मॅडम-मॅडम स्नेहसंमेलन कधी घेणार?
घेऊ..! थोडा अभ्यास आधी करूया!
मॅडम, तुम्ही सांगाल ते ऐकू,
पण, आधी आमचे डान्स घ्या।
सर्वांनाच कसे आवडते? खेळायला अन्
नाचायला,
हा उपक्रम सांगून गेला,
विद्यार्थ्यांना शाळेकडे वळायला।
सगळं कसं डान्समय, वातावरण अन्
विचारही,
शिक्षकांनी आपला डान्स आधी
घ्यावा,म्हणून आधीच अभ्यास उरकलेला।
कधी धड प्रश्नांची उत्तरे न दिलेले,
करताय चर्चा इवल्या-इवल्या,
रिकामा वेळ असो वा मधली सुट्टी,
डान्सच्याच गप्पा रंगलेल्या।
दुसरी कोणाचीच मदत नको, मॅडम तुम्हीच
डान्स घ्या,
बरं! चला म्हणताच, एकच कल्लोळ केलेला।
गाणं कोणतंही घ्या पण, स्टेप करणार
मॅडमनेच दिलेल्या,
स्वारी स्वप्नातही जाम खुश, दरम्यान
शाळाही लवकरच भरणार।
मला छान डान्स येतो ऐकून, उगाचच जास्त
करणार,
"सर्वांनाच डान्स"ही उक्ती,
मग कामच करून जाणार।
अबोल कळ्याही खुलणार, अन् खुललेल्या तर
टवटवीत होणार,
शाळाच काय अहो गावंच, गाणार अन्
नाचणार।
जेवण जास्तच अन् झोपही मस्तच, उपस्थिती
अन् गुणवत्ताही टिकणार,
सर्वांगीण विकास साधत, स्नेहसंमेलन
दरवर्षीच येणार।
अहो हे काय थोडं ? आईही स्वप्न बघणार!
मुलांचं उरकलं म्हणजे आपलाही महिला
मेळावा होणार!
कधी सभेला न येणारी माता, उगीच शाळेत
येणार,
झाली का तयारी म्हणत,मतं जाणून घेणार।
मीही लवकरच आहे,म्हणत खुश करून देणार,
किती छान गंमती! दररोज कोणाला सांगणार?
विदयार्थ्यांना वाटतं की, माझी आई
स्नेहसंमेलनाला येणार,
पण, खरं सांगू! स्नेहसंमेलन एक बहाणा,
मातेची स्वारी तर मेळाव्यातच खुश
होणार।
मागच्या वेळेस नाही जमलं, ह्या वेळेस
तिला दाखवणार,
मलाही सर्वच जमतं म्हणून किचनमध्येच
तयारी करून घेणार।
दोरी उड्या मध्येच फुगडी, कबड्डी समजून
मारतेय उडी,
चमचा-लिंबू नाही पोहे खायचेय, आवाज
येताच धावतच खडी।
स्नेहसंमेलनाची गंमत-जंमत न्यारीच,
उत्साहाचे वातावरण सगळीकडे, औत्सुक्य
अन् प्रगतीही खरीच।