योगाचे फायदे
योगाचे फायदे
योगाचे १० सर्वात महत्वाचे फायदे.
वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य, यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतू प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्र्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्र्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात १० महत्वाचे फायदे आता आपण बघणार आहोत.
१. सर्व स्तरांवर तंदुरुस्ती. नुसती शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वस्थ राहिलं पाहिजे. श्री श्री रविशंकर जी नेहमी म्हणतात “फक्तं रोग विरहीत शरीर असन्याला स्वास्थ्य महता येणार नाही, तर आनंद, प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल”.
या ठिकाणी योगाच तुमच्या मदतीला धावून येतो. त्यासाठी आसने, प्राणायाम (श्र्वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यान धारणा या गोष्टी आरोग्य उत्तम राखायला आपल्याला उपयोगी पडतात.
योगा – माझे वैयक्तिक स्तरावर आरोग्य राखण्याचा मंत्र
माझे वजन कमी करण्याचे सूत्र
माझे मन शांत करण्याचा उपाय
माझे उत्तम प्रकारे संवाद साधण्याचे हत्यार
माझे क्रियाशीलता वाढविणारे यंत्र
माझे शंकांचे निरसन करणारे साधन
माझे वेळेची आखणी करणारे उपकरण.
२. वजनात घट. याहून तुम्हाला अधिक काय पाहिजे ! योगाचा फायदा इथे सुद्धा होतो. सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते योगाच्या सहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची जाणीव आपल्याला होते. योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात रहायला मदत होते.
३. ताण तणावा पासून मुक्ती. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणार्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा रोज केलेला सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात.
४. अंर्तयामी शांतता. आपल्या सगळ्यांनाच एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते. परंतू आपल्याला हवी असणारी शांती ही आपल्यामध्येच वसलेली आहे हे फार थोड्या लोकांना माहित असेल, फक्त या शांतीची अनुभूती घेण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढायला हवा. या छोट्याशा सुट्टीत रोज योग आणि ध्यान केल्याने त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळतात. अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगा सारखा दुसरा उपाय नाही.
५. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ. शरीर, मन आणि आत्मा या तिघांचे मिळून एकसंघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात तसेच मानसिक अस्वस्थपणाचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्र्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
६. सजगतेत वाढ होते. मन हे सतत कुठल्या ना कुठल्या क्रियेत गुंतलेले असते. ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यात झोके घेत असते पण वर्तमान काळात मात्र ते कधीच राहत नाही. आपल्यातली सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्या सहज लक्षात येते; आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताण तणावातून मुक्त होऊ शकतो; आणि मनाला शांत करू शकतो. योगा आणि प्राणायाम यांच्या मदतीने आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्याने इकडे तिकडे पळणार्या मनाला आपण परत वर्तमान क्षणात आणू शकतो. तसे केल्याने ते आनंदी आणि एकाग्र बनते.
७. नाते संबंधात सुधारणा. तुमचा जोडीदार, आई वडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात . तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यां सारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते. योगा आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.
८. उर्जा शक्ती वाढते. दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे शेवटी तुम्हाला गलठून गेल्यासारखे वाटते कां? सतत दिवसभर काम करत राहिल्याने तुम्ही पार थकून जाता. तुमच्यात काही त्राण उरत नाही. परंतू रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता. दिवसभराच्या कामाच्या धबडग्यातून तुम्ही मध्येच १० मिनिटांचा वेळ काढून मार्गदर्शित ध्यान जरी केलेत तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्यात परत उत्साह संचारेल आणि हातात घेतलेले काम तुम्ही तत्परतेने पुरे कराल.
९. शरीरातल्या लवचिकपणात आणि शरीराची ठेवण सुधारते. तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना, चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल. चुकीच्या पद्धतीने बसण्या उठण्या मुळे पूर्वी जे अंग दुखायचे तसे ते दुखणार नाही.
१०. अंतर्ज्ञानात वाढ. तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगा आणि ध्यान धारणा या मध्ये आहे. तशी ती झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. योगा केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात तुम्हाला फक्त याची अनुभूती घ्यायची असते.
एक लक्षात ठेवा, योगा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिचा सराव सतत करत रहा !
योगाच्या सरावामुळे शरीर आणि मन जरी कणखर बनत असले तरी औषधांना तो पर्याय नाही. (जरूर तेव्हा औषधे ही घेतलीच पाहिजेत).
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस pdf
क्रिया : १) दंडासनात बसून डावा पाया दुमडून टाचेला सिवनीवर (गुदा वा उपस्थेंद्रीयाच्या मध्य भागावर) लावा. २) उजव्या पायाच्याटाचेला उपस्थेंद्रीयाच्या वरील भागावर स्थिर करा. ३) डाव्या पायाच्या घोट्यावर उजव्या पायाचा घोटा पाहिजे. तळपाय, जांघा वा पोट-यांच्या मध्ये असावे.४) गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. दोन्ही हात ज्ञान मुद्रेच्या स्थितीत गुडघ्यावर टेकून ठेवा. Read More....
Posted On : 09 Dec 2010 Visits : 59483
| ||||||||||||||||||||
क्रिया :१. जमिनीवर पालथे झोपा. हात दुमडून तळवे एकमेकांवर ठेवा.२. माथा दोन्ही हातावर टेकवून ठेवा. पायात एक फूटाचे अंतर असावे.३. शरीराला प्रेतासारखे शिथिल सोडा. या आसनात झोपून तुम्ही प्रेताचे ध्यान करा आणि विवेकपूर्वक चिंतन, मनन करत स्वत:ला आत्मकेंद्रित करा. मी या शरीरापासून पृथक, शुद्ध-बुद्ध, आनंदमय व अविकारी चैतन्य आत्मा आहे. हे शरीर तर नश्वर आहे. हे शरीर केवळ पंचतत्वांचा समूह आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे शरीर पंचतत्वात विलीन होऊन जाईल. हे शरीर व इतर संपत्ती इथेच राहून जाईल. Read More....
Posted On : 30 Nov 2010 Visits : 41780
| ||||||||||||||||||||
क्रिया - १. एखाद्या लांब वस्त्राची गोलाकार गादी बनवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंतवा व कोपर्यापर्यंत हात जमिनीवर टेकवा. गुंडाळी हातांच्या मध्ये ठेवा.२. डोक्याचा वरचा भाग गादीवर व गुडघे जमिनीवर टेकलेले असावेत. आता शरीराचा भार मानेवर व कोपरांवर संतुलित करत पायांना जमिनीच्या समानांतर सरळ करा.३. आता एक गुडघा दुमडत वर उचला व त्यानंतर ताबडतोब दुसरा गुडघाही वर उचलून दुमडून ठेवा.४. आता दोन्ही गुडघ्यांना एक एक करून वर उचलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला घाई करू नका. हळू हळू पाय सरळ करा. जेव्हा पाय सरळ होतील तेव्ह Read More....
Posted On : 10 Nov 2010 Visits : 48253
| ||||||||||||||||||||
क्रिया - १) जमिनीवर सरळ झोपा. श्वास आत घेऊन हळू हळू पाय उचला. आधी ३० डिग्री, मग ६० डिग्री, मग ९० डिग्री उचलल्यानंतर श्वास बाहेर सोडत पाठ उचलत पायांना डोक्याच्या मागे न्या. सुरुवातीला हातांना आधारासाठी कंबरेच्या मागे लावा. २) हळू हळू पायांना डोक्याच्यामागे टेकवून दोन्ही गुडघे वाकवून कानांना लावा. श्वासाची गती सामान्य ठेवा. पूर्ण स्थितीत आल्यावर हात जमिनीवर सरळ ठेवा. अशा स्थितीत ३० सेकंद रहा. ३) परत पूर्वस्थितीत येताना जमिनीवर हातांनी दाब देत गुडघे सरळ ठेवत पाय उचलून परत जमिनीवर टेकवा. Read More....
Posted On : 02 Nov 2010 Visits : 42162
| ||||||||||||||||||||
क्रिया - १) पद्मासनात बसून उजव्या हाताचा तळहात आधी नाभीवर ठेवा. २) आणि डावा तळहात उजव्या हातावर ठेवा. ३) मग श्वास बाहेर सोडून पुढे वाका. ४) हनुवटी जमिनीवर टेकवा व नजर समोर ठेवा.५) श्वास आत घेऊन पूर्वस्थितीत या. असे ४-५ वेळा करा. Read More....
