सना इजा पोहोचू शकते.

प्र. – कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींना हृदयविकार होतो का?
उ. – शक्यता फारच कमी.

प्र. – कोलेस्ट्रॉल वाढण्याची प्रक्रिया कधी होते. ३० वर्षांनंतर कोलेस्ट्रॉलची काळजी घ्यावी का?
उ. – शरीरात लहानपणापासूनच कोलेस्ट्रॉल असते.

प्र. – अनियमित खाण्यामुळे हृदयावर काय परिणाम होतो.
उ. – अनियमित खात असा आणि त्यातही जंकफूड असेल तर पचनसंस्थेमध्येच गडबड होते.

प्र. – औषध न घेता कोलेस्ट्रॉल कसा नियंत्रणात आणावा?
उ. – खाण्यावर नियंत्रण, नियमित चालणे आणि आक्रोड खाणे.

प्र. – हृदयासाठी कोणते अन्न चांगले आणि वाईट आहे?
उ. – फळे आणि भाज्या हृदयासाठी चांगल्या. तेल सर्वांत वाईट.

प्र. – कोणते तेल चांगले? सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन, ऑलिव्ह ऑईल?
उ. – सवर्च तेल वाईट.

प्र. – नियमित वैद्यकीय तपासणी म्हणजे काय?
उ. – वय वर्षे ३० नंतर सहा महिन्यांतून एकदा रक्त तपास करवी, शुगर आणि कोलेस्ट्रॉल, बी.पी. चेक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रेड मील आणि इको टेस्ट करावी.

प्र. – हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार काय करावेत?
उ. – त्या रुग्णाला तत्काळ झोपवावे, त्याच्या जिभेखालच्या बाजूला ऍस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट ही गोळी ठेवावी. वेळ न दवडता आणि ऍम्ब्युलन्सची वाट न पाहता जवळच्या हृदयविकार रुग्णालयात तत्काळ घेऊन जावे. बहुतांशी मृत्यू पहिल्या एक तासात होतात.

प्र. – ऍसिडीटी, गॅसेसमुळे छातीत होणारी जळजळ आणि हृदयविकाराचा त्रास हे कसे ओळखावेत?
उ. – डॉक्टरांकडे जाऊन ई.सी.जी. केल्याशिवाय हे समजणे कठीण आहे.

प्र. – तरुणांमध्ये ३० ते ४० वर्षांच्या आत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढले आहे?
उ. – चुकीची लाईफस्टाईल, स्मोकिंग, जंकफूड, व्यायामाचा अभाव यामुळे अमेरिका आणि युरोपपेक्षा तीनपट जास्तm हृदयविकाराचे रुग्ण India  आहेत.

प्र. – अनेकांचे जीवनमान दगदगीचे आहे. अनेकांना रात्रपाळी करावी लागते. त्याचा परिणाम हृदयावर होतो का?
उ. – जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा निसर्ग रक्षण करीत असतो. परंतु जसजसे वय वाढत जाते, तसा शरीरराचाही आपण आदर केला पाहिजे. यात बदल हवा.

प्र. – जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न केल्यामुळे जन्मलेल्या मुलाला हृदयाचा काही आजार असू शकतो का?
उ. – होय! काही प्रमाणात मुलांमध्ये ही लक्षणे दिसू शकतात.

प्र. – उच्च रक्तदाब म्हणजे बी. पी. (ब्लडप्रेशर) नियंत्रित ठेवण्यासाठी घेण्यात येणार्‍या औषधांचे साईड इफेक्ट दिसतात का?
उ. – होय! अनेक औषधांचे साईड इफेक्ट असतात. मात्र, सध्या अनेक सुधारणा झाल्यामुळे आधुनिक औषधे अधिक चांगली आहेत.

प्र. – जास्त चहा, कॉफी घेतल्यामुळे हार्टऍटॅक येतो का?
उ. – नाही!

प्र. – अस्थमाचा आजार आणि हृदयविकाराचा काही संबंध आहे का?
उ. – नाही!

प्र. – केळी खाल्ल्यामुळे बी. पी. नियंत्रणात येतो का?
उ. – नाही!

प्र. – जंकफूड म्हणजे काय?
उ. – फ्राईड केलेेले मॅकडोनल्डस आणि तत्सम ठिकाणी बनविले जाणारे अन्न, समोसा आणि मसाला डोसाही.

प्र. – नियमित चालण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि एकाच जागी खूप वेळ बसून काम करावे लागत असेल तर काय करावे?
उ. – एकाच जागी तासाभरापेक्षा जास्त वेळ बसू नये. जागेवरच थोडा वेळ उभे राहावे किंवा एका खुर्चीवरून दुसर्‍या खुर्चीवर बसले तरीही चालते, पण आठवड्यातून पाच दिवस किमान अर्धा तास चालल्यास उत्तमच!

टीप : मित्रांनो,  हा मेसेज वाचताना तुमचे पाच ते दहा मिनिटे नक्कीच गेले असतील.
परंतु हा मेसेज वाचल्यामुळे माझ्या मित्रांनाच काय, सर्वांनाच याचा फायदा होईल.


Increase Blood Platelets

                      Increase Blood Platelets


डेंग्यू, मलेरियासारख्या आजारात
प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याने रुग्ण दगावल्याच्या बातम्या हल्ली आपण वर्तमानपत्रांतून वाचत आहोत.

या बातम्या वाचून
‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’
हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.

हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’
ही संज्ञा वापरली आहे.

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.
लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.
प्लेटलेट्सचं कार्य

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.

अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.
प्लेटलेट्सची संख्या
सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.

संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.

संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.
प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी
संख्या कमी झाल्यास…

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.
प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                      
कृपया ही माहिती
सर्व लोकांपर्यन्त पोहचवा.
🙏🙏🙏🙏
नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .
जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.
शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा….

१.पपई –
पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.

२.गुळवेल
गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

३.आवळा
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन ‘सी’ प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

४.भोपळा
भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन ‘ए’ ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

५.पालक
पालक व्हिटॅमिन ‘के’चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन ‘के’ योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

६.नारळ पाणी
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

७.बीट
बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेत byल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect