मैत्री
हवेतला गारवा
रानातला पारवा
गितातला मारवा
मैत्री म्हणजे
गाण्यातील तान
बेलाचे पान
देवाचे ध्यान
मैत्री म्हणजे
चैत्राची चाहुल
चाफ्याचे फूल
माघातले ऊन
मैत्री म्हणजे
ग्रिष्मातला पळस
देवळाचा कळस
दारातील तुळस
मैत्री म्हणजे
चंद्राची कोर
नाचरा मोर
आंब्याचा मोहोर
मैत्री म्हणजे
नदीचा काठ
नागमोडी वाट
डौलदार घाट
मैत्री म्हणजे
सुखाला होकार
दु:खाला नकार
जीवनाला आधार !
मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
: कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माईल
देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..!!
: परिचयातुन जुळते ती मैत्री,
विश्वासाने जपते ती मैत्री,
सुखात साथ मागते ती मैत्री,
आणि दुःखात साथ देते ती मैत्री,
चुकावर रागवते ती मैत्री,
यशावर सुखावते ती मैत्री,
पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री,
डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री,
आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री..!!!
“मैत्री”
ना सजवायची असते
ना गाजवायची असते
ती तर नुसती रुजवायची असते
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो.
: हरिवंशराय बच्चनजी की सुन्दर कविता—
अगर बिकी तेरी दोस्ती…
तो पहले ख़रीददार हम होंगे..!
तुझे ख़बर न होगी तेरी क़ीमत ..
पर तुझे पाकर सबसे अमीर हम होंगे..!!
दोस्त साथ हो तो रोने में भी शान है..
दोस्त ना हो तो महफिल भी समशान है!
सारा खेल दोस्ती का है ऐ मेरे दोस्त,
वरना जनाजा और बारात एक ही समान है !! ….
: मैत्री….
चालता चालता हळूच हात हाती धरावा
अशी मैत्री असावी
मनमोकळेपणाने बोलता याव अशी मैत्री असावी….
थकल्यानंतर जस झाडाखाली बसाव
अन् … न सांगताही मनातल ओळखाव
दोन घडी भेट झाली नाही
तर चुटपुट लागावी
मैत्री अशी असावी….
भेटल्यावर मात्र भडाभड बोलाव
आयुष्यातल्या कृत्रिमपणाला विसराव
अशी छान मैत्री असावी….
एकाच दु:ख दुसर्याला कळाव
अन् …. आठवण होताच सगळ विसराव
मैत्री अशी असावी….
…..: प्रत्येक नात्यात एक रेशमी धागा असावा…
मैञी चा त्याला सुवास असावा. .
प्रेमाचा त्याला रंग असावा…
आपलेपणाचा त्यात ओलावा असावा. …
“
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!