Posted On : 28 Oct 2010 Visits : 42952
| ||||||||||||||||||||
क्रिया - १. वज्रासनात बसून श्वास आत घेऊन दोन्ही हात वर उचला. २. पुढे वाकत श्वास बाहेर सोडा व हात समोर पालथे ठेवावे. कोपरापर्यंत हात जमिनीवर टेकवा. ३. डोकेसुद्धा जमिनीवर टेकवा. ४. काही वेळ अशा स्थितीत राहून पुन्हा वज्रासनात या. Read More....
Posted On : 27 Oct 2010 Visits : 40861
| ||||||||||||||||||||
क्रिया - १. सरळ झोपून डाव्या पायाचा गुडघा छातीवर ठेवा. २. दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवून गुडघ्यावर ठेवा. श्वास बाहेर सोडत गुडघा दाबून छातीला लावा व डोके वर उचलत गुडघ्याने नाकाला स्पर्श करा. जवळ जवळ १० ते ३० सेकंद पर्यंत श्वास बाहेरच ठेवून अशा स्थितीत राहून मग पाय सरळ करा. हे २/४ वेळा करा. ३. असचे दुस-या पायाने पण करा. शेवटी दोन्ही पाय एकदम उचलून आसन करा. म्हणजे एक चक्र पूर्ण झाले. असे ३-४ वेळा करा. ४. दोन्ही पायांना पकडून कंबरेला मालीश करा. शरीराला मागे पुढे उजवीकडे डावीकडे करा. Read More....
Posted On : 22 Oct 2010 Visits : 38894
| ||||||||||||||||||||
क्रिया : १) पद्मासनाच्या स्थितीत बसून हातांची मदत घेऊन मागे कोपरे टेकवून झोपा. २) हात वर उचलून तळहात खांद्यामागे जमिनीवर टेकवा. तळहातांवर दाब देऊन मान जितकी मागे वळवता येईल तेवढी वळवा. पाठ ताणलेली व छाती वर उचललेली असावी. गुडघे जमिनीपासून दूर होऊ देऊ नका. ३) हातांनी पायांचे अंगठे पकडून कोपरे जमिनीला टेकवा. श्वास आत घ्या. ४) आसन सोडताना ज्या स्थितीत सुरु केले होते त्याच स्थितीत परत या खांदे व डोके जमिनीवर टेकवत पाय सरळ करून शवासनात झोपा. ५) हे सर्वांगासनाचे प्रतियोगी आसन आहे. Read More....
Posted On : 14 Oct 2010 Visits : 36851
| ||||||||||||||||||||
क्रिया : १) वज्रासनात बसून दोन्ही हाताच्या मुठी वळवा. मुठी बंद करताना अंगठे बोटांच्या आत दाबून ठेवा. २) दोन्ही मुठी नाभीच्या दोन्ही बाजूला लावून श्वास बाहेर सोडा व समोर वाका. नजर समोर ठेवा. ३) थोडावेळ या स्थितीत राहून मग पुन्हा वज्रासनात या. असे ३-४ वेळा करा. Read More....
Posted On : 08 Oct 2010 Visits : 36294
| ||||||||||||||||||||
क्रिया - १. जमिनीवर पालथे झोपा. गुढघ्यात पाय दुमडून टाचा नितंबावर ठेवा. गुडघे व पंजे एकमेकांना जोडलेले असावेत. २. दोन्ही हातांनी पायांच्या घोट्याजवळ पकडा. ३. श्वास आत घेऊन गुढघे व मांड्यांना क्रमशः उचलत वरच्या बाजूला ताणा. हात सरळ असू द्या. ४. मागचा भाग उचलल्या नंतर पोटाचा वरील भाग छाती, मान व डोकेसुद्धा वर उचला. नाभी व पोटाच्या खालचा भाग जमिनीवरच असू द्या. ५. शरीराची आकृती प्रत्यंचा ताणलेल्या धनुष्यासारखी होईल. अशा स्थितीत १० ते ३० सेकंद रहा. Read More....
|
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!