#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Friday 8 March 2019

प्रगतीच्या प्रकाशवाटा भाग ६


प्रगतीच्या प्रकाशवाटा भाग ६

    जागतिक महिला दिन... २०१९



           आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 



"जे जे आपणासी ठावे,

तेथे दुसऱ्यासी द्यावे !
शहाणे करून सोडावे,
सकल जण !!"

         अगदी या उक्तीप्रमाणेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख म्हणजे विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या व शिक्षणाची तळमळ असणाऱ्या शिक्षण प्रेमी मा. प्राध्यापिका माधवी पंडित मॅडम शेठ ब. ना. सारडा विद्यालय, सिन्नर तसेच नाशिक शिक्षण प्रसारक मंडळच्या त्या कार्यकारी सदस्या सुद्धा आहेत. 





     कार्यक्रमासाठी मॅडमची उपस्थिती व महिलांसाठीचे प्रबोधन गुरेवाडी गावातील महिलांसाठी दिशादर्शक असे पाऊल ठरले. कोणताही बडेजाव न बाळगता आपणही या समाजाचं देणं लागतो या निस्वार्थ भावनेने त्यांनी महिलांचं मन जिंकून घेतलं. 
               मॅडम .....
" आपल्या मनोगताने ...
फुलल्या माझ्या शाळेच्या कळ्या !
जशा दवबिंदूंनी फुलतात ...
फुलाच्या पाकळ्या !"
मा. प्राध्यापिका माधवी पंडित मॅडम
शेठ ब. ना. सारडा विद्यालय, सिन्नर
तसेच कार्यकारी सदस्य नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ


        गावातील महिलांना स्वच्छता, शिक्षणाची आवड व व्यसनमुक्ती यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रबोधन करण्यात आले. त्यासाठी व्हिडिओ, खेळ व कोडे घेण्यात आले. 'स्त्री'ने तिचे स्वतःचे अस्तित्व कसे निर्माण करावे? तिच्यात "स्व"त्वाची जाणीव व तिच्यातील शक्तीला ओळखण्यास या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सुरुवात झाली. 
सूत्रसंचालन आशा चिने



स्मरण शौर्याचे,
स्मरण त्यागाचे,
स्मरण ध्यासाचे,
स्मरण स्री पर्वाचे !

      गावातील महिलांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्यात. त्या स्वतंत्रपणे स्वतःचा, मुलांचा, कुटुंबाचा, गावाचा, अन् शाळेचा विचार करू लागल्यात. त्यांच्यातील बदललेली 'स्री' मी जवळून बघितली. त्यांचे चांगले- वाईट पर्यायाने गावाचे चांगले-वाईट असा त्यांचा "जगाशी" संबंध येतोय. त्या स्वतःचे विचार मांडू लागल्यात. बोलू लागल्यात, सांगू लागल्यात.







       मला आनंद आहे की आपण याचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यांच्यातील स्त्रीत्वाला गगन भरारी घेण्यासाठी आपण सर्वजण आशेचे पंख लावूयात. शाळेत होणारा बदल हा त्यांचं भविष्य बदलू पाहत आहेत. त्यांच्या सुंदर भविष्यातील पाऊलखुणा आता दिसू लागल्यात.


           या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात... त्या म्हणजे जगातील अर्धी लोकसंख्या म्हणजे समस्त "स्त्रीवर्ग". स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही खरंच आपण स्वतंत्र झालं का? या सर्व महिलांना त्यांच्या अस्तित्वाची ओळख निर्माण व्हावी, प्रत्येकीने स्वतःचा सन्मान करावा, स्वतःतील "स्त्री"शक्तीला ओळखावं, तिने बहरावं, फुलावं, बागडावं! तरच महिला दिन सार्थकी लागेल. 



"ज्याला स्री आई म्हणून कळली,

तो जिजाऊचा शिवबा झाला !
ज्याला स्री बहीण म्हणून कळली,
तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला !
ज्याला स्री मैत्रीण म्हणून कळली,
तो राधेचा शाम झाला !
आणि ज्याला स्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला !"

"प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्रीचा सिंहाचा वाटा आहे म्हणून स्री शक्तीला माझा सलाम...."

माझ्या सर्व मैत्रिणी व महिला भगिनींसाठी...

विझले आज जरी मी
हा माझा अंत नाही
पेटेना उद्या नव्याने
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे
पुन्हा उडेन मी
अडवू शकेल मला
अजून अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे
केलेत कैक कावे
जळेल झोपडी अशी
आग ती ज्वलंत नाही

रोखण्यास वाट माझी
वादळे होती आतूर
डोळ्यांत जरी गेली धूळ
थांबण्यास उसंत नाही

येथील वादळे खेटेल तुफान
तरी वाट चालते
अडथळ्यांना भिवून अडखळणे
पावलांना पसंत नाही...
                                       -(C&P)


      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा चिने तर आभार पद्मा मॅडम यांनी मानले.  जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐


✍🏻शब्दांकन
*आशा चिने*, गुरेवाडी

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect