#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Monday, 27 March 2017

ABL चा प्रभावी वापर



♻ *ABL चा प्रभावी वापर*

*ABL( Activity Based Learning)कृतीयुक्त अध्ययन पद्धती*:-

ABL ही एक प्रभावी व परिणामकारक अशी अध्ययन पद्धती आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती पेक्षा ही पद्धत वेगळी असून विध्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. त्यामुळे केलेले अध्ययन हे प्रभावी व चिरकाल टिकणारे असते. या पद्धतीत शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते.

  *ABL पद्धतीची संकल्पना* :-

या पद्धतीत मुलांना स्वतः कृती करून शिकावे लागते. यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी च्या वर्गांच्या अभ्यासक्रमाची मांडणी माईल स्टोन मध्ये ( milestone )मध्ये केलेली आहे. यात घटक, उपघटक, पाठय मुद्दे वेगवेगळ्या कृतींमध्ये विभागले आहेत. या कृती/ कार्ड यांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे मइलेस्टोल होय. असे प्रत्येक विषयात 10 ते 15 टप्पे म्हणजे milestone आहेत.
            या milestone ची मांडणी केलेला तक्ता म्हणजे ladder होय. ladder हे त्या विषयाचे वार्षिक नियोजन असते. प्रत्येक ladder वरील प्रत्येक milestone मध्ये 10 ते 14 कृती / कार्ड असतात. यातील कार्डांपैकी पहिल्या कार्डावर संकल्पना / संबोध स्पष्ट केलेला असतो. पुढे पुढे त्याची व्याप्ती वाढत जाते व भरपूर सराव असतो. सरावानंतर शेवटी मूल्यमापनावर / शिष्यवृत्तीवर आधारित कार्ड वि. सोडवावे लागते. मूल्यमापन कार्ड (गुच्छ) म्हणजे त्याने अभ्यासलेल्या घटकावर आधारित चाचणी असते. ती चाचणी वि.स अचूक सोडवत आली तर तो milestone त्या वि.चा पूर्ण झाला असे समजावे . जर त्यास अचूक चाचणी सोडवता नाही अली तर पुन्हा त्या milestone मधील कार्ड सोडवावेत.

*ABL साहित्याची ओळख*:-

                 ABL चे साहित्य / कार्ड कोणत्या इयत्तेचे आहे हे समजण्यासाठी प्रत्येक इयत्येचा रंग निश्चित केलेला असून तो रंग त्या इयत्तेच्या कार्ड भोवती दिलेला आहे.
इयत्ता व रंग पुढीलप्रमाणे
      इयत्ता           रंग
     पहिली।         लाल
     दुसरी।           हिरवा
     तिसरी।          निळा
     चौथी।           केशरी

       रंगप्रमाणेच प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे लोगो वापरलेले आहेत.ते पुढीलप्रमाणे
        विषय।        लोगो
        भाषा           प्राणी
        गणित।        पक्षी 
        इंग्रजी          वाहने
        परिसर1      फळे
        परिसर2      दिवे
  प्रत्येक कार्डाच्या उजव्या कोपऱ्यातील अंकावरून त्या कार्डाचा ladder वरील क्रमांक समजतो. त्याखालील क्रमांक हा कोणत्या माईलस्टोन मधील कितव्या क्रमांकाचे कार्ड आहे हे समजते.या क्रमांकाचा उपयोग वर्क डन रजिस्टर मध्ये नोंदवण्यासाठी होतो.

  *वर्गखोलीचे नियोजन*: -

        या अध्ययन पद्धतीत इयतानिहाय वर्ग नसून विषयनिहाय वर्गखोली असते.त्या त्या वर्गखोलीत त्या त्या विषयासाठी स्वतंत्र रँकची रचना करून त्यात इ.१ली ते ४थी ची सर्व कार्ड ठेवायची असतात.तसेच त्या विषयाचे इ१ली ते ४थी चे ladder  भिंतीवर लावायचे. त्यामुळ एकाच वेळी सर्व स्तरातील वि. त्या विषयाची अध्ययन कार्ड सोडवू शकतात.
    

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect