#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Monday, 27 March 2017

मराठी व्याकरण माला

.

🏀 *वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला 'काळ' असे म्हणतात*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🏀 *काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात*.
🎾 *वर्तमान काळ*

🎾 *भूतकाळ*    

🎾 *भविष्यकाळ*
🔹🔹🔹🔹
 🏀 *वर्तमानकाळ*---:

🏀 *क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ 'वर्तमानकाळ' असतो*

उदा.    
मी आंबा खातो.

मी क्रिकेट खेळतो.

ती गाणे गाते.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🏀 *वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात*.

🔹 *i) साधा वर्तमान काळ*
🏀 *जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला 'साधा वर्तमानकाळ' असे म्हणतात*.

उदा.    
मी आंबा खातो.

कृष्णा क्रिकेट खेळतो.

प्रिया चहा पिते.

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔹 *ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ*----

🏀 *जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला 'अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ' म्हणतात*



उदा.    
सुरेश पत्र लिहीत आहे.

दिपा अभ्यास करीत आहे.

आम्ही जेवण करीत आहोत.

🔹 *iii) पूर्ण वर्तमान काळ*--
      *जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला 'पूर्ण वर्तमानकाळ' असे म्हणतात*..

उदा.    
मी आंबा खाल्ला आहे.

आम्ही पेपर सोडविला आहे.

विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔴 *iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ*--

*वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला 'रीती वर्तमानकाळ' असे म्हणतात*

उदा.    
मी रोज फिरायला जातो.

प्रदीप रोज व्यायाम करतो.


🏀वरील प्रकारांचा सराव घेण्यासाठी पाठातील वाक्या मुलाना घ्यायला लावावे.

🏀प्रथम त्यातील फक्त वर्तमानकाळाची वाक्ये शोधायला सांगून नंतर ..

🏀त्या सर्वच वाक्यांचे उपप्रकारात वर्गीकरण सराव घ्यावा.

🏀एक बाब माहत्वाची वाटते काळाचे हे प्रकार जर मराठीत पक्के झाले की इंग्रजीत सुद्धा त्याचा खूप होतो.

🏀जितका सराव जास्त तितके दृढीकरण पक्के .


No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect