जागतिक महिला दिन
२०१७
“ स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य”
“पिता रक्षति कौमार्ये, भर्ता रक्षति यौवने
पुत्रश्च स्थाविरे भावे, न स्त्री स्वातंत्र्य मर्हती !”
कौमार्याचे रक्षण पिता करतो, तारुण्याचे रक्षण पती करतो, जेंव्हा मुलं मोठी होतात, तेंव्हा स्त्री त्यांच्या सरंक्षणावर अवलंबून असते. स्त्री स्वतंत्र नाहीच. मनुस्मृती मध्ये मनुने एवढ्या वर्षापूर्वी लिहुन ठेवलेले हे वचन आज या घडीला ही तितकेच सत्य आहे.
स्त्रीला नेहमीच बंधनात रहावे लागते.ती सतत कुणाच्या ना कुणाच्या हातातील खेळणं बनत आहे. बंधनापासून किंवा पाशा पासून मुक्ती अशा अर्थाचा “स्वातंत्र्य” हा शब्द. अर्थातच स्त्री स्वातंत्र्य म्हणजे स्त्रियांची बंधनातून मुक्तता. खरंतर आज “स्त्री स्वातंत्र्य” हे नाणे वापरुन वापरुन गुळगुळीत झाले आहे. जो तो उठतो आणि स्त्री स्वातंत्र्यावर बोलतो. विचार केला तर असा प्रश्न पडतो, कि स्त्रीला स्वातंत्र्य हवे ते कुणा पासून?पती, पिता, भाऊ कि मुलापासून? कि समाजा पासून? प्रथम स्त्रीने आपल्या स्वातंत्र्याच्या अपेक्षा निश्चित केल्या पाहिजेत.कशा प्रकारचे स्वातंत्र्य?—आर्थिक,सामाजिक, कि बोलण्याचे,विचार करण्याचे, कि फ़िरण्याचे स्वातंत्र्य हवे? ५० वर्षापूर्वी हा विषय एवढा चिघळला गेला नव्हता.म्हणजे त्या काळी स्त्री ही स्वतंत्र होती का?सुरक्षित होती का? हा प्रश्न पडल्या वाचुन रहात नाही. परंतु सहनशील स्त्री ,व पती हा परमेश्वर मानणारी त्या काळच्या स्त्रीचे रुप अधिक वेगळे काय असणार?
अधिक वाचा...
अधिक वाचा...
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!