#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Sunday, 31 December 2017

आशा









जुने-नवे काही नसते,
विचारधाराच त्या बदलत असतात ।
त्याच मखमली चादरीवर,
नक्षी नव्याने विणायच्या असतात ।

वर्ष सरले कसे म्हणता ?
स्वप्न काठांवरून ओथंबू द्या ।
किनार करून नव्या वर्षाची,
झरा बनून खळाळू द्या ।

नसेलही कळीचे फुल झाले,
नसेलही श्रावणात मेघ दाटले ।
आठवणी जुन्याच आंबट-गोड,
पुन्हा नव्याने उजळू द्या । 

सुंदरशा या जीवन चित्रात,
रंग नव्याने भरू या ।
होईल उष:काल आनंदाचा,
अशी "आशा" करू या ।

काव्यलेखन
श्रीमती आशा चिने 

Sunday, 17 December 2017

कथा स्नेहसंमेलनाची

📙📙📙📙📙📙📙📙

माझ्या कविता सदर
📙📙📙📙📙📙📙📙

कथा स्नेहसंमेलनाची 



माझा उपक्रम
स्नेहसंमेलन व महिला मेळावा
उपक्रम एकाच दिवशी असतो
कारणही तसेच -उपस्थिती चांगली असल्याने कार्यक्रम फुलतो
...
सध्या तयारी चालू असल्याने सुचले!


कथा स्नेहसंमेलनाची 
💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃

मॅडम-मॅडम स्नेहसंमेलन कधी घेणार?
घेऊ..! थोडा अभ्यास आधी करूया!
मॅडम, तुम्ही सांगाल ते ऐकू,
पण, आधी आमचे डान्स घ्या।

सर्वांनाच कसे आवडते? खेळायला अन् नाचायला,
हा उपक्रम सांगून गेला, विद्यार्थ्यांना शाळेकडे वळायला।

सगळं कसं डान्समय, वातावरण अन् विचारही,
शिक्षकांनी आपला डान्स आधी घ्यावा,म्हणून आधीच अभ्यास उरकलेला।

कधी धड प्रश्नांची उत्तरे न दिलेले, करताय चर्चा इवल्या-इवल्या,
रिकामा वेळ असो वा मधली सुट्टी, डान्सच्याच गप्पा रंगलेल्या।

दुसरी कोणाचीच मदत नको, मॅडम तुम्हीच डान्स घ्या,
बरं! चला म्हणताच, एकच कल्लोळ केलेला।

गाणं कोणतंही घ्या पण, स्टेप करणार मॅडमनेच दिलेल्या,
स्वारी स्वप्नातही जाम खुश, दरम्यान शाळाही लवकरच भरणार।

मला छान डान्स येतो ऐकून, उगाचच जास्त करणार,
"सर्वांनाच डान्स"ही उक्ती, मग कामच करून जाणार।

अबोल कळ्याही खुलणार, अन् खुललेल्या तर टवटवीत होणार,
शाळाच काय अहो गावंच, गाणार अन् नाचणार।

जेवण जास्तच अन् झोपही मस्तच, उपस्थिती अन् गुणवत्ताही टिकणार,
सर्वांगीण विकास साधत, स्नेहसंमेलन दरवर्षीच येणार।

अहो हे काय थोडं ? आईही स्वप्न बघणार!
मुलांचं उरकलं म्हणजे आपलाही महिला मेळावा होणार!

कधी सभेला न येणारी माता, उगीच शाळेत येणार,
झाली का तयारी म्हणत,मतं जाणून घेणार।

मीही लवकरच आहे,म्हणत खुश करून देणार,
किती छान गंमती! दररोज कोणाला सांगणार?

विदयार्थ्यांना वाटतं की, माझी आई स्नेहसंमेलनाला येणार,
पण, खरं सांगू! स्नेहसंमेलन एक बहाणा,
मातेची स्वारी तर मेळाव्यातच खुश होणार।

मागच्या वेळेस नाही जमलं, ह्या वेळेस तिला दाखवणार,
मलाही सर्वच जमतं म्हणून किचनमध्येच तयारी करून घेणार।

दोरी उड्या मध्येच फुगडी, कबड्डी समजून मारतेय उडी,
चमचा-लिंबू नाही पोहे खायचेय, आवाज येताच धावतच खडी।

स्नेहसंमेलनाची गंमत-जंमत न्यारीच,
उत्साहाचे वातावरण सगळीकडे, औत्सुक्य अन् प्रगतीही खरीच।

💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃

📙📙📙📙📙📙📙📙
  श्रीमती आशा चिने 
📙📙📙📙📙📙📙📙

विचारांचा विचार करा









विचारांचा विचार करा
रविवारच्या या निवांत क्षणी
विचार आले माझ्या मनी
घर आवरावे की मार्केटला जावे
विचारही नव्हे नवखे।


अंथरुणातून उठताच नजर गेली
गादीखालच्या कागदांवर
कॅरीबॅग अन् भलतेच काही
अडगळीचे अन् महत्वाचे।



काही जीवावर आले 
म्हणून ठेवलेले
अन् काही पटकन 
सापडावे म्हणून ।



आज वाटलं काढावं 
सगळ्यांना बाहेर
बघावं काय-काय
महत्वाचं म्हणून ठेवलेलं।



दुकानदाराशी भांडून एक "extra"

कॅरीबग द्या साठीचा आग्रह
अन् त्यासाठी त्याने आपल्याला
आधीच लुटलं हेही माहीत नसलेलं।


एका "फ्री"च्या कॅरीबॅगने "अख्खी"
शॉपिंग आनंदात घालवत
कधी नको ते उचलून आणलेलं
तर कधी खूपच महत्वाचं म्हणून ठेवलेलं।



लग्नपत्रिका, झेरॉक्स, अन्
कधी कोरेच कागदं
कधी बँकेची अन् आणखी बरंच काही
हवं तेव्हा न मिळालेलं।



आज वाटलं खूप झालं 
आता बस्स!आवरूया सगळं
तर त्यात कामाचं थोडंच
अन् बाकी तर घाणच घाण।



मोह आवरतो कुठं
पण आज कळलं
मार्केटला जाऊन काय आणलं
म्हणून घरच आवरलं।



मग मंडळी आपल्याही
गादीखाली बघा...
आवरायचंय की
आवरलेलं।


रविवार special

  श्रीमती आशा चिने 

Sunday, 10 December 2017

आयुष्याचे काय..!


आयुष्याचे काय...!
     रचली तर कविता...गायले तर गीत,
     नाहीतर... शब्दांचा फेरफटका।

आयुष्याचे काय...!
     वाचले तर शब्द...जाणली तर भावना,
     नाहीतर... रिकाम्या जागा भरा।

आयुष्याचे काय...!
     म्हटले तर बेमोसमी... अनुभवले तर श्रावण,
     नाहीतर कोरडा चिंब-दुष्काळ।

आयुष्याचे काय...!
     म्हटले तर हिरवळ...ओल्या दवाची अन् कोरड्या त्या मनाची,
    नाहीतर सूर्य अस्ताचा अन् मेघ परतीचे।

आयुष्याचे काय...!
     म्हटले तर सूर सनईचे...छेडून तार हृदयाचे,
     नाहीतर गर्दीतल्या त्या एकटेपणाचे।

आयुष्याचे काय...!
     म्हटले तर किती सरळ आणि सोप्पे..! आयुष्य हे दमडीचे,
     नाहीतर कोडे हे अगणिक,आयुष्य न समजल्याचे।

आयुष्याचे काय...!
    म्हटले तर खूप नाही चांगले जगा... आयुष्य किती सुंदर ते बघा,
    या आयुष्याच्या गणितातील चिन्हे, एकदा बदलून तर बघा।


श्रीमती आशा चिने

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect