#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Wednesday, 15 June 2016

बाप

वडील

आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,
आयुष्यातील श्रद्धास्थान .
आईवर खूप लिखाण आहे.मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.
या कम्युनिटीत आपण वडीलांची थोरवी ,जशी आपल्याला जाणवली ती शब्दात मांडण्याचा प्रयत्न करू या.

वडील

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच

सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात

ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात

दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही

          आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात पण घराच्या या अस्तित्वाला खरच आम्ही कधी समजून घेतले आहे का? वडीलांना महत्व असुनही त्यांच्या विषयी जास्त लिहिले जात नाही, बोलले जात नाही, कोणताही व्याख्याता आईविषयी बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचे महत्व अधिक सांगितले आहे. देवदेविकांनी आइचेच गोडवे गायले आहेत. लेखाकांनी कविनी आईचे तोंडभरून कौतुक केले आहे. चांगल्या गोष्टिना आईची उपमा दिली जाते पण वडिलांविषयी कुठेच फारस बोलले जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणाराच, समजा एक दोन टक्के असे बाप असतील पण चांगल्या वडिलांबद्दल काय?आईंकडे अश्रुंचे पाट असतात पण वडिलांकड़े संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वाडीलांनाच करावे लगते आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त तान पडतो कारण ज्योतिपेक्षा समयीच जास्त तापते ना? रोजच्या जेवानाची सोय करणारी आई आमच्या लक्षात रहते पण आयुष्याच्या शिदोरिची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई मोकळेपनाने रडू शकते, पण रात्रि उषित तोंड खुपसून मुस्मुसतात ते वडील असतात. आई रड्ते, वाडिलांना रडताही येत नाही, स्वतःचे वडील वारले तरी रडता येत नाही, कारण त्यांना छोट्या भावंडांना जपयाचे असते. आई गेली तरीही रडता येत नही कारण बहिनिचा आधार व्हयाच असत. पत्नी अर्ध्यावर साथ सोडून गेली तरी पोरांसाठी आधार बनवा लागतो.जिजाबाई नि शिवाजी घडवला अस आवश्यक म्ह्नव पण त्याच वेळी शहाजी राजाची ओढातान सुद्धा ध्यानात घ्यावी. देवकीच, यशोधाच कौतुक अवश्य करावं पण पुरातून पोराला डोक्यावर घेउन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम हा कौसलेचा पुत्र अवश्य असल पण पुत्र वियोगाने तड्फ़ड्न मरण पावला तो पिता दशरथ होता.


         वडीलांच्या टाचा झीजलेल्या चापलाकडे पाहिले की त्यांचे प्रेम कळते. त्यांचे फांटके बनियान बघितले की कळते "आमच्या नशिबाची भोके त्यांच्या बनियानला पडलित". त्यांचा दाढ़ी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊँन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पाँन्टच वापरातिल. मुलगा सलून मधे २०-२५ रुपये खर्च करतो. मुलगी पार्लर मधे खर्च करते पण घरातला दाढीचा साबन संपला म्हनून आंघोळीच्या साबनाने करतात. अनेकदा ते नुसत पानी लावून दाढ़ी करतात. वडील आजारी पडले तरी डॉक्टर कड़े जात नाहीत, ते आजराला घाबरत नाहीत पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याना भिती वाटते. कारण पोरिचे लग्न, पोराचे शिक्षण बाकी असते, घरात उत्पन्नाचे दूसरे साधन नसते, ऐपत नसते तरीही मुलाला मेडिकल ला एन्जिनिअरिंग ला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढातान करून मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात, पण सर्वच नसली तरीही कही मुले अशी असतात की जे पैसे आले की मित्रांना पार्ट्या देतात आणि ज्या वडिलांनी पैसे पाठवले त्यांची टिंगल करतात. एकमेकांच्या बापच्या नावाने एकमेकाना हाका मारतात.आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात. ज्या घरत वडील आहेत त्या घराकडे वाइट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण त्या घरचा कर्ता जिवंत असतो. कोणत्याही परिक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते, कवताळते, कौतुक करते, पण गुपचूप जाउन पेढयांचा पुढा घेउन येणारा बाप कोणाच्या लक्षात रहत नाही. चटका लागला, ठेच लागली की "आई ग" हा शब्द बाहेर पडतो पण रास्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येउन ब्रेक लागतो तेव्हा "बापरे" हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटकाळी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो. काय पटते न????


     कोणत्याही मंगल प्रसंगी सर्वजन जातात पण मयाताच्या प्रसंगी बापाला जावे लगते. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी सारखा जात नसतो पण गरीब लेकिच्या घरी तिच्या काळजी पोटी सारखा फेरया मारेल. मुलाच्या नोकरीसाठी लाचार होनारा बाप, मुलीच्या लग्नासठी उम्बरठे झिजवणारा बाप, घरच्यासाठि स्वतःच्या व्यथा दड़्पनारा बाप..........खरच किती ग्रेट असतात न????वडिलांचे महत्व कोणाला कळत? लहानपनीच वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खुप लवकर पेलाव्या लागतात, एकेका वस्तुसाठी तरसावे लागते त्याना. वाडिलाना खऱ्या अर्थाने समजून घेते ती मुलगी. सासरी गेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापशी फोनवर बोलताना बदलेला आवाज एक क्षणात  कळतो., ती अनेक प्रश्न विचारते. कोनतिही मुलगी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेउन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढ़ते. मुलगी बापाला जानते, जपते..... इतारांची श्रद्धा, असाच आपल्याला जानावा हीच प्रत्येक बापाची किमान अपेक्षा असते.



आई, ताई, दादा यांच्या पुढेही एक अतूट नातं असतं

त्या नात्याचं नाव 'बाबा' असतं.

हाताचे बोट धरून चालायला शिकवणारे,

कामावरून येताना दररोज खाऊ घेऊन येणारे

पाठ दुखत असली तरी आपल्या मुलाला घोडा बनून खेळवणारे,


आजारी पडल्यावर काळजीपोटी उशाशी बसणारे,

आपल्याला हसवणारे आणि खेळवणारे,

आईने कधी मारले तर तिच्यावरच रागावणारे

आपली मुले खूप मोठी व्हावीत म्हणून झटणारे,। 
आपल्या लेकरांसाठी उंच उंच अपेक्षा बाळगणारे,

वाईट वागल्यावर खूप ओरडणारे,

छोटी चूक झाल्यास ती पोटात घालून प्रोत्साहन देणारे,

चांगले काम केल्यावर तोंड भरून कौतुक करणारे,

परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर तेवढेच रागावणारे

सर्वांवर प्रेम करणारे व सर्वांना समजून घेणारे,

कधी वेळ आलीच तर पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे,

बालपणापासून खाल्ल्या त्यांनी परिस्थितीमुळे खस्ता,

कितीही संकटे आली तरी गाठला उज्ज्वल यशाचा रस्ता.

आजपर्यंत आपल्या प्रेमळ वागण्याने किती मोठे कर्ज दिले आम्हास मायेचे

कसे ऋण फेडू या जन्मदात्याचे!




No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect