#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Thursday, 25 February 2016

सागर

                                   सागर 🙏 माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. 🙏

सागर

आवडतो मज अफाट सागर
अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर
सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफेत शिंपित
वाटे वरती सडे
हजार लाटा नाचत येती
गात किनाऱ्या कडे

मउ मउ रेतीत कधी मी
खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या
वाऱ्याच्या संगती

संथ सावळी दिसती जेंव्हा
क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला
जावेसे वाटते

खडकावरूनी कधी पाहतो
मावळणारा रवी
ढगा ढगाला फुटते जेंव्हा
सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेंव्हा
जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी
येती छातीवरी

दर्यावरची रंगित मखमल
उचलुन घेते कुणी
कृष्णसावल्या भुरभुर पडती
गगनाच्या अंगणी

दूर टेकडी वरी पेटती
निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता
घरी जायला हवे
कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect