करुन बघा..!
निसर्गाचा नियम आहे," निसर्गातूनच घ्यावे निसर्गालाच द्यावे." पावसाळ्यात सगळीकडेच वृक्षारोपण होते. १०० पैकी १०-५ झाडे जगतात. दुष्काळी परिस्थितीत बहुतेक सगळीकडेच लावलेली झाडे मृतावस्थेत आढळत आहेत. आमचीही समस्या वेगळी नाही. दुष्काळ, प्यायलाच पाणी नाही; तर झाडांनां, प्राण्यांना कुठून देणार?
यावर उपाय म्हणून, झाडे वाचवण्यासाठी आम्ही पडलेल्या पालापाचोळ्याचा व दगड-गोट्यांचा, खड्यांचा उपयोग केला. झाडाच्या खोडाला साधारण पालापाचोळ्याचा एक फुटाचा थर करायचा. मग आठवड्यातून एकदा अर्धा लिटर पाणी टाकलं तरी झाड तग धरतं. पालापाचोळ्या मुळे झाडाच्या मुळांपर्यंत उन पोहोचत नाही, ओलावा टिकून राहतो आणि त्यामुळे झाडांची वाढ सहज होते. यासाठी आपण दगड, खडे यांचा सुद्धा वापर करू शकतो. पालापाचोळ्याप्रमाणेच याचंसुद्धा झाडाच्या खोडाला आच्छादन तयार करायचं. मग बघा, वृक्षवल्ली कशी डोलते ! या पद्धतीने आमची शाळेतील झाडे जिवंत आहेत. एक-दोन वर्षात शाळेतील झाडांची दाटी नक्कीच वाढलेली असेल.
ही युक्ती वृक्षमित्र गोरख जाधव सर यांच्याकडून मी शिकले. जाधव सर तळेवस्तीला (नांदगाव) माझे सहकारी होते. गुरेवाडीला मात्र याचा पुरेपूर फायदा झाला.
हे तंत्र आपल्याही नक्कीच उपयोगी पडेल....
-आशा चिने, गुरेवाडी, सिन्नर
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!