प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत
माझा ज्ञानरचनावादी उपक्रम
माझा ज्ञानरचनावादी उपक्रम
खेळ खेळूया वजाबाकीचा
Asha Chine
पहा व्हिडीओ
खेळ खेळूया वजाबाकीचा
हातच्याची वजाबाकी कितीही शिकवली, अथवा सरावाचा जराही अभाव झाला की बरेच विद्यार्थी उत्तर काढताना एखाद्या तरी अंकाने चुकतात...परिणामी गणित चुकते... काही विद्यार्थी अति आत्मविश्वासानेच चुकतात... यावर ज्ञानरचनावादी पद्धतीने त्या विद्यार्थ्यांसाठी मी एक ज्ञानरचनावादी उपक्रम तयार केला आहे...या पद्धतीने विद्यार्थी चुकले तर नाहीत पण खेळा-खेळातून हातच्याची वजाबाकी सहज आणि आत्मविश्वासाने करू लागले...
आणि या उपक्रमाचे विशेष म्हणजे कमी वेळेत, कमी श्रमात व कमी साहित्यात सहज सोप्या पद्धतीने हातच्याची वजाबाकी होते म्हणजे गड सर केल्याची भावना नक्कीच आनंद देऊन जाते...
प्रत्येक शाळेत असे विद्यार्थी असतात..त्यामुळे वजाबाकीचा हा खेळ कोणाला खेळायला नाही आवडणार?
व्हिडीओ पहा व आवडल्यास आपल्या अनमोल प्रतिक्रिया जरूर कळवा...(जरुरी नाही सर्वांनाच आवडेल)
असेच आणखी उपक्रम
पहा व्हिडीओ
उपक्रमाचे नाव
खेळ खेळूया वजाबाकीचा
विषय-गणित
आवश्यक खर्च-
खर्च नाही
उपक्रमाची उद्दिष्टे
1) हातच्याची वजाबाकी सहज करता येणे.
2) वजाबाकीचा न्यूनगंड दूर होणे.
3) आनंददायी अध्ययन होणे.
4) संकल्पना स्पष्ट होणे.
5) हातच्याची वजाबाकीची कोणतीही गणिते सोडविता येणे.
उपक्रमासाठी आवश्यक साहित्य
अंककार्ड व उपलब्ध साहित्य पुरेसे आहे-जसे खडे, चिंचोके, मणी, बिया, गोट्या, काड्या, इ.
उपक्रमाची कार्यवाही
(गृहीतक -विद्यार्थ्यांना वजाबाकी येते.)
2)एकक, दशक,शतक, साहित्याच्या सहाय्याने सुटे कसे करावे, हे समजून सांगावे किंवा करून दाखवावे.
3) शिक्षक प्रत्यक्ष कृती करून दाखवतील.
4) एककात हातचा कसा घेतला, कुठून घेतला,या खेळातून उलगडते.
साहित्याच्या सहाय्याने प्रत्यक्ष उत्तर चटकन कळते.
साहित्याच्या सहाय्याने प्रत्यक्ष उत्तर चटकन कळते.
त्यासाठी प्रत्यक्ष कृतीसाठी व्हिडीओच बघावा.
त्यासाठी खालील लिंक बघावी...
https://youtu.be/likf-Rt8iA0
Disclaimer:
एक प्रयोग-
या उपक्रमात एकक, दशक ,शतक, हजार,... नुसार साहित्य घेऊन ते सुट्या स्वरूपात दाखवणे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवू शकते. म्हणून शिक्षकांनी आपल्या कल्पकतेने ह्या कृती अगोदर तोंडी अथवा कृतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगाव्यात. याठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त हातच्याची वजाबाकी सोपी करून सांगण्याचा व त्यातून होणाऱ्या त्याच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
व्यक्तिपरत्वे तसेच विद्यार्थी परत्वे उपक्रमाची यशस्वीता बदलू शकते.
तसेच उपक्रमाबाबत मतमतांतरे असू शकतात.
उपक्रमाची फलनिष्पत्ती
1) हातच्याची वजाबाकी सोपी वाटते.
2) वजाबाकीचा न्यूनगंड दूर होतो.
3) आनंददायी अध्ययन होते.
4) साहित्य सहज उपलब्ध होते.
5) कमी वेळेत चटकन समजते व चिरकाळ लक्षात राहण्यास मदत होते.
6) चुका होण्याची शक्यता फारच कमी असते.
7) हातचा कुठून व कसा घेतला व दिला हे प्रत्यक्ष दिसत असल्याने संकल्पना स्पष्ट होते.
8) 100% विद्यार्थी या खेळात सहभागी होण्यास तयार असतात.
9) कितीही अंकी वजाबाकी सहज सोपी वाटते.
10) उपस्थिती व गुणवत्ता वाढते.
उपक्रम
संकल्पना
श्रीमती
आशा चिने
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!