“
उगीच ”
आज का थांबले?"उगीच"
त्या अनोळखी वळणापाशी ,
माझ्या मनीचे चिटपाखरू
भुर्रकन उडाले आकाशाशी ।
त्या अनोळखी वळणापाशी ,
माझ्या मनीचे चिटपाखरू
भुर्रकन उडाले आकाशाशी ।
झुकल्या नजरा खाली
आठवण काढून ती कोवळी ,
पायानेच काढली भूवरी
कधी नव्हे ती सुंदर नक्षी ।
"उगीच" आभास का अनोखा झाला ?
का एकाकी क्षण खुलून आला ?
गाली आलेल्या स्मितहास्याने
आरसा सुद्धा लाजून गेला ||
काव्यलेखन
श्रीमती आशा चिने
खूपच छान कविता मँम
ReplyDeletethank you sir
ReplyDelete