#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

प्रगतीच्या प्रकाशवाटा


         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणाहून माझी बदली ३१/०५/२०१८ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या शाळेत झाली आणि या शाळेतील संघर्षाचा प्रवास सुरू झाला. शाळा बघताच पायाखालची जमीन घसरेल अशी अवस्था. समोर वाढून ठेवलेल्या अंधकारमय परिस्थितीतून प्रकाशाची वाट शोधत-शोधत ही सर्व परिस्थिती एका वर्षात कशी बदलली ? याचा प्रवास म्हणजे "प्रगतीच्या प्रकाशवाटा" ही लेखमाला. (जून २०१८ ते एप्रिल २०१९ दरम्यान चा गुरेवाडी शाळेतील माझा शाळा प्रवास) 
            ही लेखमाला सदर स्वरूपामध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न  केला आहे. लेखमाला वाचण्यासाठी क्रमाक्रमाने सदर वाचावेत. 



        याच शाळेत मी लिहिती झाली... माझे अनुभव प्रसंग लिहू लागले. त्यातून कुणालाही दुखावण्याचा मानस नाही परंतु "कुणाच्यातरी अनुभवातून आपण शिकत असतो", हा पण अनुभव कोणालातरी उपयोगी पडेल. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून "प्रगतीचा प्रकाशवाटा" ही लेखमाला मी लिहिली आहे. 

    आपल्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे. आपल्याला हा शाळा प्रवास कसा वाटला ते मला लिहून नक्की कळवा...


लेखिका :- आशा चिने, सिन्नर

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect